फोटो सौजन्य: @BikeBD (X.com)
आज भारतात जास्तीतजास्त घरात आपल्याला एक तरी दुचाकी वाहन दिसतेच. तसेच देशात बाईक आणि स्कूटरची विक्री देखील दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. आता तर इलेक्ट्रिक बाईक आणि स्कूटर देखील मार्केटमध्ये उपलब्ध झाले आहेत.
भारतात पूर्वी बाईक खरेदी करताना जास्तीतजास्त ग्राहक फक्त बाईकच्या मायलेज आणि किमतीकडेच लक्ष द्यायचे. पण आजचा तरुण ग्राहक बाईक निवडताना तिचा परफॉर्मन्स आणि लूक देखील बघतो. म्हणूनच अनेक बाईक उत्पादक कंपन्या मार्केटमध्ये उत्तम परफॉर्मन्स देणाऱ्या बाईक सुद्धा ऑफर करतात. Honda CB300R ही त्यातीलच एक.
अखेर ग्राहकांना समजली ‘या’ कंपनीची खरी किंमत ! 17 वर्षात पहिल्यांदाच अनुभवली रेकॉर्डब्रेक विक्री
होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया (HMSI) ने भारतातील त्यांच्या लोकप्रिय बाईक CB300R च्या काही युनिट्ससाठी रिकॉल जारी केले आहे. 2018 ते 2020 दरम्यान उत्पादित केलेल्या CB300R बाईक्ससाठी हा रिकॉल रिलीज करण्यात आले आहे. कंपनीने याला स्वैच्छिक रिकॉल म्हटले आहे. होंडा CB300R मध्ये नेमका काय बिघाड झाला आहे आणि तो कसा दुरुस्त करता येईल त्याबद्दल आज जाणून घेऊया.
होंडाने CB300R साठी रिकॉल जारी केले आहे. या बाईकचे हेडलाइट खराब झाले आहे. त्यात बसवलेल्या इंटरनल पीसीबी (प्रिंटेड सर्किट बोर्ड) मध्ये टेक्निकल खराबी आली आहे. त्यामुळे, जास्त वेळ बाईक चालवल्याने आणि रस्त्याच्या व्हायब्रेशन्समुळे हेडलाईटला जोडलेल्या वायर तुटू शकतात किंवा त्यांच्या जागेवरून हलू शकतात. यामुळे, रात्रीच्या वेळी बाईक चालवताना जेव्हा तुम्ही हेडलाइट चालू करता तेव्हा मधूनमधून लाइट येण्याची किंवा हेडलाइट पूर्णपणे बंद होण्याची शक्यता वाढते. रात्रीच्या वेळी बाईक चालवताना ही समस्या धोकादायक ठरू शकते, कारण हेडलाइट बंद असल्याने, रायडर रस्त्यावर काहीही पाहू शकणार नाही, ज्यामुळे ते अपघाताचे बळी ठरू शकतात.
होंडाने ही समस्या गांभीर्याने घेत सर्व प्रभावित बाईक्ससाठी हेडलाइट पार्ट मोफत बदलण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत, ज्या बाईकची वॉरंटी संपली आहे त्यांच्या हेडलाइट्स देखील दुरुस्त केल्या जातील. कंपनीने ग्राहकांना होंडा बिगविंगच्या अधिकृत वेबसाइटवर त्यांच्या बाईकचा व्हेईकल आयडेंटिफिकेशन नंबर(VIN) टाकून त्यांची बाईक या रिकॉलचा भाग आहे की नाही हे तपासण्याचे आवाहन केले आहे.
याव्यतिरिक्त, होंडा डीलरशिप ग्राहकांशी फोन, ईमेल किंवा एसएमएसद्वारे संपर्क साधू शकतात आणि त्यांची बाईक रिकॉलचा भाग आहे की नाही हे जाणून घेऊ शकतात. ही रिप्लेसमेंट प्रोसेस फक्त होंडा बिगविंग सर्व्हिस सेंटरमध्येच केली जाईल, जिथे सर्व्हिस टेक्निशियन बाईकची तपासणी करतील आणि आवश्यक भाग बदलतील.