फोटो सौजन्य: iStock
भारतीय कार मार्केटमध्ये अनेक उत्तम फीचर्स असणाऱ्या कार्स लाँच होत असतात. खरेतर भारतातील ऑटोमोबाईल हे खूप मोठे मार्केट आहे, ज्यामुळे जगभरातील ऑटो कंपनीची नजर इथे रोखली जाते. मार्केटमध्ये विविध सेगमेंटमध्ये कार्स विकल्या जातात. यात लक्झरी सेगमेंटमधील कार्सची नेहमीच चर्चा होताना दिसते. भारतात अनेक लक्झरी कार्स उत्पादक कंपन्या आहेत. नुकतेच एक लक्झरी कार उत्पादक कंपनीला ग्राहकांनी उदंड प्रतिसाद दिला आहे.
जग्वार लँड रोव्हर (Jaguar Land Rover -JLR) भारताने लक्झरी कारच्या जगात इतिहास रचला आहे. 17 वर्षांच्या प्रवासात पहिल्यांदाच, कंपनीने रिटेल सेल्सच्या विक्रीत 6,183 युनिट्स विकल्या आहेत आणि 40% वार्षिक वाढ नोंदवली आहे. त्याच वेळी, होलसेल विक्रीचे प्रमाण देखील 6,266 युनिट्सवर पोहोचले, जे गेल्या वर्षीपेक्षा 39% जास्त आहे. चला याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.
आर्थिक वर्ष 25 च्या चौथ्या तिमाहीत जेएलआर इंडियाच्या विक्रीत वाढ झाली. या कालावधीत, 1,793 युनिट्सची रिटेल विक्री नोंदवली गेली, जी आर्थिक वर्ष 24 च्या तुलनेत 110% जास्त आहे. त्याचप्रमाणे, होलसेल डिलिव्हरी देखील 1,710 युनिट्सवर पोहोचले, ज्यामध्ये 118 टक्क्याने वाढ झाली आहे.
जेएलआरच्या या प्रचंड वाढीचा सर्वात मोठा नायक डिफेंडर होता, ज्याच्या विक्रीत 90% वाढ झाली. याशिवाय, भारतात बनवलेल्या रेंज रोव्हर आणि रेंज रोव्हर स्पोर्टनेही चांगली कामगिरी केली, या कारच्या विक्रीत अंदाजे 72% आणि 42% वाढ नोंदवली आहे.
जेएलआर इंडियाच्या अनोख्या हाऊस ऑफ ब्रँड्स धोरणामुळे कंपनी लक्झरी सेगमेंटमध्ये नवीन उंचीवर पोहोचली आहे. रेंज रोव्हर आणि डिफेंडर सारख्या आयकॉनिक एसयूव्ही आता हाई-नेट-वर्थ ग्राहकांची पहिली पसंती बनल्या आहेत.
33 किमीचा मायलेज देणारी ‘ही’ कार झाली अजूनच महाग, द्यावे लागेल ‘इतके’ अतिरिक्त पैसे
जेएलआर इंडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर राजन अंबा म्हणाले की, आर्थिक वर्ष 25 ही आमची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे. आम्ही सलग दोन वर्षे आमची ग्रोथ दुप्पट केली आहे. आमचे लक्ष केवळ लक्झरी वर नाही तर ‘कस्टमर लव्ह’ देखील आहे. रेंज रोव्हर आणि डिफेंडरच्या प्रचंड मागणीमुळे कंपनी या टप्प्यावर पोहोचलो आहोत. आर्थिक वर्ष 26 मध्येही आम्ही हीच गती कायम ठेवण्यासाठी आम्ही सज्ज आहोत.