फोटो सौजन्य: @CandSCmagazine (X)
भारतीय ऑटोमोबाईल बाजार हा जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या मार्केट्सपैकी एक मानला जातो. यामुळेच जगभरातील मोठ्या ऑटो कंपन्यांची नजर सतत भारतावर असते. स्वदेशी कंपन्यांबरोबरच विदेशी कंपन्याही आपली दर्जेदार, फीचर्सने सुसज्ज आणि ग्राहकांच्या गरजांनुसार बनवलेली वाहने येथे सादर करत असतात. यातीलच एक आघाडीची विदेशी ऑटो कंपनी म्हणजे ह्युंदाई मोटर इंडिया. ह्युंदाईने आपल्या स्टायलिश डिझाईन, उत्कृष्ट मायलेजबरोबरच टिकाऊपणामुळे भारतीय ग्राहकांच्या मनात आपली विशेष ओळख निर्माण केली आहे.
ह्युंदाईने भारतात नेहमीच ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन उत्कृष्ट कार्स सादर केल्या आहेत. त्यामुळेच ह्युंदाई हे नाव विश्वासार्हतेचं प्रतीक मानलं जातं. मात्र, या यशस्वी कंपनीच्या एका कारकडे ग्राहकांनी अपेक्षित प्रतिसाद दिला नाही. ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात ही कार अपयशी ठरली, ज्यामुळे तिच्या विक्रीत मोठी घसरण झाली आहे. चला या कारबद्दल जाणून घेऊया.
33 किमीचा मायलेज देणारी ‘ही’ कार झाली अजूनच महाग, द्यावे लागेल ‘इतके’ अतिरिक्त पैसे
भारतीय ग्राहकांमध्ये ह्युंदाईच्या कार्स खूप लोकप्रिय आहेत. जर आपण गेल्या महिन्याबद्दल म्हणजेच मार्च 2025 बद्दल बोललो तर, ह्युंदाई क्रेटाने 18,059 एसयूव्ही विकून कंपनीच्या विक्रीत अव्वल स्थान मिळवले होते. परंतु, त्याच काळात, कंपनीची लोकप्रिय इलेक्ट्रिक कार Hyundai IONIQ 5 दहाव्या क्रमांकावर राहिली आहे. गेल्या महिन्यात IONIQ 5 ला फक्त 19 ग्राहक मिळाले. तर अगदी 1 वर्षापूर्वी म्हणजे मार्च 2024 मध्ये, IONIQ 5 ला फक्त 65 ग्राहक मिळाले. चला या इलेक्ट्रिक कारच्या फीचर्स, पॉवरट्रेन आणि किमतीबद्दल जाणून घेऊया.
Hyundai Ioniq 5 मध्ये 72.6kWh बॅटरी आहे जी पूर्ण चार्ज केल्यावर 631 किमीची रेंज देते. ही इलेक्ट्रिक कार 150 किलोवॅट क्षमतेच्या चार्जरद्वारे 21 मिनिटांत 0 ते 80 टक्क्यांपर्यंत चार्ज होते. तर 50kWh चार्जरद्वारे पूर्ण चार्ज होण्यासाठी ही कार एक तासाचा वेळ घेते. ही कार ग्राहकांसाठी 4 कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध आहे.
फिक्स की रिमूव्हेबल ? कोणती बॅटरी असणारी Electric Scooter ठरेल तुमच्यासाठी बेस्ट
या इलेक्ट्रिक कारच्या केबिनमध्ये ग्राहकांना 12.3-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आणि डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले मिळतो. याशिवाय कारमध्ये पॅनोरॅमिक सनरूफ, वायरलेस फोन चार्जर, प्रवाशांच्या सुरक्षेसाठी 6 एअरबॅग्ज, 360 डिग्री कॅमेरा आणि ADAS सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. आयोनिक 5 ची एक्स-शोरूम किंमत 46.05 लाख रुपये आहे. ही किंमत तुमच्या जवळील शोरुमनुसार बदलू देखील शकते.