(फोटो सौजन्य-AI एआय)
हिरो मोटोकॉर्पने देशातील पहिल्या E85 फ्लेक्स-फ्युएल सक्षम मोटरसायकली म्हणून या दोन्ही मॉडेल्सना बाजारात आणले. स्प्लेंडर+ E85 ची एक्स-शोरूम दिल्ली किंमत ₹82,810, तर एचएफ डिलक्स E85 ची किंमत ₹72,792 ठेवण्यात आली आहे. कंपनीच्या मते, बुकिंगसोबतच उपलब्ध होणाऱ्या बाइक्सची विक्रीही होत आहे. त्यामुळे सुरुवातीचा ग्राहक प्रतिसाद चांगला आणि सकारात्मक असल्याचे स्पष्ट होते.
Hero Mavrick 440 मध्ये प्रीमियम USD फोर्क्स आणि TFT क्लस्टर; नव्या अवतारात दिसली बाइक
हिरो मोटोकॉर्पचे चीफ बिझनेस ऑफिसर आशुतोष वर्मा यांनी सांगितले की, कंपनीकडे 10,000 पेक्षा जास्त चौकशा आल्या असून बुकिंगचा आकडा 10,000 जवळ पोहोचला आहे. फ्लेक्स-फ्युएल बाइक्ससाठी उत्पादन क्षमता वाढवण्याचा कंपनीचा मानस असून, भविष्यात हा व्यवसायातील महत्त्वाचा भाग ठरू शकतो.
या बाइक्स E20 ते E85 पर्यंतच्या इथेनॉल मिश्रित पेट्रोलवर चालू शकतात. सध्या भारतात E20 पेट्रोल मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असले, तरी E85 इंधनाची उपलब्धता अजून मर्यादित आहे. दिल्ली-NCRसह काही मोजक्या पेट्रोल पंपांवरच E85 मिळते. त्यामुळे या तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर स्वीकार होण्यासाठी इंधनाचे नेटवर्क वाढणे महत्त्वाचे ठरणार आहे.
2027 Kawasaki Versys 1100 भारतात लाँच, किंमत ₹13.89 लाख; जाणून घ्या खास फीचर्स
फ्लेक्स-फ्युएल मॉडेल्समध्ये नवीन फ्युएल पंप, सेकंडरी फ्युएल फिल्टर आणि सुधारित ECU कॅलिब्रेशन करण्यात आले आहे. यामुळे पॉवरमध्ये 7% आणि टॉर्कमध्ये 3% वाढ झाल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. त्यामुळे पर्यावरणपूरक फ्युल सोबत चांगली कामगिरी देण्याचा प्रयत्न या बाइक्समध्ये करण्यात आला आहे.






