फोटो सौजन्य - Social Media
होंडा मोटारसायकल अँड स्कुटर इंडियाने आपला नवीन इलेक्ट्रिक स्कुटर ACTIVA e: आणि QC1ची बुकिंग घेण्यास सुरुवात केली आहे. नव्या वर्षाच्या सुरुवातीला या नव्या E-Scooter ग्राहकांच्या भेटीस सज्ज झाल्या आहेत. या E-Scooter ला खरेदी करण्यास इच्छुक असणाऱ्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी आहे कि या गाड्या दिल्ली, मुंबई, पुणे, बेंगळुरू, हैद्राबाद तसेच चंदीगडमध्ये उपल्बध आहेत. मुळात, या गाड्यांना बुकिंग करण्यासाठी १,००० रक्कम आकारण्यात येणार आहे. जानेवारी २०२५ मध्ये या गाड्यांच्या किंमती जाहीर केल्या जातील. तर डिलेव्हरी फेब्रुवारी २०२५ मध्ये होण्याची शक्यता आहे.
या ईस्कुटरची विशेष बात म्हणजे भारतात स्कुटरमध्ये होंडाची ऍक्टिवा फार लोकप्रिय आहे. भारतात बहुतांश लोकांकडे ऍक्टिवा आहे. देशात स्कुटर म्हंटल कि ऍक्टिवाला पसंती देतात. जर तुम्हीही ऍक्टिवाचे चाहते आहात. तर होंडाची ACTIVA e खास तुमच्यासाठी आहे. ऍक्टिवाच्या सर्व फीचर्ससह इलेक्ट्रिक सुविधा ACTIVA e मध्ये मिळून जाईल. QC1 हा आधुनिक डिझाइन आणि तंत्रज्ञानाने सज्ज नवीन मॉडेल आहे. Activa E मध्ये स्वॅपेबल बॅटरी आहे, तर QC1 मध्ये फिक्स्ड बॅटरी आहे. हे दोन्ही स्कूटर अनेक आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध असतील. यांना 3 वर्षे किंवा 50,000 किलोमीटरची वॉरंटी दिली जाईल. तसेच, पहिल्या वर्षी 3 फ्री सर्व्हिस आणि फ्री रोडसाइड असिस्टन्सची सुविधाही मिळेल.
होंडा Activa E स्कूटर ५ विशेष रंगामध्ये पुरवण्यात येणार आहे. यामध्ये पर्ल शॅलो ब्लू, पर्ल मिस्टी व्हाइट, पर्ल सेरेनिटी ब्लू, मॅट फॉगी सिल्वर मेटॅलिक आणि पर्ल इग्नियस ब्लॅक अशा आकर्षक रंगाचा समावेश आहे. मुळात या स्कुटरमध्ये दोन 1.5 kWh स्वॅपेबल बॅटरी टेक्नॉलॉजी आहेत. या एकदा चार्ज केल्या कि 102 किलोमीटरपर्यंतची रेंज देऊ शकतात. शिवाय, यामध्ये 7.0-इंचाचा टीएफटी डिस्प्ले दिला आहे, जो Honda RoadSync Duo अॅपद्वारे रिअल-टाइम कनेक्टिव्हिटी प्रदान करतो.
होंडा QC1 इलेक्ट्रिक स्कूटरदेखील ५ विशेष रंगात उपलब्ध आहे. यामध्ये पर्ल सेरेनिटी ब्लू, पर्ल मिस्टी व्हाइट, मॅट फॉगी सिल्वर मेटॅलिक, पर्ल इग्नियस ब्लॅक आणि पर्ल शॅलो ब्लू या रंगाचा समावेश आहे. QC1 मध्ये 1.5 kWh फिक्स्ड बॅटरी पॅक दिला आहे, जो एकदा पूर्ण चार्ज केल्यावर 80 किलोमीटरपर्यंतची रेंज देतो. 0% ते 80% चार्ज होण्यासाठी 4 तास 30 मिनिटे लागतात, तर पूर्ण चार्जसाठी 6 तास 50 मिनिटे लागतात.