फोटो सौजन्य: X.com
भारतीय मार्केटमध्ये दिवसेंदिवस बाईक्सच्या विक्रीत मोठी वाढ होताना दिसत आहे. ग्राहक देखील बजेट फ्रेंडली बाईक्सना चांगला प्रतिसाद देत आहे. अनेक दुचाकी उत्पादक कंपन्या देखील मार्केटमध्ये स्वस्तात मस्त अशा बाईक लाँच करत असतात. नुकतेच देशातील आघाडीची दुचाकी उत्पादक कंपनी होंडाने दोन नवीन बाईक नवीन फीचर्ससह लाँच केल्या आहेत. चला याबद्दल जाणून घेऊयात.
होंडाने त्यांची लोकप्रिय कम्युटर बाईक 2025 Honda SP125 आणि SP160 नवीन फीचर्स आणि स्टाइलसह सादर केली आहे. या दोन्ही बाईक नवीन TFT इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि काही कॉस्मेटिक बदलांसह आणल्या आहेत. ज्यामुळे या बाईक पूर्वीपेक्षा अधिक परवडणाऱ्या आणि आकर्षक बनल्या आहेत. SP125 आणि SP160 द्वारे मिळालेल्या नवीन अपडेट्सबद्दल जाणून घेऊयात.
2025 Honda SP125 ही बाईक भारतात नवीन फीचर्ससह 92,678 रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत लाँच करण्यात आली आहे. त्याच वेळी, 2025 Honda SP160 बाईक 1.22 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत बाजारात आणण्यात आली आहे.
हाय परफॉर्मन्स आणि सेफ्टीची हमी ! Indian Army च्या ‘या’ 5 पॉवरफुल कार तुम्ही देखील करू शकता खरेदी
होंडाने या दोन्ही बाईक्स स्टायलिश दिसण्यासाठी अनेक बदल केले आहेत. SP125 मध्ये ग्राफिक डिझाइनमध्ये नवीन बदल करण्यात आले आहेत. तसेच यामध्ये नवीन LED हेडलाइट दिली गेली आहे, जी रात्रीच्या वेळी चांगला प्रकाश देते.
या दोन्ही बाईकमध्ये सर्वात मोठा बदल म्हणजे TFT इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, जो ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह येतो. या बाईक होंडा रोडसिंक अॅपद्वारे कनेक्ट केले जाऊ शकते, ज्याद्वारे तुम्हाला स्क्रीनवर टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन, म्युझिक आणि कॉल्सबद्दल माहिती मिळेल. हे रिअल-टाइम फ्युएल इकॉनॉमी, रेंज, सरासरी फ्युएल एफिशियन्सी स्पीडोमीटर, फ्युएल गेज, ओडोमीटर आणि ट्रिप मीटर सारखी माहिती प्रदान करेल.
दोन्ही बाईक्समध्ये स्टार्ट/स्टॉप फंक्शन दिला गेला आहे, जे ट्रॅफिकमध्ये थांबल्यावर इंजिन आपोआप बंद करते. यामुळे इंधनाची बचत होते, ज्यामुळे तुमची बाईक अधिक मायलेज देते. तसेच, इंजिन सुरू झाल्यावर सायलेंट स्टार्टरला धक्का बसत नाही, ज्यामुळे राइड अधिक आरामदायी बनते.
अखेर ब्रिटनमध्ये Maruti Suzuki E-Vitara झाली लाँच, भारतात केव्हा होणार लाँच?
Honda SP125 मध्ये 123 सीसी सिंगल-सिलेंडर इंजिन वापरले आहे, जे 10 एचपी पॉवर आणि 10.9 एनएम टॉर्क जनरेट करते. त्याचे इंजिन 5-स्पीड मल्टीप्लेट वेट क्लचशी जोडलेले आहे.
Honda SP160 मध्ये 162 सीसी सिंगल-सिलेंडर इंजिन वापरले आहे, जे 13 एचपी पॉवर आणि 14.8 एनएम टॉर्क जनरेट करते. यात 5-स्पीड ट्रान्समिशन आणि मल्टीप्लेट वेट क्लच देखील आहे.