फोटो सौजन्य: @gaadiwaadi (X.com)
भारतासह जगभरात इलेक्ट्रिक कार्सच्या मागणीत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. याच मागणीमुळे अनेक ऑटो कंपन्या ज्या आधी फक्त इंधनावर चालणाऱ्या कार ऑफर करीत होत्या त्याच आज इलेक्ट्रिक कार्सच्या उत्पादनावर विशेष लक्षकेंद्रित करत आहे. नुकतेच मारुती सुझुकीने त्यांची पहिली वाहिली इलेक्ट्रिक कार ब्रिटनमध्ये लाँच केली आहे. चला याबद्दल जाणून घेऊयात.
सुझुकीने युनायटेड किंग्डममध्ये ऑल-इलेक्ट्रिक ई- विटारा लाँच केली आहे, ज्याची किंमत £29,999 (सुमारे 35 लाख रुपये) आहे . ही कार दोन व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आली आहे. या कारचे एंट्री-लेव्हल व्हेरिएंट 49 kWh बॅटरी पॅक आहे. दरम्यान, 61 kWh बॅटरी पॅक आणि ऑल-व्हील-ड्राइव्ह पॉवरट्रेनसह अल्ट्रा ऑलग्रिप-ई व्हेरिएंट असलेला ईव्हीचा टॉप-एंड व्हेरिएंट £37,799 (सुमारे 44 लाख रुपये) मध्ये येतो.
किमतीच्या बाबतीत ई विटारा ही कार यूकेमध्ये महाग आहे. मात्र, भारतीय मार्केटमध्ये ती अधिक परवडणारी असण्याची शक्यता आहे कारण ती गुजरातमधील बेचराजीजवळील हंसलपूर येथील सुझुकी मोटर गुजरातमध्ये तयार केली जाईल. तसेच या प्लांटमधील हे मॉडेल विविध देशांमध्ये निर्यात केले जाईल.
Advanced फिचर्ससह Bajaj Chetak ची नवी इलेक्ट्रिक स्कूटर, किंमत वाचून म्हणाल योग्य पर्याय
आधी नमूद केल्याप्रमाणे, सुझुकी ई विटारा दोन बॅटरी पॅक पर्यायांसह येईल: 49 किलोवॅट प्रति तास आणि 61 किलोवॅट प्रति तास. लहान बॅटरी पॅक 346 किमीची WLTP रेंज देईल तर मोठा बॅटरी पॅक त्याच्या सिंगल-मोटर कॉन्फिगरेशनमध्ये 428 किमी रेंज देईल, असा कंपनीचा दावा आहे. दरम्यान, 61 किलोवॅट प्रति तास बॅटरी पॅकसह ड्युअल-मोटर व्हेरिएंट 412 किमी रेंज देईल.
परफॉर्मन्सच्या बाबतीत, या कार मधील 49 kWh सिंगल-मोटर मॉडेल 142 बीएचपी देते, तर 61 kWh मॉडेल 172 बीएचपी जास्त आउटपुट देते. दोन्ही व्हेरिएंट 192.5 एनएमचा जास्तीत जास्त टॉर्क निर्माण करतात. उलट, ड्युअल मोटर्स असलेले ऑल-व्हील-ड्राइव्ह व्हर्जन 178 बीएचपी आणि 300 एनएम टॉर्क एकत्रित आउटपुट निर्माण करते.
युकेमधील ग्राहक आता सुझुकी ई विटारा खरेदी करू शकतात, तरीही भारत अजूनही वाट पाहत आहे. २०२५ च्या अखेरीस हे इलेक्ट्रिक वाहन भारतीय बाजारपेठेत प्रवेश करेल. एकदा लाँच झाल्यानंतर, ते हुंडई क्रेटा इलेक्ट्रिक, महिंद्रा बीई६, एमजी झेडएस ईव्ही आणि इतर मॉडेल्सशी स्पर्धा करेल.
येत्या सप्टेंबर 2025 मध्ये मारुती सुझुकी त्यांची पहिली वाहिली इलेक्ट्रिक कार E Vitara लाँच करण्याची प्लॅनिंग करत आहे.