Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Honda UC3 Electric Scooter: होंडाची नवी इलेक्ट्रिक स्कूटर भारतात येणार! ‘UC3’ चे डिझाईन पेटंट बुक! मिळतील जबरदस्त फीचर्स

होंडा कंपनीची नवीन 'UC3' इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लवकरच दाखल होणार असून, याचे डिझाईन पेटंट नुकतेच फाइल करण्यात आले आहे. ३.२ kWh बॅटरी आणि १२२ किमी रेंज असलेली ही मॅक्सी-स्कूटर भारतीय EV बाजारात काय नवीन कमाल करेल? चला पाहूयात.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Aug 31, 2026 | 09:32 PM
Honda UC3 Electric Scooter: होंडाची नवी इलेक्ट्रिक स्कूटर भारतात येणार! ‘UC3’ चे डिझाईन पेटंट बुक! मिळतील जबरदस्त फीचर्स
Follow Us
Follow Us:
  • होंडाने भारतामध्ये आपल्या नवीन ‘UC3’ इलेक्ट्रिक स्कूटरचे डिझाईन पेटंट दाखल केले आहे.
  • या स्कूटरमध्ये ३.२ kWh ची LFP बॅटरी असून ती एका चार्जमध्ये १२२ किमी धावू शकते.
  • होंडाच्या या नव्या मॅक्सी-स्कूटर लूक असलेल्या ई-स्कूटरचा टॉप स्पीड ताशी ८० किमी आहे.

भारतातील इलेक्ट्रिक टू-व्हीलर बाजारात आपले स्थान मजबूत करण्यासाठी होंडा कंपनी आता वेगाने पावले उचलत आहे. कंपनीने नुकतीच भारतात ‘QC3’ इलेक्ट्रिक स्कूटर सादर केली होती, ज्याची रेंज १४५ किमी असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. याचदरम्यान, होंडाने थायलंड आणि व्हिएतनाममध्ये नुकतीच लाँच केलेली ‘होंडा UC3’ या नवीन इलेक्ट्रिक स्कूटरचे डिझाईन पेटंट भारतात दाखल केले आहे. होंडा ही अशी एकमेव मुख्य ऑटोमोबाईल ब्रँड आहे, ज्याची भारतीय इलेक्ट्रिक स्कूटर मार्केटमध्ये म्हणावी तशी पकड नाही, कारण त्यांचे पूर्वीचे ‘अॅक्टिवा ई’ आणि ‘QC1’ हे मॉडेल अपुऱ्या विक्रीमुळे बंद करावे लागले होते. मात्र, आता ‘UC3’ मुळे कंपनी बाजारात जोरदार पुनरागमन करण्याच्या तयारीत आहे.

बॅटरी, परफॉर्मन्स आणि रेंजची माहिती

या नवीन ई-स्कूटरच्या तांत्रिक बाबींचा विचार केला तर, होंडा UC3 मध्ये ३.२ kWh क्षमतेची फिक्सड LFP बॅटरी पॅक देण्यात आला आहे. ही स्कूटर एकाच चार्जिंगमध्ये तब्बल १२२ किलोमीटरची कमाल रेंज देण्यास सक्षम आहे. या स्कूटरमधील इलेक्ट्रिक मोटर ८ bhp कमाल पॉवर जनरेट करते, जी साधारण १६० सीसीच्या पेट्रोल स्कूटरइतकीच उत्तम कामगिरी करते. तसेच, ही स्कूटर ताशी ८० किलोमीटरच्या टॉप स्पीडने धावू शकते. यात १२ इंच आकाराची पुढील आणि मागील चाके देण्यात आली आहेत.

2027 Kawasaki Ninja 500: भारतीय बाजारात दाखल झाली २०२७ कावासाकी निन्जा ५००! पाहा किंमत आणि स्पेसिफिकेशन्स

डिझाईन आणि युनिक लूक

होंडा UC3 चे डिझाईन मॅक्सी-स्कूटर आणि निओ-रेट्रो स्कूटरचे एक अप्रतिम मिश्रण आहे. या स्कूटरच्या पुढील भागाचा लूक मॅक्सी-स्कूटरसारखा आहे, तर मागील बाजू, साइड पॅनल्स आणि सीटचा आकार निओ-रेट्रो मॉडेलशी साम्य सांगणारा आहे. यात आकर्षक थ्री-पीस LED DRL युनिट दिले आहे, जे इंडिकेटरचेही काम करते. DRL च्या अगदी खाली LED हेडलाइट, तर वरील बाजूस विंडस्क्रीन आणि चार्जिंग सॉकेट बसवण्यात आले आहे. थायलंडमध्ये ही स्कूटर पर्पल सफायर व्हाईट आणि ग्रेफाइट ब्लॅक या रंगांमध्ये उपलब्ध असून तिथे याची किंमत सुमारे ४.१० लाख रुपये आहे.

अडव्हान्स फीचर्स आणि अंतर्गत स्टोरेज

रायडर्सच्या सोयीसाठी या ई-स्कूटरमध्ये अनेक आधुनिक फीचर्स समाविष्ट करण्यात आले आहेत. यात इको, स्टँडर्ड आणि स्पोर्ट असे मल्टि रायड मोड, ट्रॅक्शन कंट्रोल, रिव्हर्स असिस्ट, टाईप-सी यूएसबी चार्जिंग पोर्ट, की-लेस स्टार्टसह स्मार्ट की, रिजेनरेटिव्ह टेक आणि होंडा रोडसिंकयुक्त ५ इंचाचा टीएफटी  इन्स्ट्रुमेंट कन्सोल मिळतो. तसेच, सुरक्षिततेसाठी यात ऑल-LED लायटिंग स्टँडर्ड म्हणून दिली असून, सामान ठेवण्यासाठी यात २६ लिटरची मोठी अंडरसीट स्टोरेज क्षमता देण्यात आली आहे.

MG Hector Tomahawk EV VS Mahindra XEV 9S: किंमत, रेंज आणि फिचर्सच्या बाबतीत कोणती फॅमिली ईव्ही आहे बेस्ट?

भारतीय बाजारातील स्पर्धा आणि भविष्यातील योजना

भारतात बजाज, टीव्हीएस आणि हिरोसारख्या भारतीय कंपन्या इलेक्ट्रिक टू-व्हीलर सेगमेंटमध्ये आघाडीवर आहेत. इतकेच नव्हे तर, जपानच्याच यामाहा आणि सुझुकी या प्रतिस्पर्धी ब्रँड्सनीही अनुक्रमे EC-06 आणि e-Access द्वारे भारतीय बाजारात आपले पाय रोवले आहेत. या तीव्र स्पर्धेमुळे होंडा आता गांभीर्याने आपले EV धोरण आखत असून, आगामी काळात भारतीय ग्राहकांसाठी एकापाठोपाठ एक अनेक नवीन इलेक्ट्रिक मॉडेल लाँच करण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

Web Title: Honda uc3 electric scooter design patent filed in india auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 31, 2026 | 09:29 PM

Topics:  

  • automobile
  • Honda
  • scooter

संबंधित बातम्या

टाटा मोटर्स आणि स्टेलँटिसची मोठी पार्टनरशिप! भारतात तयार होणार 50 पेक्षा जास्त जागतिक मार्केटसाठी नवी वाहने
1

टाटा मोटर्स आणि स्टेलँटिसची मोठी पार्टनरशिप! भारतात तयार होणार 50 पेक्षा जास्त जागतिक मार्केटसाठी नवी वाहने

किया कार खरेदीचा मोठा फायदा! 3 वर्षांनंतर ICE कारवर 75%, EV वर 70% रिसेल व्हॅल्यूची हमी
2

किया कार खरेदीचा मोठा फायदा! 3 वर्षांनंतर ICE कारवर 75%, EV वर 70% रिसेल व्हॅल्यूची हमी

BYD Sealion 7 फेस्टिव्ह एडिशन लाँच! किंमत 50.60 लाख रुपये, फक्त 150 युनिट्सची विक्री होणार
3

BYD Sealion 7 फेस्टिव्ह एडिशन लाँच! किंमत 50.60 लाख रुपये, फक्त 150 युनिट्सची विक्री होणार

भारतात पेट्रोल कारची पकड कमी होतेय! CNG, हायब्रिड आणि EV कारची मागणी वाढली
4

भारतात पेट्रोल कारची पकड कमी होतेय! CNG, हायब्रिड आणि EV कारची मागणी वाढली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.