Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 5 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘धूम मचाले’! ट्रक्सचे असे ‘म्युझिकल हॉर्न’ ऐकलेत का? जाणून घ्या ड्रायव्हर्स हे हॉर्न का लावतात आणि RTO चा बंदीचा कायदा काय सांगतो?

भारतीय ट्रकमध्ये थकवा घालवण्यासाठी आणि फॅशन म्हणून म्युझिकल हॉर्न वाजवले जात असले, तरी केंद्रीय वाहन कायद्यानुसार ते पूर्णपणे बेकायदेशीर आहेत. ११२ डेसिबलपेक्षा जास्त आवाजाचे हे हॉर्न रस्त्यावरील सुरक्षेसाठी धोकादायक असून, असे हॉर्न आढळल्यास ₹१०,००० पर्यंत दंड होऊ शकतो.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Jul 05, 2026 | 02:02 PM
‘धूम मचाले’! ट्रक्सचे असे ‘म्युझिकल हॉर्न’ ऐकलेत का? जाणून घ्या ड्रायव्हर्स हे हॉर्न का लावतात आणि RTO चा बंदीचा कायदा काय सांगतो?
Follow Us
Follow Us:

भारतीय महामार्गांवरून प्रवास करताना “धूम मचाले धूम”, “नागीन ट्यून” किंवा इतर वेगवेगळ्या गाण्यांच्या सुरांमध्ये वाजणारे ट्रक्सचे हॉर्न तुम्ही नक्कीच ऐकले असतील. हे म्युझिकल हॉर्न किंवा ज्यांना प्रेशर हॉर्न असेही म्हणतात जे भारतीय ट्रक संस्कृतीचा एक अविभाज्य भाग बनले आहेत. पण यामागील कारण काय आहे आणि कायदा काय सांगतो, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

ट्रक्सवर म्युझिकल हॉर्न का बसवले जातात?

१.लांबचा प्रवास आणि जाणवणारा थकवा हटवण्यासाठी

ट्रक ड्रायव्हर्स अनेक दिवस सलग, रात्रं-दिवस ड्रायव्हिंग करतात. अशा वेळी हायवेवर येणारा कंटाळा घालवण्यासाठी आणि स्वतःला ताजेतवाने ठेवण्यासाठी ते मनोरंजनाचा भाग म्हणून हे हॉर्न बसवतात.

ट्रकच्या टायरजवळ असणाऱ्या ब्लॅक रबर पट्ट्यांचा वापर काय? सजावट की जुगाड?

२.इतर वाहनांना इशारा देण्यासाठी

ट्रक आकाराने खूप मोठे असतात. हायवेवर वेगाने जाणाऱ्या इतर वाहनांना किंवा रात्रीच्या वेळी झोपेत असणाऱ्या, ‘पेंग आलेल्या’ ड्रायव्हर्सना सतर्क करण्यासाठी मोठ्या आवाजाच्या हॉर्नची गरज असते, असा ड्रायव्हर्सचा समज असतो.

३. भारताची ट्रक संस्कृती आणि सजावटीची परंपरा

भारतात ट्रकला ड्रायव्हर लोकांसाठी ‘दुसरे घर’ मानले जाते. वर्षाचे जवळपास ३०० दिवस तरी ते ट्रक वर असतात. त्यामुळे ट्रक सुंदर सजवण्यासोबतच युनिक आवाज असणारा हॉर्न लावणे ही एक फॅशन बनली आहे.

माहितीय का तुम्हाला? वाहनांच्या ‘हॉर्न’चा शोध लावला होता थॉमस एडिसन यांच्या साथीदाराने! जाणून घ्या

हे कायदेशीर आहे का?

नाही, ट्रक्सवर म्युझिकल किंवा प्रेशर हॉर्न लावणे भारतात पूर्णपणे बेकायदेशीर आहे.

केंद्रीय मोटार वाहन नियमांनुसार कोणत्याही वाहनाचा हॉर्न ११२ डेसिबल पेक्षा जास्त नसावा. मात्र, ट्रक्समधील हे म्युझिकल हॉर्न १२० ते १४० डेसिबलपर्यंत आवाज करतात, जो मानवी कानांसाठी अत्यंत घातक आहे.

नियमांचे उल्लंघन केल्यास काय होते?

मोटार वाहन कायद्याच्या कलम १९०(२) अंतर्गत, गाडीत म्युझिकल किंवा प्रेशर हॉर्न आढळल्यास ₹२,००० ते ₹१०,००० पर्यंतचा मोठा दंड होऊ शकतो. वाहतूक पोलीस असे हॉर्न जागेवरच जप्त करतात किंवा ट्रकची साउंडची जोडणी कापून टाकतात.

हे हॉर्न पायी चालणाऱ्यांना आणि दुचाकीस्वारांना अचानक घाबरवून अपघाताला कारणीभूत ठरतात. म्हणूनच, जरी ते ऐकायला गमतीदार वाटत असले, तरी रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने ते अत्यंत धोकादायक आहेत.

Web Title: Indian trucks musical horns auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 05, 2026 | 02:02 PM

Topics:  

  • automobile

संबंधित बातम्या

गाड्यांमध्ये येतोय ‘सायलेंट हॉर्न’! फक्त गाडी समोरच्या पादचाऱ्याला जाणार आवाज ऐकू!
1

गाड्यांमध्ये येतोय ‘सायलेंट हॉर्न’! फक्त गाडी समोरच्या पादचाऱ्याला जाणार आवाज ऐकू!

भारतात फॅन्सी हॉर्नवर बंदी का आहे? जाणून घ्या RTO चे नियम आणि दंडाची रक्कम
2

भारतात फॅन्सी हॉर्नवर बंदी का आहे? जाणून घ्या RTO चे नियम आणि दंडाची रक्कम

माहितीय का तुम्हाला? वाहनांच्या ‘हॉर्न’चा शोध लावला होता थॉमस एडिसन यांच्या साथीदाराने! जाणून घ्या
3

माहितीय का तुम्हाला? वाहनांच्या ‘हॉर्न’चा शोध लावला होता थॉमस एडिसन यांच्या साथीदाराने! जाणून घ्या

इथेनॉल वॉर: भारताचे ‘हरित इंधन’ की वाहनचालकांच्या खिशाला कात्री? इंजिन, शेती आणि देशाच्या अर्थकारणावर होणाऱ्या परिणामांचे विश्लेषण
4

इथेनॉल वॉर: भारताचे ‘हरित इंधन’ की वाहनचालकांच्या खिशाला कात्री? इंजिन, शेती आणि देशाच्या अर्थकारणावर होणाऱ्या परिणामांचे विश्लेषण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.