वाहन उद्योग हा खूप व्यापक आहे. अगदी प्रत्येक वाहन आणि त्याचा प्रत्येक पार्ट ऑटोमोबाईल क्षेताला अजून संपन्न बनवतो. आपल्या गाडीचा हॉर्न हा असाच एक वाहन उद्योगाचा अविभाज्य घटक आहे, म्हणायला पाहिजे. या हॉर्नचा शोध कसा लागला हे आज इथे आपण पाहणार आहोत. १९ व्या शतकाच्या शेवटी जेव्हा जगात पहिल्यांदा गाड्या रस्त्यावर धावू लागल्या, तेव्हा त्यांचा वेग खूप कमी होता. सुरुवातीला लोक पादचाऱ्यांना सावध करण्यासाठी ‘क्लॅक्सन’ किंवा हाताने दाबायची रबरी पीपाणी वापरायचे.
वाहनांसाठीच्या पहिल्या अधिकृत इलेक्ट्रॉनिक हॉर्नचा शोध मिलर रीस हचिसन यांनी १९०८ मध्ये लावला. हचिसन यांनी या यंत्राचे पेटंट घेतले, ज्याला नंतर ‘क्लॅक्सन हॉर्न’ असे नाव देण्यात आले. हा हॉर्न ‘करार्र’ असा मोठा आणि तीक्ष्ण आवाज करायचा, ज्यामुळे लांबच्या व्यक्तीलाही गाडी येत असल्याची जाणीव व्हायची. थॉमस एडिसन यांच्या कंपनीनेही या तंत्रज्ञानात पुढे सुधारणा केल्या.
BMW च्या लोगोमागील हा इतिहास तुम्हाला माहिती आहे का? त्वरीत जाणून घ्या
कार आणि बाईकच्या हॉर्नमधील बदल
कारचा हॉर्न: सुरुवातीच्या गाड्यांमध्ये केवळ एकच हॉर्न असायचा. मात्र, १९३० च्या दशकात कारची गती वाढली. त्यानंतर कंपन्यांनी गाड्यांमध्ये दोन हॉर्न वापरण्यास सुरुवात केली. हे हॉर्न वेगवेगळे सूर एकत्र काढून ऐकण्यास सुसह्य पण लांबपर्यंत जाणारा आवाज तयार करतात.
बाईकचा हॉर्न: दुचाकी वाहनांचा आकार लहान असल्याने त्यांच्यासाठी लहान आणि हलके इलेक्ट्रॉनिक हॉर्न विकसित करण्यात आले. बाईकमध्ये प्रामुख्याने १२ व्होल्टच्या बॅटरीवर चालणारे डायफ्राम हॉर्न वापरले जातात.
‘चल मेरी लुना’! साधेपणाचे दुसरे नाव आणि भारतीय ऑटोमोबाईल क्रांतीचा सुवर्णकाळ
भारतात ब्रिटिश काळात गाड्यांसमोर लाल झेंडा घेऊन चालणारा माणूस असायचा, जो लोकांना गाडी येण्याचे संकेत द्यायचा. त्यानंतर हॉर्नचा वापर सक्तीचा झाला. आज तंत्रज्ञान बदलले असून हवेच्या दाबावर चालणारे ‘प्रेशर हॉर्न’ आणि ‘म्युझिकल हॉर्न’ बाजारात आले आहेत. मात्र, वाढत्या ध्वनीप्रदूषणामुळे शहरांमध्ये हॉर्नचा अनावश्यक वापर टाळणे आणि योग्य डेसिबलचा हॉर्न वापरणे ही आजच्या काळाची गरज बनली आहे.






