मुंबई : जग्वार लॅण्ड रोव्हर , इंडियाने (Jaguar Land Rover, India) आज ग्राहकांसाठी भारतातील त्यांच्या सर्व अधिकृत रिटेलर्समध्ये १४ ते १९ नोव्हेंबर २०२२ पर्यंत त्यांच्या वार्षिक हॉलिडे सर्विस कॅम्पची (Annual Holiday Service Camp) घोषणा केली.
या कॅम्पमध्ये ग्राहकांना सर्वसमावेशक वाहन तपासणी आणि ब्रॅण्डेड गुड्स, ॲक्सेसरीज व मूल्यवर्धित सेवांवर आकर्षक ऑफर्सचा लाभ मिळू शकतो. उच्च प्रशिक्षित जग्वार व लॅण्ड रोव्हर टेक्निशियन्सकडून सर्व वाहनांची पाहणी केली जाईल आणि आवश्यक असल्यास जग्वार व लॅण्ड रोव्हर जेन्यूएन पार्ट्सचा अशुअरन्स मिळेल.
हा कॅम्प ३२-पॉइण्ट इलेक्ट्रॉनिक वेईकल हेल्थ चेक-अप, ब्रेक व वायपर चेक, टायर व फ्लूईड लेव्हल चेक, तसेच सर्वसमावेशक बॅटरी हेल्थ चेक अशा सेवा देईल, ज्यामधून प्रत्येक प्रवास सुरक्षित व विश्वसनीय असण्याची खात्री मिळेल.
जग्वार लॅण्ड रोव्हर इंडियाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक रोहित सुरी म्हणाले, “यंदा सुट्टीच्या हंगामामध्ये आम्ही आमच्या ग्राहकांचे उच्च प्रशिक्षित जग्वार व लॅण्ड रोव्हर टेक्निशियन्सकडून सर्वसमावेशक वेईकल हेल्थ तपासणी करण्यास स्वागत करतो. हॉलिडे सर्विस कॅम्प ग्राहकांच्या हंगामी गरजांची पूर्तता करण्यासाठी डिझाइन करण्यात आलेला उपयुक्त उपक्रम आहे.’’
चालक असलेल्या ग्राहकांसाठी सर्विस कॅम्पमध्ये विशेषरित्या क्यूरेटेड ‘चालक प्रशिक्षण उपक्रम’ देखील असेल, ज्यामध्ये ड्रायव्हिंग व वेईकल देखरेखीच्या सर्व पैलूंचा समावेश असेल.
या सेवांचा लाभ घेण्यासाठी ग्राहक १४ ते १९ नोव्हेंबर २०२२ पर्यंत सकाळी ९.३० ते सायंकाळी ४.३० दरम्यान जवळच्या अधिकृत रिटेलरकडे अपॉइण्टमेंट निर्धारित करू शकतात.
जग्वार लॅण्ड रोव्हर वाहने भारतात अहमदाबाद, बेंगळुरू (३), भुवनेश्वर, चंदिगड, चेन्नई (२), कोईम्बतूर, दिल्ली, गुरगाव, हैदराबाद, इंदौर, जयपूर, कोलकाता, कोची, कर्नाल, लखनौ, मुंबई (२), नोएडा, पुणे, रायपूर, सुरत व विजयवाडा या २१ शहरांमधील २५ अधिकृत आऊटलेट्समध्ये उपलब्ध आहेत.
चालक प्रशिक्षण उपक्रम निवडक रिटेल ठिकाणी उपलब्ध आहे. कृपया अधिक माहितीसाठी तुमच्या शहरातील अधिकृत रिटेलरशी संपर्क साधा.