फोटो सौजन्य: iStock
भारतीय ऑटो बाजारात अनेक ऑटो कंपन्या ग्राहकांना बेस्ट फीचर्स आणि परफॉर्मन्स असणारी कार ऑफर करत असतात. यात खासकरून विदेशी ऑटो कंपन्या भारतीय ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करताना दिसतात.
भारतात अनेक विदेशी ऑटो कंपन्या आहेत. त्यातीलच एक कंपनी म्हणजे किया मोटर्स. कियाने देशात अनेक उत्तम कार फार केल्या आहेत. नुकतेच कंपनीने मे 2025 मध्ये सेल्स रिपोर्ट जारी केला आहे.
भारतातील लोकप्रिय कार उत्पादक कंपनी किआ इंडियाने आपल्या उत्कृष्ट परफॉर्मन्स ऑटोमोबाईल उद्योगात पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली आहे. कंपनीने मे 2025 मध्ये एकूण 22,315 वाहनांची विक्री केली आहेत, जे मे 2024 पेक्षा 14.43% जास्त आहे. गेल्या वर्षी याच महिन्यात 19,500 युनिट्स विकल्या गेल्या होत्या. बाजारात Kia Carens Clavis ची मागणी सतत वाढत आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
Tata Curvv ला एकतर्फी टक्कर देणारी ‘ही’ SUV झाली महाग, खिसा होणार अजूनच रिकामा
कियाच्या अलिकडेच लाँच झालेल्या कॅरेन्स क्लॅव्हिसला ग्राहकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. ही नवीन कार कंपनीच्या कुटुंब-अनुकूल आणि भविष्यासाठी तयार असलेल्या उत्पादनांवर ग्राहकांचा विश्वास आणखी दृढ करते.
कियाचे सिनियर प्रेसिडंट आणि नॅशनल हेड ऑफ सेल्स अँड मार्केटिंग हरदीप सिंग ब्रार म्हणाले की, कॅरेन्स क्लॅव्हिसच्या यशावरून भारतीय ग्राहक कियावर किती विश्वास ठेवतात हे दिसून येते.
किया इंडिया गेल्या पाच महिन्यांपासून सतत वाढ नोंदवत आहे. या निकालांवरून असे दिसून येते की कंपनीची प्रॉडक्ट रेंज ग्राहकांमध्ये वाढत्या प्रमाणात लोकप्रिय होत आहे. एसयूव्ही, एमपीव्ही किंवा ईव्ही असो, किआच्या प्रत्येक ऑफरने बाजारात आपला ठसा उमटवला आहे.
किया इथेच थांबत नाहीये. कंपनी जुलै 2025 मध्ये एक नवीन कार सादर करण्याची तयारी करत आहे. ही कार याच्या डिझाइन आणि तंत्रज्ञानाने सर्वांना आश्चर्यचकित करेलच, शिवाय शाश्वतता आणि भविष्यातील गतिशीलता लक्षात घेऊन ही डिझाइन करण्यात आली आहे. भारतीय ग्राहकांच्या बदलत्या गरजा लक्षात घेऊन ही कार विशेषतः डिझाइन करण्यात आली आहे.
Ola S1Z आणि Ola Gig च्या डिलिव्हरीत विलंब, कंपनीच्या CEO ने सांगितले कारण
2017 मध्ये, कियाने आंध्र प्रदेशातील अनंतपूर येथे मॅन्युफॅक्चरिंग प्लांट उभारण्यासाठी राज्य सरकारसोबत करार केला. त्यानंतर, कंपनीने 2019 पासून मोठ्या प्रमाणात उत्पादन सुरू केले. आज, कियाची वार्षिक उत्पादन क्षमता 3 लाख युनिट्स आहे. आतापर्यंत, अनंतपूर प्लांटमधून 15 लाखांहून अधिक वाहने डिलिव्हर करण्यात आली आहेत (भारतात 1.2 मिलियन आणि 3.67 लाख निर्यात).