फोटो सौजन्य: x.com
भारतीय बाजरात आता इलेक्ट्रिक वाहनांच्या मागणीत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. यात इलेक्ट्रिक टू-व्हिलर्स म्हणजेच इलेक्ट्रिक दुचाकींना ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. हीच मागणी पाहता, मार्केटमध्ये अनेक इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादक कंपन्या दाखल होत आहे. परंतु, जेव्हा इलेक्ट्रिक दुचाकींची एवढी मागणी नव्हती तेव्हापासून Ola Electric या सेगमेंटमध्ये दमदार स्कूटर ऑफर करीत आहे. ग्राहक देखील कंपनीच्या इलेक्ट्रिक दुचाकींना चांगला प्रतिसाद देत आहेत. मात्र आता कंपनीच्या इलेक्ट्रिक वाहनांच्या डिलिव्हरी बाबत महत्वाची बातमी समोर आली आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, निर्माता आता S1Z और Ola Gig ची डिलिव्हरी लांबवणार आहे. असे का होत आहे? याबाबत कंपनीने कोणती माहिती दिली आहे? त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.
‘ही’ Electric Bike खरेदी करणाऱ्या पहिल्या 5000 ग्राहकांना मिळेल हजारो रुपयांची बंपर सूट
माहितीनुसार, ओला इलेक्ट्रिकने ऑफर केलेल्या Ola S1Z इलेक्ट्रिक स्कूटर आणि Ola Gig च्या डिलिव्हरीत उशीर होऊ शकते.
वृत्तानुसार, ओला इलेक्ट्रिकचे फाउंडर आणि सीईओ भाविश अग्रवाल यांनी दोन्ही वाहनांमध्ये झालेल्या विलंबाबद्दल गुंतवणूकदारांना माहिती दिली आहे की ते त्यांच्या इलेक्ट्रिक बाईकवर लक्ष केंद्रित करत आहेत, ज्यामुळे या उत्पादनांच्या डिलिव्हरीला उशीर होईल.
ओला इलेक्ट्रिकचे फाउंडर आणि सीईओ भाविश अग्रवाल यांनी त्यांच्या गुंतवणूकदारांना सांगितले आहे की सध्या आमचे लक्ष फक्त Ola Roadster बाईकवर आहे. ज्यामध्ये Roadster X, Roadster X+ आणि या सिरीजमधील इतर बाईकचा समावेश आहे. Gig, Gig plus, S1Z आणि तीन चाकी स्कूटरचे प्लॅटफॉर्म काही काळानंतर सादर केले जातील.
Ola S1Z आणि Ola Gig गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये ओलाच्या एका कार्यक्रमादरम्यान लाँच केले गेले होते. त्यांची डिलिव्हरी देखील मे 2025 च्या आसपास सुरू होण्याची अपेक्षा होती, परंतु ओला रोडस्टरप्रमाणे, त्यांची डिलिव्हरी देखील विलंबित होऊ शकते.
नोव्हेंबर 2024 मध्ये ओलाने Ola Gig लाँच केले होते. तेव्हाच त्याची बुकिंग सुरू झाली होती. त्यात 1.5 किलोवॅट क्षमतेची बॅटरी दिली जाईल, जी 112 किमीची रेंज आणि 25 किमी प्रतितासचा टॉप स्पीड देईल. ही स्कूटर B2B साठी बनवली आहे. याशिवाय, Ola Gig+ मध्ये रिमूव्हेबल बॅटरीचे पर्याय देण्यात आले आहेत आणि दोन बॅटरीसह त्याची रेंज 157 किमी असेल. ओला गिगची किंमत 39999 रुपये आहे आणि ओला गिग+ ची एक्स-शोरूम किंमत 49999 रुपये आहे.
नोव्हेंबर 2024 मध्ये ओलाने S1Z लाँच केले होते. या स्कूटरमध्ये 1.5 kWh क्षमतेची बॅटरी देखील आहे. त्यामुळे दोन बॅटरीमधून 146 किमीची रेंज मिळते. याची किंमत 59999 रुपये आहे. याशिवाय, Ola S1Z+ मध्ये 1.5 kWh क्षमतेची बॅटरी देखील आहे, ती दोन बॅटरीमधून 146 किमीची रेंज देखील देते. त्याची एक्स-शोरूम किंमत 64999 रुपये ठेवण्यात आली आहे.