फोटो सौजन्य: iStock
भारतात एसयूव्ही सेगमेंटमधील कार्सला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. याच मागणीकडे पाहता अनेक ऑटो कंपनीज आपल्या हाय परफॉर्मन्स एसयूव्ही मार्केटमध्ये लाँच करत आहे. भारतातील अनेक सेलिब्रेटीज तसेच राजकारणी मंडळी नेहमीच एसयूव्ही वापरताना दिसतात. एसयूव्ही कार्स फक्त दिसण्यात पॉवरफुल नसतात तर त्यांचे परफॉर्मन्स सुद्धा दमदार असतात. आता तर काही ऑटो कंपनीज इलेक्ट्रिक एसयूव्ही सुद्धा लाँच करत आहे.
आता लवकरच साऊथ कोरिया कंपनी किया नवीन एसयूव्ही लाँच करण्याची तयारी करत आहे. अलीकडेच या एसयूव्हीच्या नावाची घोषणा कंपनीकडून करण्यात आली आहे. ही नवीन SUV कोणत्या नावाने लॉन्च होणार आहे, याबद्दल आपण जाणून घेऊया.
Kia लवकरच भारतात एक नवीन SUV लाँच करणार आहे. याआधी कंपनीने या एसयूव्हीच्या नावाची घोषणा केली आहे. कंपनीकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही नवीन एसयूव्ही Kia Syros नावाने लाँच होणार आहे.
नवीन एसयूव्हीच्या नावाची घोषणा करण्यासोबत, कियाने एक नवीन व्हिडिओ टीझर देखील प्रदर्शित केला आहे. नवीन 50 सेकंदाच्या टीझरमध्ये, कारचे नाव आणि फ्रंट लुकची झलक देण्यात आली आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, नवीन एसयूव्ही अतिशय फ्यूचरिस्टिक डिझाइनसह लाँच केली जाणार आहे. आधुनिक डिझाईन, उत्कृष्ट तंत्रज्ञान आणि अधिक जागा असलेली ही Kia ची खास SUV असणार आहे.
टीझरमध्ये एसयूव्हीची थोडक्यात झलक दाखवण्यात आली आहे. त्यानुसार नुकत्याच लाँच झालेल्या Kia Carnival आणि EV9 प्रमाणे एसयूव्हीचा फ्रंट ठेवण्यात आला आहे. तसेच कार्निव्हलप्रमाणे त्यात हेडलाइट्स लावण्यात आले आहेत. नवीन एसयूव्हीमध्ये एलईडी लाईट्ससोबतच एलईडी डीआरएलही उपलब्ध असेल. Kia कंपनीचा लोगो बोनेटच्या मध्यभागी दिलेला आहे.
नवीन एसयूव्हीचे चित्र म्हणजेच स्केच किआने व्हिडीओ टीझर रिलीज होण्याच्या काही दिवस आधी रिलीज केले होते. स्केचमध्ये एक बॉक्सी सिल्हूट दिसत आहे. ज्यामध्ये उभ्या डीआरएलची रचना कार्निव्हलपासून प्रेरणा घेऊन करण्यात आली आहे. हे फिचर कारच्या टेस्टिंग दरम्यान यापूर्वीच दिसून आले आहे. कारच्या मागील बाजूबद्दल बोलायचे झाल्यास, नवीन SUV मध्ये L-shaped टेल लॅम्प सेटअप दिला जाऊ शकतो.
किया कंपनीने ही एसयूव्ही लाँच करण्याची तारीख अद्याप अधिकृतपणे जाहीर केलेली नाही. पण नवीन SUV डिसेंबर 2024 मध्ये लाँच होईल अशी अपेक्षा आहे.