फोटो सौजन्य: iStock
बदलत्या काळानुसार ऑटोमोबाईल मार्केटमध्ये झपाट्याने बदल होत आहेत. पूर्वी मुख्यत्वे इंधनावर चालणाऱ्या कार्सचेच उत्पादन मोठ्या प्रमाणात होत असे. मात्र आता पर्यावरणपूरक पर्यायांचा विचार केला जात असून इलेक्ट्रिक वाहने (EVs) झपाट्याने लोकप्रिय होत आहेत. यासोबतच हायड्रोजनवर चालणाऱ्या कार्सही बाजारात दाखल होत आहेत. या सर्व नवकल्पनांमध्ये ‘एअरकार’ म्हणजेच हवेत उडणाऱ्या कार्सची एक वेगळीच क्रेझ निर्माण होत आहे. भविष्यात वाहतुकीचे स्वरूपच बदलणार असल्याचे संकेत यातून मिळतात.
अनेकदा अॅक्शन चित्रपटांमधून आपण हवेत झेप घेणाऱ्या कार पहिल्याच असतील. यामुळे सातत्याने लोकांमध्ये हवेत उडणाऱ्या कारची क्रेझ वाढत आहे. हेच कारण आहे की अनेक ऑटोमोबाईल कंपन्या सतत फ्लाईंग कारवर काम करत आहेत. या संदर्भात, स्लोवाकियन स्टार्टअप क्लेन व्हिजनने त्यांच्या पहिल्या फ्लाइंग कारचे प्रोडक्शन रेडी प्रोटोटाइप सादर केला आहे. याबद्दल, कंपनीने म्हटले आहे की ही उडणारी कार पुढील वर्षी बाजारात आणली जाईल.
MG Windsor Pro Vs Tata Curvv EV: फीचर्स, बॅटरी आणि रेंजच्या बाबतीत कोणती कार आहे वरचढ?
क्लेन व्हिजनबद्दल बोलायचे झाले तर, गेल्या 30 वर्षांपासून या एअर कारवर काम करत आहे. प्रोडक्शन रेडी मॉडेलपर्यंत, या कारने 170 हून अधिक उड्डाण तास आणि 500 हून अधिक टेकऑफ आणि लँडिंग पूर्ण केले आहे. 2022 मध्ये, या एअरकार मॉडेलला फ्लाइंग सर्टिफिकेट देण्यात आले आहे.
क्लेन व्हिजनची एअरकार पुढील वर्षी बाजारात येईल. कंपनीच्या प्रवक्त्यानुसार, पुढील वर्षी लाँच होणाऱ्या या एअरकारची किंमत 8 ते 10 लाख अमेरिकन डॉलर्स असेल. जर आपण भारतीय चलनात बोललो तर ही किंमत अंदाजे 6.78 कोटी ते 8.47 कोटी रुपये असेल.
या एअरकारचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ही एक कन्वर्टिबल कार आहे, जी सामान्य वाहनाप्रमाणे रस्त्यावर सहज चालवता येते. यासोबतच, गरज पडल्यास, ही कार उडत्या विमानात देखील रूपांतरित केली जाऊ शकते. कारपासून ते एअरक्राफ्टमध्ये रूपांतरित होण्यासाठी फक्त 2 मिनिटांचा वेळ लागतो.
भारतीय बाजारात ‘या’ बाईक्सचा दरारा; तुमच्या Bike कलेक्शनमध्ये करा Add, वाढेल दरारा
एअरकारचे संपूर्ण सिस्टम आपोआप काम करते. या एअरकारबद्दल कंपनीचे म्हणणे आहे की क्लेन व्हिजन एअरकारचा लेस्टस्ट व्हेरियंट रस्त्यावर 200 किमी प्रतितास आणि हवेत 250 किमी प्रतितास वेगाने उडू शकतो.






