फोटो सौजन्य: YouTube
महिंद्रा कंपनी नेहमीपासूनच आपल्या ग्राहकांसाठी उत्तमोत्तम कार्स मार्केटमध्ये लाँच करत असतात. यंदा स्वातंत्र्यदिनाच्या एक दिवसाआधी म्हणजेच १४ ऑगस्टच्या सायंकाळी कंपनीकडून महिंद्रा थार रॉक्स लाँच करण्यात आली आहे. अनेक जण या कारच्या लाँच तसेच यामधील फीचर्सबद्दल उत्सुक होते.
या कारच्या बेस व्हेरियंटमध्ये 2.0-लिटर टर्बो-पेट्रोल इंजिन आहे. या वेरिएंटची किंमत 12.99 लाख रुपयांपासून सुरू होते. या शक्तिशाली SUV चे इंजिन 160 bhp आणि 330 Nm टॉर्क जनरेट करते आणि 2.0-लिटर डिझेल जे 150 bhp आणि 330 Nm टॉर्क जनरेट करते.
हे देखील वाचा: बहुप्रतिक्षित Mahindra Thar Roxx 5-door SUV लॉंच ! किंमत 12.99 लाख रुपये
या कारमधील दोन्ही इंजिन 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह जोडलेले आहेत. थार रॉक्समध्ये वेट सस्पेन्शनसह पेंटा लिंक सस्पेंशन आहे आणि त्यात ब्रेक लॉकिंग डिफरेंशियल आहे. 6 एअरबॅग्ज आणि ESC सारखी सेफ्टी फीचर्स बेस व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहेत. यामुळेच बहुतेक लोक ही थार आपल्या घरी आणण्याच्या तयारीत आहेत. पण ही कार विकत घेण्या आगोदर कि इंधन खर्च करू शकते हे प्रत्येक खरेदीदाराला माहित असणे गरजेचे आहे.
महिंद्राची ही नवीन थार एका तासात किती पेट्रोल किंवा डिझेल खर्च करते हे तुम्ही कोणता इंजिन पर्याय निवडता आणि ड्रायव्हिंगची परिस्थिती यावर अवलंबून असते.
पेट्रोल वेरिएंट: 2.0-लिटर टर्बो पेट्रोल इंजिनसह, ही कार सामान्य परिस्थितीत अंदाजे 12 ते 15 किमी/लिटर इतके मायलेज देऊ शकते. जर तुम्ही एका तासात 60 किमी गाडी चालवली तर ते सुमारे 4 ते 5 लिटर पेट्रोल खर्च करू शकते.
डिझेल वेरिएंट: 2.2-लीटर डिझेल इंजिनसह, ही कार अंदाजे 14 ते 17 किमी/लिटर इतके मायलेज देऊ शकते. एका तासात 60 किमीच्या प्रवासात महिंद्रा थार 3.5 ते 4.5 लिटर डिझेल वापरू शकते.