(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
हॉलिवूडमधून एक दुःखद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेता इसाया व्हिटलॉक ज्युनियर यांचे वयाच्या ७१ व्या वर्षी निधन झाले आहे. “द वायर” या गुन्हेगारी नाटकातून प्रसिद्धी मिळवलेल्या व्हिटलॉक ज्युनियर यांच्या निधनाने हॉलिवूडला मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या मॅनेजरने अभिनेत्याच्या निधनाची घोषणा केली, ज्यामुळे शोककळा पसरली. इसाया व्हिटलॉक ज्युनियरचे चाहते सोशल मीडियावर त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत.
मॅनेजरने मृत्यूची माहिती चाहत्यांना दिली
इसाया व्हिटलॉक ज्युनियर यांच्या निधनाच्या बातमीने हॉलिवूड कलाकारांनाही धक्का बसला आहे. त्यांचे मॅनेजर ब्रायन लीबमन यांनी सोशल मीडियावर ही बातमी शेअर केली. मॅनेजरने सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले आहे की, “मी तुम्हाला कळवत आहे की माझा प्रिय मित्र आणि क्लायंट, इसाया व्हिटलॉक ज्युनियर यांचे निधन झाले आहे. तुम्ही त्यांच्यावर खूप प्रेम केले. ते एक प्रतिभावान अभिनेते आणि एक अद्भुत माणूस होते.”
“द वायर” ने दिली ओळख
एचबीओच्या गुन्हेगारी ड्रामा “द वायर” द्वारे व्हिटलॉकला ओळख मिळाली. त्यात त्याने क्ले डेव्हिस या भ्रष्ट राजकारण्याची भूमिका साकारली, जी प्रेक्षकांना खूप आवडली. या भूमिकेमुळे व्हिटलॉक प्रसिद्धीच्या झोतात आला. “द वायर” ने प्रेक्षकांना ड्रग्ज प्रकरणे आणि गुन्हेगारी राजकारणाची सविस्तर माहिती दिली. प्रेक्षक अजूनही हा ड्रामा पाहणे पसंत करतात.
‘हा’ बॉलीवूड सुपरस्टार नवा डॉन, Ranveer Singhचा पत्ता कट, Don 3 चित्रपटाबद्दल मोठी अपडेट
अभिनेत्याने या चित्रपटांमधे केले काम
व्हिटलॉकने अनेक दशके चित्रपट उद्योगात काम केले. त्यांनी पडद्यावर १२५ हून अधिक पात्रे साकारली आहेत. त्यांनी प्रसिद्ध अभिनेता स्पाइक ली यांच्या अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका केल्या, ज्यात “शी हेट मी”, “रेड हूक समर”, “ची-राक”, “ब्लॅकक्लेन्समन” आणि “दा ५ ब्लड्स” यांचा समावेश आहे. त्यांनी “वीप” या विनोदी मालिकेत अमेरिकेच्या संरक्षण सचिव म्हणूनही एक संस्मरणीय भूमिका साकारली आहे.






