केसांच्या बऱ्याच समस्या होतील कायमच्या दूर! 'या' पद्धतीने करा मेथी दाण्यांचा वापर
हिवाळ्यात महिलांसह पुरुषांमध्ये सुद्धा केसांच्या समस्या वाढू लागतात. केसांमध्ये कोंडा होणे, केस तुटणे, केस गळणे, केसांची वाढ खुंटणे इत्यादी अनेक समस्या वाढू लागतात. केसांच्या समस्या वाढू लागल्यानंतर सुरुवातीला महिला दुर्लक्ष करतात, पण कालांतराने समस्या आणखीनच वाढून केसांमध्ये टक्कल पडण्याची भीती असते. कोणाचाही सल्ल्याने कोणतेही चुकीचे हेअर केअर प्रॉडक्ट खरेदी केले जातात. याशिवाय केस चमकदार दिसण्यासाठी महागड्या हेअर ट्रीटमेंट, हेअर स्पा याशिवाय हेअर मास्क लावून केसांची खूप जास्त काळजी घेतली जाते. पण सतत केमिकल युक्त ट्रीटमेंट केल्यामुळे केसांची गुणवत्ता खराब होऊन जाते. केसांची गुणवत्ता सुधारण्यासाठी कायमच महागड्या हेअर केअरचा वापर करण्याऐवजी नैसर्गिक आणि घरगुती पदार्थांचा वापर करावा. आज आम्ही तुम्हाला मेथी दाण्यांचा वापर कशा पद्धतीने करावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. (फोटो सौजन्य – istock)
केसांच्या वाढीसाठी मेथी दाण्यांचा वापर केला जातो. मेथी दाण्यांमध्ये असलेले गुणकारी घटक केस अतिशय सुंदर आणि मुलायम करतात. याशिवाय केसांमध्ये वाढलेले कोंडा कमी करण्यासाठी मेथी दाण्यांचा वापर करावा. केसांच्या समस्या दूर करण्यासाठी मेथी दाण्यांच्या पाण्याने केस स्वच्छ करावेत. यामुळे हिवाळ्यात वाढलेल्या केसांच्या समस्या दूर होतील.
धूळ, माती आणि वातावरणात होणाऱ्या बदलांचा परिणाम आरोग्यासोबतच केसांवर सुद्धा लगेच दिसून येतो. जास्त वेळ उन्हात फिरल्यामुळे केस अतिशय कोरडे होऊन जातात. कोरडे झालेले केस खूपच निस्तेज आणि रुक्ष दिसतात. अशावेळी केसांची गुणवत्ता सुधारण्यासाठी मेथी दाण्यांच्या पाण्याने केस स्वच्छ धुवावेत. याशिवाय मेथी दाण्यांचा हेअर मास्क केसांवर लावून काहीवेळ तसाच ठेवावे. त्यानंतर केस पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. मेथी दाण्यांमध्ये अँटी-इन्फ्लेमेटरी आणि अँटी-फंगल गुणधर्म मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. यामुळे केसांमध्ये वाढलेला कोंडा नष्ट होतो.
वाढत्या थंडीत रोज अंघोळ करावी का? रिसर्चमध्ये करण्यात आला आश्चर्यकारक खुलासा, कारण वाचून व्हाल आनंदी
रात्री झोपण्याआधी एक मग पाण्यात दोन चमचे मेथी दाणे भिजत घालावे. रात्रभर मेथी दाणे भिजल्यानंतर सकाळी उठल्यावर मेथी दाणे गाळून घ्या. त्यानंतर पाण्याचा वापर करून केस स्वच्छ धुवा. केस धुवण्यासाठी अतिशय सौम्य शाम्पूचा वापर करावा. यामुळे केस कोरडे होत नाही. वारंवार केस धुवण्यासाठी शाम्पूचा वापर करू नये. याशिवाय आठवड्यातून एकदाच किंवा दोनदाच केस स्वच्छ धुवावे. सतत केस धुतल्यामुळे केसांमधील नैसर्गिक तेल नष्ट होऊन केस कोरडे होतात.






