फोटो सौजन्य: Freepik
या आपल्या प्रगतशील देशात ऑटोमोबाईल क्षेत्र सुद्धा प्रगत होताना दिसत आहे. कधी इलेक्टिक तर कधी हायब्रीड कार्स मार्केटमध्ये आपली हवा करत आहेत. यात बाईकसुद्धा मागे नाही आहे. आधी साधे फीचर्स असणारी बाईकसुद्धा हायटेक बनत आहे. इलेक्ट्रिक बाइक तर आहेस पण आता तर CNG बाईकसुद्धा मार्केटमध्ये दाखल होणार आहे. पण आता ज्याप्रमाणे गाड्या हायटेक बनत चाल्या आहेत त्याच प्रमाणे हायटेक हेल्मेट्स सुद्धा मार्केटमध्ये दाखल होताना दिसत आहे. जाणून घेऊया या हायटेक हेल्मेट्सबद्दल.
स्टीलबर्ड नावाच्या कंपनीने या हेल्मेट्सची निर्मिती केली असून, हे हेल्मेट्स ब्लूटूथ आणि एलईडी लाइट्स सह येतात. या हेल्मेटची किंमत ३९९९ रुपये ठेवण्यात आली आहे. जी नक्कीच सर्वसाम्यांना परवडणारी नाही. याशिवाय या हेल्मेटमध्ये इतरही अनेक उत्तम फीचर्स आहेत.
सुरक्षित हेल्मेट, सुरक्षित प्रवास
स्टीलबर्डचे हे हेल्मेट आयएसआय प्रमाणित आहे म्हणजेच हे हेल्मेट सर्व सुरक्षांची पूर्तता करते. याशिवाय, हे हेल्मेट उच्च गुणवत्तेच्या ABS शेलपासून बनविलेले आहे जे तुम्हाला समोरील किंवा इतर बाजूने होणाऱ्या टक्करपासून वाचवते. एवढेच नाही तर या हायटेक हेल्मेटमध्ये मल्टी-डेन्सिटी ईपीएस लाइनिंग देखील देण्यात आली आहे, जे अपघातादरम्यान होणाऱ्या धक्क्यांपासून तुम्हाला सुरक्षित ठेवते.
आरामदायक
हेल्मेट बनवताना कंपनीने त्याला जास्तीत जास्त आरामदायी कसे बनावट येईल या गोष्टीवर बारकाईने लक्ष दिले आहे. या नवीन हेल्मेटमध्ये, एअर चॅनेलसह एकापेक्षा जास्त व्हेंट देखील दिले गेले आहे जे तुम्हाला ताजी हवा देतात. या हेल्मेटमध्ये हवेशीर पॅडिंग आहे जे तुम्हाला लांबच्या प्रवासातही आरामदायी राइडचा अनुभव देऊ शकते.
हटके डिझाइन
या स्टीलबर्ड हेल्मेटची रचना अगदी अनोखी आहे. कंपनीने यामध्ये फ्लिप अपची सुविधा दिली आहे, म्हणजेच हेल्मेट न काढता तुम्ही पाणी आणि कोल्ड्रिंक्स पिऊ शकता. याशिवाय या हेल्मेटमध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी देण्यात आली आहे जी तुम्हाला लांबच्या प्रवासात गाणी ऐकण्यास मदत करते. याशिवाय या हेल्मेटमध्ये एलईडी दिवे देखील देण्यात आले आहेत जे तुम्हाला रात्रीच्या वेळी वेगळा लुक देतात.