(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
मराठी कलाविश्वात अनेक कलाकार लग्नबंधणात अडकत आहेत. या नवीन वर्षात अनेक टीव्ही अभिनेत्रींचा विवाहसोहळा पार पडला. नुकतीच एक मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्री रेवती लेलेचा विवाहसोहळा मोठ्या थाटात पार पडला आहे. तिच्या लग्नसोहळ्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गेल्या काही दिवसांपासूनच रेवतीच्या लग्नाची चर्चा सुरू होती. अभिनेत्रीने ग्रहमुख तसेच मेंदीचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते. तर काही दिवसांपूर्वी तिने अंगठीचे फोटो शेअर केले होते. तेव्हापासून चाहत्यांना उत्सुकता होती तिचा नवरा कोण आहे, हे जाणून घेण्याची.
आता रेवती लग्नबंधनात अडकली असून तिच्या नवरा कोण हेही समोर आले आहे. अभिनेत्रीने तिच्या लग्नसोहळ्यासाठीपिवळ्या रंगाची साडी नेसली आहे.तसेच, मोजके साधे दागिने तिने परिधान केले आहेत.हातात हिरव्या बांगड्या, मुंडावळ्या असा तिचा साधा सिंपल लूकने लक्ष वेधून घेत आहे.
सोशल मीडियावर सध्या रेवतीच्या लग्नाचे फोटो व्हायरल होत आहेत. लग्नातील काही खास फोटो चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.काही फोटोंमध्ये या दोघांवर फुलांची उधळण होत असल्याचे दिसत आहे. हे फोटो शेअर करताना कौशिकने हे यु असे कॅप्शन दिले आहे. त्यावर रेवतीने हॅलो हसबन्ड असे लिहित हार्ट इमोजी शेअर केल्या आहेत. त्यावर कौशिकने बायको अशी कमेंट केली आहे.
रेवती लेले आणि कौशिकच्या या पोस्टवर अनेकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.चाहत्यांसोबत कलाकारांनीदेखील कमेंट्स करत या नवदांपत्याला शुभेच्छा दिल्या आहेत.
”नांदा सौख्यभरे”, ”आनंदी राहा”, ”अभिनंदन”, ”अभिनंदन सुंदरी”, अशा अनेक कमेंट्स चाहत्यांनी या पोस्टवर दिल्या आहेत. तर हृता दुर्गुळे, समृद्धी केळकर, यशोमन आपटे, मधुरा जोशी, ऋतुजा कुलकर्णी, विशाल निकम, संग्राम सामेल अशा अनेक कलाकारांनी शुभेच्छा दिल्या आहेत.






