Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Sankashti Chaturthi |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अतिरिक्त पैसे मोजायची तयारी ठेवा! महाराष्ट्रात ‘ही’ टॅक्सी सेवा महागणार, मंत्री प्रताप सरनाईकांनी दिली माहिती

महाराष्ट्रात इलेक्ट्रिक दुचाकी टॅक्सी सेवेसाठी भाडेदर निश्चित असणार अशी ,माहिती राज्यचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Sep 15, 2025 | 09:28 PM
महाराष्ट्रात 'ही' टॅक्सी सेवा महागणार, मंत्री प्रताप सरनाईकांनी दिली माहिती

महाराष्ट्रात 'ही' टॅक्सी सेवा महागणार, मंत्री प्रताप सरनाईकांनी दिली माहिती

Follow Us
Close
Follow Us:

महाराष्ट्रात इलेक्ट्रिक दुचाकी टॅक्सी सेवेसाठी भाडेदर निश्चित असणार अशी ,माहिती राज्यचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी दिली आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

महाराष्ट्र शासनाने “महाराष्ट्र बाईक-टॅक्सी नियम, २०२५” अंतर्गत राज्यात सेवा देणाऱ्या इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांचे भाडेदर जाहीर केले आहेत. मोटार वाहन अधिनियम, १९८८ च्या कलम ७३ व ९६ नुसार शासनाला मिळालेल्या अधिकारांचा वापर करून हा निर्णय घेण्यात आला असून, तो तात्काळ लागू होणार आहे. त्यामुळे नागरिकांना आता इलेक्ट्रिक दुचाकी टॅक्सी सेवा वापरताना योग्य दरातच पैसे द्यावे लागणार आहे.

GST कमी झाला अन् Toyota Fortuner चा ‘हा’ व्हेरिएंट एका झटक्यात 3 लाख रुपयांनी स्वस्त झाला

ठरवलेले भाडेदर

बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार इलेक्ट्रिक दुचाकी टॅक्सींसाठी प्रति किलोमीटर ₹ १०.२७ प्रमाणे प्रवासी भाडे आकारले जाणार आहे. याशिवाय पहिला टप्पा १.५ किमीचा असून प्राथमिक भाडे ₹ १५/- इतके अनिवार्य असेल. म्हणजेच प्रवास कितीही छोटा असो, किमान १५ रुपये त्यांच्याकडून आकारले जाणार असून, त्यानंतर प्रत्येक किलोमीटरला १०.२७ रुपयांप्रमाणे दर लागू होतील.

परवाना व कार्यक्षेत्र

राज्य परिवहन प्राधिकरणाने तीन प्रमुख कंपन्यांना (उबेर इंडिया सिस्टीम्स प्रा. लि., रॅपिडो ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिसेस प्रा. लि., व ॲनी टेक्नॉलॉजीज प्रा. लि.) तात्पुरता “मुंबई महानगर क्षेत्रासाठी प्राव्हिजनल लायसन्स” मंजूर केला आहे.

या परवान्याची मुदत 30 दिवसांची असून, त्यानंतर अंतिम लायसन्ससाठी अर्ज करावा लागेल. तात्पुरत्या परवान्यातील सर्व अटी-शर्ती मान्य करूनच कंपन्यांना पुढील लायसन्स देण्यात येईल.

Hero Splendor Plus की Bajaj Platina, जीएसटी कमी झाल्यानंतर कोणती बाईक जास्त स्वस्त?

या निर्णयामागे राज्य सरकारचा नेमका उद्देश काय?

या निर्णयामुळे प्रवाशांना स्वस्त, सोयीस्कर व पर्यावरणपूरक प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे. इलेक्ट्रिक दुचाकी टॅक्सींच्या माध्यमातून वाहतुकीवरील ताण कमी होऊन, प्रदूषणाला आळा बसण्यास मदत होईल, असा विश्वास राज्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला आहे.

थोडक्यात समजून घ्या

किमान भाडे : ₹१५/- (पहिले १.५ किमी साठी)

त्यानंतरचा दर : ₹१०.२७ प्रति किलोमीटर

कंपन्या : उबेर, रॅपिडो आणि ॲनी टेक्नॉलॉजीज यांना परवाना

प्रायोगिक सेवा : सुरुवातीला मुंबई महानगर क्षेत्रात सुरू

Web Title: Maharashtra will have fixed fares for electric two wheeler taxi services transport minister pratap sarnaik

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 15, 2025 | 09:27 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • e bike taxi
  • Pratap Saranaik
  • Taxi Service

संबंधित बातम्या

GST कमी झाला अन् Toyota Fortuner चा ‘हा’ व्हेरिएंट एका झटक्यात 3 लाख रुपयांनी स्वस्त झाला
1

GST कमी झाला अन् Toyota Fortuner चा ‘हा’ व्हेरिएंट एका झटक्यात 3 लाख रुपयांनी स्वस्त झाला

Hero Splendor Plus की Bajaj Platina, जीएसटी कमी झाल्यानंतर कोणती बाईक जास्त स्वस्त?
2

Hero Splendor Plus की Bajaj Platina, जीएसटी कमी झाल्यानंतर कोणती बाईक जास्त स्वस्त?

Tata Motors च्या ‘या’ 3 एसयूव्ही भारतीय ऑटोमोबाईल मार्केटसाठी गेम चेंजर ठरणार, किंमत तर अगदी स्वस्त
3

Tata Motors च्या ‘या’ 3 एसयूव्ही भारतीय ऑटोमोबाईल मार्केटसाठी गेम चेंजर ठरणार, किंमत तर अगदी स्वस्त

Royal Enfield ची ‘ही’ बाईक झाली अपडेट, नव्या फीचर्ससह लवकरच होणार लाँच
4

Royal Enfield ची ‘ही’ बाईक झाली अपडेट, नव्या फीचर्ससह लवकरच होणार लाँच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.