जीएसटी कमी झाल्यानंतर कोणती बाईक जास्त स्वस्त? (फोटो सौजन्य: X.com)
कार असो की बाईक, कोणतेही वाहन खरेदी करताना आपल्याला GST द्यावाच लागतो. मात्र, जीएसटीचे दर जास्त असल्याकारणाने अनेक जणांची ही मागणी होती की याचे दर कमी करण्यात यावे. अखेर केंद्र सरकारने जीएसटीतील दर कमी केल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. यामुळे कारसोबतच बजेट फ्रेंडली बाईकच्या किमती सुद्धा कमी झाल्या आहेत.
भारतीय बाजारपेठेत किफायतशीर कम्यूटर बाईक्सचा विचार केला तर Hero Splendor Plus आणि Bajaj Platina ही नावे नक्कीच आपल्या लक्षात येतात. नवीन जीएसटी दर 2025 लागू झाल्यानंतर या दोन्ही बाईक्स आणखी किफायतशीर ठरणार आहेत. टू-व्हीलर्सवरील जीएसटी दर 28% वरून कमी करून 18% करण्यात आला आहे, जो 22 सप्टेंबर 2025 पासून लागू होईल. आता पाहूया, जीएसटी कपातीनंतर Splendor किंवा Platina कोणती बाईक खरेदी करणे अधिक फायदेशीर ठरेल.
Tata Motors च्या ‘या’ 3 एसयूव्ही भारतीय ऑटोमोबाईल मार्केटसाठी गेम चेंजर ठरणार, किंमत तर अगदी स्वस्त
Hero Splendor Plus ची सध्याची किंमत 80,166 रुपये आहे. जीएसटी कपातीनंतर या बाईकची नवीन किंमत 73,903 रुपये असणार आहे. म्हणजेच किंमतीत तब्बल 6,263 रुपयांची घट होणार आहे. तर Bajaj Platina ची एक्स-शोरूम किंमत सध्या 70,611 रुपये आहे. जीएसटी कपातीनंतर ही किंमत 63,611 रुपये होईल. म्हणजेच जवळपास 7,000 रुपयांची बचत ग्राहकांना होणार आहे.
Hero Splendor Plus मध्ये i3S Fuel Saving Technology, ट्यूबलेस टायर्स, पुढे-मागे ड्रम ब्रेक्स आणि 9.8 लिटर फ्युएल टाकी अशी फीचर्स मिळतात. ही बाईक ब्लॅक, रेड, सिल्व्हर असे कलर ऑप्शन्स घेऊन उपलब्ध आहे.
तर Bajaj Platina मध्ये Spring-in-Spring Suspension रोड शॉक्स शोषून घेण्यासाठी, इलेक्ट्रिक स्टार्ट आणि ड्रम ब्रेक्स अशी फीचर्स देण्यात आली आहेत.
Studds कडून हाफ फेस हेल्मेटची नवी Vogue Series लाँच, आता मिळणार पहिल्यापेक्षा जास्त सुरक्षा
याशिवाय, प्लेटिनामध्ये 11 लिटरची फ्युएल टाकी, 117 किलो वजन, DRL, स्पीडोमीटर, फ्युएल गेज, टॅकोमीटर, अँटी-स्किड ब्रेकिंग सिस्टम आणि 200 मिमी ग्राउंड क्लीयरन्स दिलेला आहे.
जीएसटी कपातीनंतर Bajaj Platina 100 ची किंमत Hero Splendor Plus पेक्षा कमी असेल, त्यामुळे ती अधिक परवडणारी पर्याय ठरू शकते. मात्र शेवटी निवड तुमच्या गरज आणि बजेटनुसार करणेच योग्य ठरेल.