Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

लक्झरी SUV मध्ये दिसला कॅप्टन कूल Mahendra Singh Dhoni, किमतीचा आकडा वाचूनच भुवया उंचावतील

भारताचा कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीच्या कार कलेक्शनमध्ये अनेक लक्झरी कार आहे. नुकताच धोनी आपल्या आलिशान SUV मध्ये स्पॉट झाला आहे. चला या कारबद्दल अधिक जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Jun 29, 2025 | 06:28 PM
फोटो सौजन्य: @Dhoniismforlife (X.com)

फोटो सौजन्य: @Dhoniismforlife (X.com)

Follow Us
Close
Follow Us:

भारतीय मार्केटमध्ये लक्झरी कार्सची एक वेगळीच क्रेझ पाहायला मिळते. अनेक सेलिब्रेटी, क्रिकेटर्स आणि उच्च वर्गीय लोक नेहमीच लक्झरी कार्सचा समावेश आपल्या कार कलेक्शन करत असतात. भारताचा स्टार क्रिकेटर आणि कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीकडे सुद्धा अनेक आलिशान कार आहे.

नुकतेच भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी झारखंडची राजधानी रांचीमध्ये Citroen Basalt Dark Edition SUV चालवताना दिसला. त्याच्या शानदार कार आणि बाईक कलेक्शनसाठी प्रसिद्ध असलेला धोनी यावेळी स्टायलिश आणि प्रीमियम एसयूव्हीसह दिसला.

महेंद्रसिंग धोनीच्या कार कलेक्शनमध्ये आधीच मर्सिडीज-बेंझ G63 AMG, निसान जोंगा आणि जीप ग्रँड चेरोकी एसआरटी सारख्या लक्झरी कार आहेत. सिट्रोएन बेसाल्ट डार्क एडिशन ही धोनीची आवडती कार बनली आहे. या कारचे खास फीचर्स, सुरक्षितता आणि किंमत याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

Latest.📸 Enjoying life on the streets of Ranchi.🩵pic.twitter.com/LBb42XMGOS — Dhonism (@Dhoniismforlife) June 28, 2025

Mercedes Benz च्या कार झाल्या अजूनच महाग ! ‘या’ मॉडेल्सच्या किमतीत झाली लाखो रुपयांची वाढ

कसा आहे Citroen Basalt Dark Edition?

सिट्रोएन बेसाल्ट डार्क एडिशनला भारतातील NCAP क्रॅश टेस्टमध्ये 4-स्टार सेफ्टी रेटिंग मिळाली आहे, ज्यामुळे ही कार या सेगमेंटमधील सर्वात सुरक्षित SUV पैकी एक बनली आहे. यात 6 एअरबॅग्ज, EBD सह ABS, ट्रॅक्शन कंट्रोल आणि टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम (TPMS) सारखी महत्त्वाची सेफ्टी फीचर्स आहेत. या सर्व फीचर्समुळे केवळ महामार्गांवरच नव्हे तर शहरातील रस्त्यांवरही ही कार चालवणे सुरक्षित होते. अशा परिस्थितीत, ही कार कुटुंबासह प्रवास करणाऱ्यांसाठी एक उत्तम पर्याय बनते.

इंटिरिअर आणि टेक्नॉलॉजी

सिट्रोएन बेसाल्ट डार्क एडिशनमध्ये 10.25 इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आहे, जी वायरलेस अ‍ॅपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटोला सपोर्ट करते. याशिवाय, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल आणि वायरलेस चार्जर सारखे फीचर्स तिला उच्च दर्जाच्या ड्रायव्हिंग अनुभवात रूपांतरित करतात. जरी त्यात सनरूफ आणि मागील खिडकीच्या शेड्ससारख्या काही प्रीमियम फीचर्सचा अभाव असला तरी, तिच्या स्मार्ट इंटिरिअरमुळे ही कार अजूनही व्यावहारिक आणि आधुनिक अनुभव देते.

1 लाखापेक्षा कमी Down Payment केल्यास Tata Punch होईल का तुमची? असा असेल संपूर्ण हिशोब

डार्क एडिशनचे डिझाइन

सिट्रोएन बेसाल्ट डार्क एडिशनकडे पाहिल्यास, त्याची बोल्ड आणि स्पोर्टी डिझाइन आपल्याला पहिल्या दृष्टीक्षेपात प्रभावित करते. त्यात पर्ला नेरा ब्लॅक पेंट फिनिश, डार्क क्रोम ॲक्सेंट, ब्लॅक साइड मोल्डिंग आणि ग्लॉस ब्लॅक डोअर हँडल आणि बंपर आहेत. या एलिमेंट्समुळे, ही कार सामान्य एसयूव्हीपेक्षा वेगळी दिसते आणि एक वेगळी ओळख निर्माण करते. कदाचित हेच कारण असेल की क्रिकेट सुपरस्टार एमएस धोनीने हे कार त्याच्या कार कलेक्शनमध्ये समाविष्ट केली.

किंमत किती?

सिट्रोएन बेसाल्ट डार्क एडिशनची एक्स-शोरूम किंमत 12.30 लाख रुपये ठेवण्यात आली आहे, ज्यामुळे ती प्रीमियम परंतु स्वस्त अशी एसयूव्ही बनते. याचे डिझाइन, सेफ्टी फीचर्स आणि तंत्रज्ञान पाहता, ही किंमत ग्राहकांना परवडणारी वाटते.

Web Title: Mahendra singh dhoni spotted in citroen basalt dark edition know price and features

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 29, 2025 | 06:28 PM

Topics:  

  • automobile
  • M.S. Dhoni
  • Mahendra Singh Dhoni

संबंधित बातम्या

Acko चा महत्वाचा अहवाल, 34 टक्‍क्‍यांहून अधिक वाहतूकीसंदर्भातील गुन्‍ह्यांमध्‍ये हेल्‍मेट परिधान न करण्‍याचा समावेश
1

Acko चा महत्वाचा अहवाल, 34 टक्‍क्‍यांहून अधिक वाहतूकीसंदर्भातील गुन्‍ह्यांमध्‍ये हेल्‍मेट परिधान न करण्‍याचा समावेश

लवकरच धडाडेल Honda ची नवीन EV, Japan Mobility Show 2025 मध्ये दिसणार पहिली झलक
2

लवकरच धडाडेल Honda ची नवीन EV, Japan Mobility Show 2025 मध्ये दिसणार पहिली झलक

GST कमी झाल्याने Royal Enfield Hunter 350 साठी किती डाउन पेमेंट करावे लागेल?
3

GST कमी झाल्याने Royal Enfield Hunter 350 साठी किती डाउन पेमेंट करावे लागेल?

Nissan Motor India ची सप्टेंबर 2025 मध्ये धमाकेदार विक्री, मिळवली 9.3 टक्क्यांची वाढ
4

Nissan Motor India ची सप्टेंबर 2025 मध्ये धमाकेदार विक्री, मिळवली 9.3 टक्क्यांची वाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.