फोटो सौजन्य: Social Media
भारतीय ऑटोमोबाइल मार्केटमध्ये एसयूव्ही कार्सना नेहमीच मागणी मिळत असते. अनेक सेलिब्रेटीजपासून ते राजकीय पुढाऱ्यांपर्यंत, मोठ्या आणि प्रतिष्ठित व्यक्तींच्या कार कलेक्शनमध्ये एसयूव्ही असतेच असते. एसयूव्ही वापरण्याचे मुख्य कारण म्हणजे मिळणारा उत्तम परफॉर्मन्स आणि सेफ्टी फीचर्स.
भारतात अनेक एसयूव्ही आहेत ज्या त्यांच्या उत्तम फीचर्ससाठी ओळखल्या जातात. पण जेव्हा चर्चा एसयूव्हीची होत असते तेव्हा महिंद्रा कंपनीच्या कार्स नेहमीच यात टॉपवर असतात. कंपनी सुद्धा ग्राहकांच्या आवश्यकतेनुसार हाय परफॉर्मन्स असणाऱ्या एसयूव्ही लाँच करत असते. नुकतेच कंपनीच्या थार रॉक्सला 5 स्टार सेफ्टी रेटिंग मिळाली आहे.
आता Mahindra Thar Roxx ही प्रीमियम XUV असण्यासोबतच सर्वात सुरक्षित वाहन देखील बनले आहे. वास्तविक, महिंद्रा थार रॉक्सने भारत NCAP मध्ये 5-स्टार रेटिंग मिळवलेले आहे. 15 ऑगस्ट 2024 रोजी लाँच झालेल्या थार रॉक्सने प्रौढ रहिवाशांच्या सुरक्षिततेसाठी 32 पैकी 31.09 गुण आणि मुलांच्या सुरक्षिततेसाठी 49 पैकी 45 गुण मिळवले आहेत.
नवीन Kawasaki Ninja ZX-4RR पाहिली का?
भारतात NCAP क्रॅश टेस्टिंगमध्ये थार रॉक्सच्या AX5L आणि MX3 व्हेरियंटची टेस्टिंग घेण्यात आली आहे. Thar Rocks सोबत, Mahindra च्या UV400 आणि 3XO ला देखील भारतातील NCAP क्रॅश टेस्टिंगमध्ये 5-स्टार रेटिंग मिळाले आहे. चला या क्रॅश टेस्टिंगबद्दल अधिक जाणून घेऊया.
महिंद्रा थार रॉक्सचे नुकतेच इंडिया NCAP क्रॅश टेस्टिंग झाली आहे. ज्यामध्ये कारने प्रौढ प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी 16 पैकी 15.09 गुण मिळवले आहेत. रॉक्सने साइड मूव्हेबल डिफॉर्मेबल बॅरियर टेस्टमध्ये 16 पैकी 16 गुण मिळवले आहेत. टेस्टिंगमध्ये चालकाची छाती आणि पाय वगळता पुरेसे संरक्षण आढळले आहे. यासोबतच शरीराच्या इतर सर्व अवयवांनाही चांगले संरक्षण मिळाले आहे.
महिंद्रा थार रॉक्स ही अगदी लहान मुलांसाठीही पूर्णपणे सुरक्षित एसयूव्ही बनली आहे. कंपनीच्या कारला मुलांच्या सुरक्षिततेसाठी 5-स्टार रेटिंग देखील मिळाले आहे. मुलांच्या सुरक्षिततेसाठी, डायनॅमिक स्कोअरमध्ये 24 पैकी 24 गुण आणि CRS इंस्टॉलेशन स्कोअरमध्ये 12 पैकी 12 गुण मिळाले आहेत. त्याच वेळी, वाहन मूल्यमापन स्कोअरमध्ये 13 पैकी 9 गुण मिळाले आहे.
अनेक पेट्रोल डिझेल कार्स लाँच होत असल्या तरी तुम्ही इलेक्ट्रिक कारच का निवडावी?
प्रवाशांच्या सुरक्षेसाठी, महिंद्रा थार रॉक्समध्ये सहा एअरबॅग्ज, सर्व प्रवाशांसाठी 3-पॉइंट सीटबेल्ट, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल (ESC), आणि सर्व व्हेरियंटमध्ये सीट बेल्ट रिमाइंडर (SBR) आहेत. याव्यतिरिक्त, थार रॉक्स लेव्हल 2 ADAS वैशिष्ट्यांसह येतात ज्यात ऑटोमॅटिक इमर्जन्सी ब्रेकिंग (AEB), लेन डिपार्चर वॉर्निंग, लेन कीप असिस्ट, आणि 360-डिग्री सराउंड व्ह्यू सिस्टीमचा समावेश आहे. यासोबतच थार रॉक्स टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम (TPMS) आणि ब्रेक लॉकिंग डिफरेंशियल (BLD) सारख्या वैशिष्ट्यांनी सुसज्ज आहेत.