Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Marathi Mandatory: मोठी बातमी! आता ‘या’ वाहनचालकांनाही मराठी बंधनकारक, सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

राज्य सरकारने मराठी ज्ञान अनिवार्य करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले असून वाहनचालकांसाठी नियम ४, ७८ व ८५ मध्ये मोठे बदल प्रस्तावित केले आहेत. या बदलांमुळे वाहनचालकांना मराठीचे ज्ञान आवश्यक ठरणार आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Apr 24, 2026 | 12:33 PM
“व्यवसायिक वाहन चालकांनी व्यवहारिक मराठी शिकणे ही काळाची गरज”

“व्यवसायिक वाहन चालकांनी व्यवहारिक मराठी शिकणे ही काळाची गरज”

Follow Us
Follow Us:
  • मराठी ज्ञान अनिवार्यतेकडे सरकारचे निर्णायक पाऊल;
  • वाहनचालकांसाठी नियम ४, ७८ व ८५ मध्ये मोठे बदल प्रस्तावित
  • अनिवार्य करण्याची तरतूद प्रस्तावित करण्यात आली
मुंबई : राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत प्रवाशांशी सुसंवाद साधण्यासाठी मराठी भाषेचे महत्त्व अधोरेखित करत महाराष्ट्र शासनाने महत्त्वपूर्ण निर्णयाच्या दिशेने पाऊल टाकले आहे. महाराष्ट्र मोटार वाहन नियम, १९८९ मधील नियम ४, ७८ आणि ८५ मध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून, त्याअंतर्गत वाहनचालकांसाठी मराठी भाषेचे व्यवहारिक ज्ञान (‘वर्किंग नॉलेज’) अनिवार्य करण्याची तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे.

राज्याच्या परिवहन आयुक्तांनी यासंदर्भातील प्रस्ताव गृह विभागाकडे सादर केला असून, त्यानुसार मसुदा अधिसूचना काढण्याची प्रक्रिया सुरू आहे. प्रस्तावित बदलांनुसार, सार्वजनिक सेवा वाहन चालविण्याची परवानगी देताना अर्जदाराच्या चारित्र्य व पार्श्वभूमीबरोबरच मराठी भाषेचे व्यवहारिक ज्ञान तपासण्याचा अधिकार परवाना प्राधिकरणाला देण्यात येणार आहे.

Educational News: मराठी शाळा बंद पाडण्याचा शासनाचा डाव;  नेमकं काय आहे प्रकरण?

नवीन तरतुदीनुसार, सार्वजनिक सेवा वाहन चालविण्याची परवानगी (Authorization) देताना मराठी भाषेचे व्यवहारिक ज्ञान तपासले जाणार आहे. मीटर असलेल्या मोटार कॅब वाहनांसाठी परवान्यांच्या अतिरिक्त अटींमध्ये मराठी भाषेचे ज्ञान अनिवार्य करण्यात येणार आहे. विशेषतः ऑटो रिक्षा व टॅक्सी (मोटार कॅब) चालकांच्या परवाना नूतनीकरणाच्या वेळी मराठीचे ज्ञान दाखवणे बंधनकारक असेल. यामुळे राज्यातील रिक्षा व टॅक्सी चालकांना प्रवाशांशी मराठीत संवाद साधणे अधिक सुलभ होणार आहे.

हरकती व सूचना मागविण्याची प्रक्रिया सुरू

या मसुदा नियमांवर नागरिक, संघटना तसेच संबंधित घटकांकडून हरकती व सूचना मागविण्यात आल्या आहेत. अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर ३० दिवसांच्या आत प्राप्त होणाऱ्या सर्व सूचनांचा शासनाकडून विचार करण्यात येणार आहे.

सुसंवादातून सेवा अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न

या निर्णयामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत स्थानिक भाषेला प्राधान्य मिळणार असून, प्रवाशांना अधिक सुलभ व स्नेही सेवा मिळेल, अशी अपेक्षा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केली आहे.

महाराष्ट्र शासनाचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी नुकतीच एक महत्त्वाची घोषणा केली आहे. त्यांनी सांगितले की, १ मे २०२६, महाराष्ट्र दिनापासून, राज्यातील सर्व परवानाधारक ऑटोरिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषेचे ज्ञान अनिवार्य असेल. चालकांना मराठी वाचता, लिहिता आणि बोलता आले पाहिजे. जर एखादा चालक भाषेतील मूलभूत प्राविण्य दाखवण्यात अयशस्वी ठरला, तर त्याचा परवाना रद्द केला जाईल. परिवहन विभागाच्या ५९ प्रादेशिक आणि उप-प्रादेशिक कार्यालयांमार्फत राज्यभरात चालकांच्या मराठी भाषेतील प्राविण्याची चाचणी घेण्यासाठी एक विशेष मोहीम सुरू केली जाईल. या उपक्रमाचा उद्देश प्रवाशांशी संवाद सुधारणे आणि स्थानिक भाषेबद्दल आदर वाढवणे हा आहे.

Dharavi Redevelopment : शिवसेना नगरसेवकांची संयुक्त शिबिरांची मागणी; धारावी सर्वेक्षणाला गती देण्याचा प्रयत्न

Web Title: Marathi language mandatory decision government driver rules 4 78 85 changes proposed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 24, 2026 | 12:33 PM

Topics:  

  • Maharashtra Government
  • pratap sarnaik

संबंधित बातम्या

महिला शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! सातबारा नावावर नसला तरी मिळणार ‘शेतकरी’ प्रमाणपत्र; कृषिमंत्री भरणेंची घोषणा
1

महिला शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! सातबारा नावावर नसला तरी मिळणार ‘शेतकरी’ प्रमाणपत्र; कृषिमंत्री भरणेंची घोषणा

‘शिंदे आमचे नेते, त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहणार’; जरांगेंनी सरकारला तीन महिन्यांचा वेळ दिल्यानंतर सरनाईकांचं मोठं विधान
2

‘शिंदे आमचे नेते, त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहणार’; जरांगेंनी सरकारला तीन महिन्यांचा वेळ दिल्यानंतर सरनाईकांचं मोठं विधान

ST News : STच्या बसस्थानकांवर आता १२५ ‘हिरकणी कक्ष’; स्तनदा मातांसाठी मोठा निर्णय, टोयोटाच्या CSR निधीतून उभारणी
3

ST News : STच्या बसस्थानकांवर आता १२५ ‘हिरकणी कक्ष’; स्तनदा मातांसाठी मोठा निर्णय, टोयोटाच्या CSR निधीतून उभारणी

Jaykumar Rawal : ‘नोकरी शोधणारे नव्हे, नोकरी देणारे बना’; जयकुमार रावलांचं शेतकऱ्यांच्या मुलांना मोठं आवाहन
4

Jaykumar Rawal : ‘नोकरी शोधणारे नव्हे, नोकरी देणारे बना’; जयकुमार रावलांचं शेतकऱ्यांच्या मुलांना मोठं आवाहन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.