(फोटो सौजन्य-AI एआय)
बाहेरील लूकला मिळाला कॉपर टच
व्हिक्टोरिस ऑरम एडिशनमध्ये कॉपर रंगाचे इन्सर्ट्स हे मुख्य आकर्षण आहे. फ्रंट, साइड आणि रिअर स्किड प्लेट्स तसेच व्हील आर्चेसवर हे इन्सर्ट्स देण्यात आले आहेत. याशिवाय फ्रंट ग्रिल, फेंडर्स, बंपर्स, बॉडी-साइड मोल्डिंग्स आणि डोअर व्हायझर्सवर क्रोम गार्निश देण्यात आले आहे. या बदलांमुळे एसयूव्हीच्या बाहेरील लूकला वेगळी ओळख मिळते. ‘ऑरम’ हा लॅटिन शब्द असून त्याचा अर्थ सोने असा होतो.
मारुती सुझुकी ऑल्टो आणि एस-प्रेसोच्या किमती वाढवणार नाही; बजेट कार खरेदीदारांना दिलासा
केबिनमध्येही खास अॅक्सेसरीज
या स्पेशल एडिशनच्या केबिनमध्ये ऑल-वेदर 3D फ्लोअर मॅट्स, 3D बूट मॅट आणि रिअर ट्रंक सिल गार्ड देण्यात आले आहेत. हे बदल प्रामुख्याने गाडीचे सेफ्टी आणि वापरातील सोयी लक्षात घेऊन करण्यात आले आहेत. अभिनेता शाहिद कपूरला या एडिशनच्या जाहिरात campaign साठी निवडण्यात आले आहे.
विक्रीचा विक्रम आणि इंजिनचे ऑप्शन्स
मारुती सुझुकीच्या दाव्यानुसार, व्हिक्टोरिसने लाँचनंतर भारतात 1 लाख आणि 1.5 लाख युनिट्सच्या एकत्रित विक्रीचा टप्पा सर्वात वेगाने गाठला. या यशाच्या पार्श्वभूमीवर ऑरम एडिशन सादर करण्यात आले आहे.
व्हिक्टोरिसमध्ये 1.5-लिटर पेट्रोल, पेट्रोल-सीएनजी आणि 1.5-लिटर स्ट्राँग हायब्रिड असे पॉवरट्रेन ऑप्शन्स मिळतात. पेट्रोल इंजिन 103.06 PS पॉवर आणि 139 Nm टॉर्क देते. सीएनजी व्हेरिएंटमध्ये पेट्रोल मोडमध्ये 100.6 PS पॉवर, तर सीएनजी मोडमध्ये 87.8 PS पॉवर मिळते. स्ट्राँग हायब्रिड व्हेरिएंटमध्ये पेट्रोल इंजिन आणि इलेक्ट्रिक मोटरचे कॉम्बिनेशन आहे. ट्रान्समिशनसाठी 5-स्पीड मॅन्युअल, 6-स्पीड ऑटोमॅटिक आणि e-CVT असे ऑप्शन्स आहेत. त्यामुळे ऑरम एडिशनमध्ये लूकला प्राधान्य देणाऱ्या कस्टमर्सना हायब्रिड टेक्नोलॉजीसह खास स्टाइल मिळणार आहे.
मारुती सुझुकीने भारतात विकल्या 65 लाखांहून जास्त जुन्या कार! ‘ट्रू व्हॅल्यू’ स्कीमचा जंगी विक्रम!
💡 Frequently Asked Questions
प्रश्न 1: मारुती सुझुकी व्हिक्टोरिस ऑरम एडिशनची किंमत किती आहे?
उत्तर: ऑरम एडिशनच्या अॅक्सेसरी किटची किंमत 22,990 रुपये आहे. ही किंमत संपूर्ण गाडीची किंमत नसून स्पेशल अॅक्सेसरी किटसाठी आहे.
प्रश्न 2: व्हिक्टोरिस ऑरम एडिशन कोणत्या व्हेरिएंटमध्ये मिळते?
उत्तर: हे स्पेशल एडिशन फक्त व्हिक्टोरिसच्या स्ट्राँग हायब्रिड व्हेरिएंटमध्ये अव्हेलेबल आहे.
प्रश्न 3: ऑरम एडिशनमध्ये इंजिन किंवा परफॉर्मन्समध्ये बदल करण्यात आले आहेत का?
उत्तर: नाही. या एडिशनमध्ये इंजिन आणि परफॉर्मन्समध्ये बदल करण्यात आलेले नाहीत. यात प्रामुख्याने बाहेरील कॉपर इन्सर्ट्स, क्रोम गार्निश आणि केबिन अॅक्सेसरीज देण्यात आल्या आहेत.






