किम जोंग उन अचानक चीनमध्ये दाखल झाले आणि त्यांनी चिनी नेते वांग हुनिंग यांची भेट घेतली, ज्यामुळे दक्षिण कोरियामध्ये खळबळ उडाली ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
उत्तर पूर्व आशियातील राजकारणाला रविवारी एक नवा आणि अनपेक्षित वळण मिळाले, जेव्हा उत्तर कोरियाचे सर्वोच्च नेते किम जोंग उन (Kim Jong Un) यांनी चीनच्या सीमावर्ती दांडोंग शहराला अनपेक्षित भेट दिली. उत्तर कोरियाची सरकारी वृत्तसंस्था केसीएनए (KCNA) ने दिलेल्या माहितीनुसार, किम जोंग उन यांच्या या गुप्त आणि अचानक झालेल्या दौऱ्यामुळे दक्षिण कोरियासह पाश्चात्य देशांच्या राजनैतिक वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. या दौऱ्यात किम यांनी चीनचे चौथे सर्वात वरिष्ठ नेते वांग हुनिंग यांची भेट घेतली आणि दोन्ही देशांमधील ऐतिहासिक तसेच सामरिक सहकार्य अधिक मजबूत करण्याचे स्पष्ट संकेत दिले.
दक्षिण कोरियाची प्रसिद्ध वृत्तसंस्था योनहापने उत्तर कोरियाच्या अधिकृत माध्यमांचा हवाला देत स्पष्ट केले आहे की, किम जोंग उन यांच्यासोबत उत्तर कोरियातील सत्ताधारी वर्कर्स पार्टीचे आणि सरकारमधील उच्चपदस्थ अधिकारी उपस्थित होते. या महत्त्वपूर्ण शिष्टमंडळात उत्तर कोरियाच्या परराष्ट्र मंत्री चो सोन हुई, किम जोंग उन यांची अत्यंत प्रभावशाली बहीण किम यो जोंग आणि पक्षाचे वरिष्ठ नेते जो योंग वॉन यांचा समावेश होता.
चीनी बाजूने या बैठकीचे प्रतिनिधित्व चिनी कम्युनिस्ट पक्षाचे वरिष्ठ नेते आणि चिनी पीपल्स पोलिटिकल कॉन्सुलेटिव्ह कॉन्फरन्सचे अध्यक्ष वांग हुनिंग यांनी केले. त्यांच्यासोबत चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्यासह अनेक उच्चपदस्थ अधिकारी उपस्थित होते. या उच्चस्तरीय बैठकीत दोन्ही देशांमधील आर्थिक, लष्करी आणि व्यापारविषयक संबंध आणखी मजबूत करण्यावर सविस्तर चर्चा झाली.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Starlink Ukraine: मस्क यांच्या एका निर्णयाने युक्रेन सैन्याची धावपळ; आक्रमक ड्रोन हल्ल्यांवर स्टारलिंकने लावले निर्बंध
सप्टेंबर २०२५ मधील बीजिंग दौऱ्यानंतर किम जोंग उन यांचा हा पहिलाच ज्ञात चीन दौरा आहे. यापूर्वी त्यांनी दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीच्या ८० व्या वर्पनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमांसाठी चीनला भेट दिली होती आणि राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेतली होती. २०११ मध्ये सत्तेवर आल्यापासून किम जोंग उन यांचा हा चीनचा सहावा दौरा ठरला आहे.
या भेटीदरम्यान वांग हुनिंग यांनी चिनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या वतीने किम जोंग उन यांना शुभेच्छा संदेश आणि आदर व्यक्त केला. शी जिनपिंग यांच्या विशेष सूचनेनुसार किम जोंग उन यांच्या स्वागतासाठी एका भव्य मेजवानीचे आयोजन करण्यात आले होते. याशिवाय किम जोंग उन यांनी दांडोंग येथील एका मोठ्या बस उत्पादन कारखान्याला भेट देऊन चिनी औद्योगिक प्रगतीची पाहणी केली.
या दौऱ्याला अत्यंत भावूक आणि ऐतिहासिक संदर्भही लाभला होता. चीन सध्या १९५० ते १९५३ दरम्यान झालेल्या ऐतिहासिक कोरियन युद्धातील आपल्या सहभागाचा ७६ वा वर्धापन दिन साजरा करत आहे. या निमित्ताने किम जोंग उन यांनी युद्धादरम्यान उत्तर कोरियाच्या रक्षणार्थ प्राण गमावलेल्या चिनी सैनिकांच्या स्मारकाला भेट देऊन पुष्पचक्र अर्पण केले आणि आदरांजली वाहिली.
केसीएनएने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, या प्रसंगी बोलताना किम जोंग उन म्हणाले, “उत्तर कोरियन क्रांतीचे आणि आमच्या भूमीचे रक्षण करण्यासाठी ज्या चिनी सैनिकांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले, त्यांचे हे योगदान उत्तर कोरिया आणि तेथील जनता कधीही विसरणार नाही.” रक्ताने निर्माण झालेले हे संबंध आणि दोन्ही देशांतील पारंपरिक मैत्री येणाऱ्या काळात आणखी घट्ट केली जाईल, असा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Saudi Arabia : सौदी विमानतळावर हुथींचा भीषण हल्ला; बुधवारच्या हल्ल्यात एक ठार; अमेरिकेने दिला कठोर इशारा
किम जोंग उन यांच्या या गुप्त भेटीमुळे दक्षिण कोरिया, जपान आणि अमेरिकेच्या गुप्तचर संस्था सतर्क झाल्या आहेत. वॉशिंग्टन आणि सेऊल यांच्यातील वाढत्या लष्करी सहकार्याच्या पार्श्वभूमीवर चीन आणि उत्तर कोरिया एकत्र येत असल्याचे या भेटीवरून दिसून येते. तज्ज्ञांच्या मते, उत्तर कोरियावरील आंतरराष्ट्रीय निर्बंध आणि आर्थिक अडचणींच्या काळात चीनचा हा पाठिंबा किम प्रशासनासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जात आहे. सीमावर्ती भाग असलेल्या दांडोंग शहर हे दोन्ही देशांमधील व्यापाराचे मुख्य केंद्र असल्याने या भेटीतून आर्थिक देवाणघेवाण वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
Ans: उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांनी चीनच्या सीमावर्ती शहर 'दांडोंग'ला (Dandong) अनपेक्षित भेट दिली.
Ans: त्यांनी चीनचे वरिष्ठ नेते वांग हुनिंग (Wang Huning) आणि परराष्ट्र मंत्री वांग यी (Wang Yi) यांची भेट घेतली.
Ans: उत्तर कोरिया आणि चीनमधील ऐतिहासिक संबंध अधिक मजबूत करणे, आर्थिक सहकार्य वाढवणे आणि कोरियन युद्धातील चिनी सैनिकांना आदरांजली वाहणे हा या दौऱ्याचा मुख्य उद्देश होता.






