Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

यासाठी पेट्रोलियम मंत्री नाही तर,नितीन गडकरी बोलतात ‘इथेनॉल ब्लेंडिंगच्या’ विषयांबद्दल!गडकरींच्या मुलाखतीतील हे वक्तव्य जाणून घ्या

वाढते प्रदूषण आणि २२ लाख कोटींची इंधन आयात रोखून देशातील शेतकऱ्यांना 'इंधनदाता' बनवण्यासाठी नितीन गडकरी इथेनॉल ब्लेंडिंगचा सातत्याने आग्रह धरत आहेत. वाहनांचे इंजिन निकष आणि तांत्रिक मंजुरी थेट रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या अंतर्गत येत असल्याने पेट्रोलियम मंत्री नसतानाही ते या पर्यायी इंधनावर ठामपणे भूमिका मांडत आहेत.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Jul 14, 2026 | 05:39 PM
यासाठी पेट्रोलियम मंत्री नाही तर,नितीन गडकरी बोलतात ‘इथेनॉल ब्लेंडिंगच्या’ विषयांबद्दल!गडकरींच्या मुलाखतीतील हे वक्तव्य जाणून घ्या
Follow Us
Follow Us:

गेल्या काही काळापासून ते देशात ‘इथेनॉल ब्लेंडिंग’ आणि जैव-इंधनाविषयी सातत्याने आग्रही भूमिका मांडल्या जात आहेत. साहजिकच अनेकांच्या मनात प्रश्न येतो की, इंधन आणि पेट्रोलियमशी संबंधित हा विषय असताना पेट्रोलियम मंत्र्यांऐवजी नितीन गडकरी यावर का बोलतात? नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीमध्ये त्यांनी स्वतः यामागचे तांत्रिक कारण आणि देशाच्या हिताचे गणित सविस्तर मांडले आहे.

२२ लाख कोटींची आयात आणि वायू प्रदूषणाचा मोठा धोका

नितीन गडकरी यांनी सांगितले की, भारत दरवर्षी तब्बल २२ लाख कोटी रुपयांचे कच्चे फ्युएल (पेट्रोल, डिझेल आणि गॅस) परदेशातून आयात करतो. एवढा मोठा पैसा देशाबाहेर जात आहे. यासोबतच, देशातील एकूण वायू प्रदूषणापैकी ४० टक्के प्रदूषण हे केवळ गाड्यांच्या धुरामुळे होते. दिल्लीसारखी मोठी शहरे आज या प्रदूषणाचा तीव्र सामना करत असून, तिथल्या नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे. हा धोका आणि परकीय चलनाचे नुकसान टाळण्यासाठी जैव-इंधन, ‘इथेनॉल ब्लेंडिंग’ हाच एकमेव पर्याय आहे.

E-20 पेट्रोल भरलं तर जबाबदारी तुमची, सरकारकडून हाथ वरती? पेट्रोल पंपावर लागले होर्डिंग्ज, नेमकं प्रकरण काय?

२२ लाख कोटी रुपये थेट भारतीय शेतकऱ्यांच्या खिशात जाणार

देशाबाहेर जाणारे २२ लाख कोटी रुपये वाचवून ते आपल्या देशातील शेतकऱ्यांच्या हातात जावेत, हा गडकरींचा मुख्य उद्देश आहे. केंद्र सरकारने मका आणि उसापासून इथेनॉल बनवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. पूर्वी बाजारात मक्याला केवळ १,२०० रुपये प्रति क्विंटल एवढाच भाव मिळायचा. मात्र, इथेनॉल निर्मितीच्या निर्णयामुळे मक्याचा दर थेट २,६०० ते २,८०० रुपयांपर्यंत वाढला आहे. या एका धोरणामुळे देशातील शेतकऱ्यांच्या घरात इथेनॉलच्या माध्यमातून अतिरिक्त २ लाख कोटी रुपये जमा झाले आहेत, असे गडकरींच्या वक्तव्यातून स्पष्ट होते..

शेतकरी आता फक्त ‘अन्नदाता‘ नाही, तर ‘इंधनदाता‘ बनणार

२००४ पासून, जेव्हा नितीन गडकरी मंत्रीही नव्हते, तेव्हापासून स्वदेशी, स्वावलंबन आणि राष्ट्रवाद ही त्यांची मुख्य तत्त्वे राहिली आहेत. भारताला ऊर्जा क्षेत्रात ‘आत्मनिर्भर’ बनवणे हे त्यांचे स्वप्न आहे. भारताचा शेतकरी केवळ ‘अन्नदाता’ राहू नये, तर तो देशाचा ‘इंधनदाता’ बनावा आणि सर्व प्रकारची संसाधने शेतकऱ्यांच्या हातात असावीत, जेणेकरून गावांचा विकास होईल आणि ग्रामीण तरुण-शेतकऱ्यांना रोजगार मिळेल. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकट करण्यासाठी ते एका समाजसेवकाच्या भूमिकेतून या विषयाचा पाठपुरावा करत आहेत, असा एकंदरीत त्यांच्या बोलण्याचा सारांश आहे.

‘भारत आता इंधनाची आयात नाही, तर निर्यात करणार’, नवभारत कॉन्क्लेव्हमध्ये नितीन गडकरींनी सांगितला देशाचा पैसा वाचवण्याचा महाप्लॅन

नितीन गडकरी पेट्रोलियम मंत्री नसतानाही यावर का बोलतात?

यामागचे मुख्य तांत्रिक कारण त्यांच्या मंत्रालयाची जबाबदारी आहे, असे नितीन गडकरी सांगतात. नितीन गडकरी यांच्या रस्ते वाहतूक मंत्रालयाकडे वाहनांचे इंजिन, मशीनचे निकष आणि त्यांच्या सुट्या भागांना पासिंग देणे या गोष्टी येतात. त्यामुळे गाड्यांमध्ये हायड्रोजन, इलेक्ट्रिक किंवा इथेनॉलवर चालणारी ‘फ्लेक्स-फ्यूल इंजिन’ कशी आणायची, हा थेट त्यांच्या मंत्रालयाचा भाग आहे.

  • इंधनात किती टक्के काय मिसळायचे किंवा वजा करायचे, हे काम पेट्रोलियम मंत्रालयाचे असते.
  • इथेनॉलचे दर केंद्रीय कॅबिनेट ठरवते आणि टेंडर प्रक्रियेद्वारे ते निश्चित केले जातात.
नितीन गडकरी केवळ रस्ते बांधणीपुरते मर्यादित न राहता, देशहित आणि समाजहिताचा विचार करून पर्यायी इंधनाचा प्रसार करत आहेत, असे त्यांच्या बोलण्यावरून सिद्ध होते. देशाचे पैसे वाचवणे, प्रदूषण कमी करणे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे या उद्देशाने ते इथेनॉल, मिथेनॉल, हायड्रोजन आणि इलेक्ट्रिक वाहनांबद्दल जाहीरपणे आणि ठामपणे भूमिका मांडत आहेत.

Web Title: Nitin gadakari on ethanol blending topics automobile news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 14, 2026 | 05:25 PM

Topics:  

  • automobile

संबंधित बातम्या

न्यू जनरेशन Audi Q3 चे बुकिंग भारतामध्ये अधिकृतपणे सुरू! लाँचपूर्वीच सुरू झाली प्रक्रिया
1

न्यू जनरेशन Audi Q3 चे बुकिंग भारतामध्ये अधिकृतपणे सुरू! लाँचपूर्वीच सुरू झाली प्रक्रिया

Honda UC3 VS TVS iQube: बजेट आणि रेंजच्या खेळात कोणती ई-स्कूटर ठरेल सर्वोत्तम? पाह इन डिटेल तुलना
2

Honda UC3 VS TVS iQube: बजेट आणि रेंजच्या खेळात कोणती ई-स्कूटर ठरेल सर्वोत्तम? पाह इन डिटेल तुलना

New Honda UC3 VS Honda QC3: फीचर्स, बॅटरी रेंज आणि डिझाईनच्या बाबतीत दोन्ही ई-स्कूटर कशा आहेत एकमेकींपेक्षा वेगळ्या?
3

New Honda UC3 VS Honda QC3: फीचर्स, बॅटरी रेंज आणि डिझाईनच्या बाबतीत दोन्ही ई-स्कूटर कशा आहेत एकमेकींपेक्षा वेगळ्या?

राडा होणार! पोरं नाय ऐकणार! 5.76 लाखांच्या Kawasaki Ninja 500 समोर Aprilia RS 457 कशी टिकणार?
4

राडा होणार! पोरं नाय ऐकणार! 5.76 लाखांच्या Kawasaki Ninja 500 समोर Aprilia RS 457 कशी टिकणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.