फोटो सौजन्य: Social Media
पूर्वी बाईक घेताना ग्राहक फक्त बाईकच्या मायलेज आणि किंमतीवर जास्त लक्ष केंद्रित करायचे. त्यावेळी बाईकची कार्यक्षमता, इंधनाची बचत आणि किंमत हेच मुख्य घटक मानले जात होते. मात्र, आजच्या बदलत्या ग्राहकांच्या अपेक्षा लक्षात घेऊन बाईक उद्योगात अनेक नवीन ट्रेंड्स आणि बदल आले आहेत. आजचा ग्राहक फक्त बाईकच्या मायलेजवर नाही, तर बाईकच्या लूक, डिझाइन, आरामदायकता आणि विविध फिचर्सवरही खूप लक्ष केंद्रित करतो.
भारतीय मार्केटमध्ये अनेक आकर्षक बाईक आहेत. पण आजही ग्राहकांमध्ये रॉयल एन्फिल्डच्या बाईक्सची क्रेझ काही औरच आहे. रॉयल एन्फिल्डच्या बाईक्स चालवणाऱ्यांचा एक वेगळाच थाट असतो. तसेच तरुण सुद्धा या बाईक खरेदी करण्यासाठी आतुर असतात.
Skoda Kylaq ची डिलिव्हरी झाली सुरु, बुक करण्याआधी जाणून घ्या फीचर्स आणि किंमत
कंपनीच्या बाइक्सना बाजारात मोठी मागणी आहे. या क्रमात, रॉयल एनफील्डच्या हंटर 350 बाईकने आपल्या नावावर एक नवा विक्रम केला आहे. खरंतर, कंपनीने आतापर्यंत रॉयल एन्फिल्डच्या हंटर 350 बाईकच्या पाच लाखांहून अधिक युनिट्स विकल्या आहेत.
हंटर 350 ऑगस्ट 2022 मध्ये भारतीय बाजारात लाँच करण्यात आली. फेब्रुवारी 2023 पर्यंतच या बाईकच्या एक लाख युनिट्स विकल्या गेल्या. यानंतर पुढील पाच महिन्यांत आणखी एक लाख युनिट्स विकले गेले. त्यानंतर, चांगल्या विक्रीच्या आधारावर रॉयल एन्फिल्डची ही बाईक आता ब्रँडची सर्वात लोकप्रिय बाईक बनली आहे. चला या बाईकच्या फीचर्स आणि किंमतीबद्दल जाणून घेऊया.
रॉयल एन्फिल्ड हंटर 350 ही ब्रँडच्या सर्वात परवडणाऱ्या बाईक्सपैकी एक मानली जाते. या बाईकच्या एक्स-शोरूम किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, ती १.५ लाख रुपयांपासून सुरू होते आणि १.७५ लाख रुपयांपर्यंत जाते. त्यामुळेच तर ही बाईक बजेटमध्ये बसते आणि याची विक्री सुद्धा झपाट्याने वाढते.
भारताव्यतिरिक्त, ब्रिटिश वाहन उत्पादकांची ही बाईक इंडोनेशिया, जपान, कोरिया, थायलंड, फ्रान्स, जर्मनी, इटली आणि युनायटेड किंग्डमसह अनेक देशांमध्ये विकली जाते. याशिवाय मेक्सिको, ऑस्ट्रेलिया आणि ब्राझीलमध्येही या बाईकला चांगली मागणी आहे.
भारतात जुनी वाहने बाजारपेठ झपाट्याने विस्तारत; 2030 पर्यंत विक्रीत मोठी वाढ अपेक्षित
ही रॉयल एन्फिल्ड मोटरसायकल 349 सीसी, सिंगल-सिलेंडर, 4-स्ट्रोक, एअर-ऑइल कूल्ड इंजिनने सुसज्ज आहे, जी इंधन इंजेक्शन सिस्टमने देखील सुसज्ज आहे. हंटर 350 वरील हे इंजिन 6,100 आरपीएम वर 20.2 बीएचपी पॉवर निर्माण करते आणि 4,000 आरपीएम वर 27 एनएम टॉर्क जनरेट करते. बाईकमध्ये इंजिनसोबत 5-स्पीड गिअरबॉक्स देखील देण्यात आला आहे.
या रॉयल एन्फिल्ड बाईकचे ARAI प्रमाणित मायलेज 36.2 किमी प्रति लिटर आहे. ही बाईक 13 लिटर इंधन क्षमतेसह येते, त्यामुळे एकदा टाकी भरली की, ती 468 किलोमीटर अंतरापर्यंत सहज चालवता येते.