फोटो सौजन्य: Pinterest
या स्कूटरमध्ये तुम्हाला 5.3kWh ची मोठी बॅटरी, 212 km पर्यंतची IDC रेंज आणि 950W चा पोर्टेबल चार्जर मिळेल. याशिवाय, ही स्कूटर फक्त 4.2 सेकंदात 0 ते 40km/ताशी स्पीड गाठते. यामध्ये अनेक स्मार्ट फीचर्स समाविष्ट केले आहेत जे या स्कूटरला आणखी प्रीमियम आणि आलिशान बनवतात.
आईशपथ! ‘या’ कारवर अचानक विमान कोसळलं, तरीही ड्रायव्हर बचावला, व्हिडिओ पाहून तुम्हालाही धडकी भरेल
या स्कूटरला 4.4 किलोवॅट क्षमतेची इलेक्ट्रिक मोटर आहे, जी मजबूत पिकअप आणि सहज रायडिंग अनुभव देते. यात 5.3 किलोवॅट क्षमतेची लिथियम-आयन बॅटरी आहे, जी 212 किमी पर्यंतची आयडीसी रेंज देते. ही 4 तास 18 मिनिटांत पूर्णपणे चार्ज होते.
भारतीय रस्त्यांची परिस्थिती लक्षात घेऊन, कंपनीने समोर 220 मिमी डिस्क ब्रेक आणि मागील बाजूस 130 मिमी ड्रम ब्रेक वापरला आहे. दोन्हीमध्ये संतुलन राखण्यासाठी एकत्रित ब्रेकिंग सिस्टम वापरली जाते. सस्पेंशन सिस्टममध्ये समोर टेलिस्कोपिक हायड्रॉलिक फोर्क्स आणि मागील बाजूस ट्विन शॉक अॅब्सॉर्बर सस्पेंशन समाविष्ट आहे.
कंपनीकडून या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये स्मार्ट TFT डिस्प्ले, स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, नेव्हिगेशन सपोर्ट, राइड स्टॅट्स ट्रॅकिंग, डिस्टन्स-टू-एम्प्टी इंडिकेटर, Q-पार्क असिस्ट (रिव्हर्स मोड), OTA अपडेट्स, रिमोट डायग्नोस्टिक्स, USB चार्जिंग पोर्ट, TPMS (टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम), जिओ-फेन्सिंग, व्हॉईस असिस्ट (व्हेरिएंटनुसार) तसेच SmartXonnect अॅप इंटिग्रेशनसारखे अनेक आधुनिक स्मार्ट फीचर्स देण्यात आले आहेत.
2 लाखांचे डाउन पेमेंट आणि Tata Nexon CNG Variant ची चावी डायरेक्ट तुमच्या खिशात, ‘इतकाच’ असेल EMI
जर तुम्ही नव्या तंत्रज्ञानाने सुसज्ज इलेक्ट्रिक स्कूटरच्या शोधात असाल, तर TVS iQube Hybrid तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकते. भारतीय बाजारात या स्कूटरची सुरुवातीची किंमत 1,22,944 रुपये ठेवण्यात आली आहे. ज्यांना संपूर्ण रक्कम एकाच वेळी भरणे शक्य नसेल, त्यांनी काळजी करण्याची गरज नाही. ही स्कूटर फक्त 5,423 रुपयांचे डाउन पेमेंट देऊन आणि सुमारे 3,721 रुपयांचा इतक्या मासिक हप्त्यांमध्ये हा स्कूटर तुम्ही घरी घेऊन येऊ शकता.






