फोटो सौजन्य: @SaiMeher645856/x.com
भारतीय बाजारात इलेक्ट्रिक कारला चांगली मागणी मिळताना दिसत आहे. हीच मागणी लक्षात घेत अनेक ऑटो कंपन्या मार्केटमध्ये इलेक्ट्रिक कार लाँच करत आहे. यात विदेशी ऑटो कंपन्यांचा सुद्धा सहभाग आहे. जगप्रसिद्ध कार निर्माता कंपनी टेस्लाने सुद्धा त्यांची इलेक्ट्रिक एसयूव्ही भारतात लाँच केली होती. आता व्हिएतनामच्या ऑटो कंपनीने भारतात त्यांची इलेक्ट्रिक एसयूव्ही लाँच केली आहे. चला याबद्दल जाणून घेऊयात.
व्हिएतनामची कार निर्माता कंपनी VinFast ने आपल्या दोन इलेक्ट्रिक SUV – VF6 आणि VF7 – भारतात लाँच केल्या आहेत. यासोबतच कंपनीने भारतीय बाजारपेठेत अधिकृत प्रवेश केला आहे. विशेषतः VF7 ला आकर्षक फीचर्स आणि लांब ड्रायव्हिंग रेंजसह सादर करण्यात आले आहे. या कारचे पहिले प्रदर्शन भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो 2025 मध्ये करण्यात आले होते. चला तर पाहूया, VinFast VF7 कोणकोणत्या खास फीचर्ससह बाजारात आली आहे.
Hyundai Aura ला मिळाले नवीन फीचर्स मिळाले, मात्र किंमतही महागली
विनफास्टने त्यांची इलेक्ट्रिक एसयूव्ही VF7 लाँच केली आहे ज्यामध्ये स्पोर्टी लूक आणि आकर्षक डिझाइन आहे. यात क्रीज लाईन्स आणि रुंद स्टॅन्स आहे ज्यामुळे ती खूप आकर्षक बनते. तिच्या पुढच्या बाजूला व्ही-आकाराचे एलईडी डीआरएल असलेले बंद ग्रिल आहे, जे विनफास्ट लोगो आणि ऑल-एलईडी प्रोजेक्टर हेडलाइट्सशी जोडलेले आहेत.
याच्या साइड प्रोफाइलमध्ये फ्लश डोअर हँडल, मजबूत शोल्डर लाइन्स रेषा आणि एरोडायनामिकली डिझाइन केलेले 19-इंच ड्युअल-टोन अलॉय व्हील्स आहेत. चार्जिंग पोर्ट डाव्या फ्रंट फेंडरवर देण्यात आला आहे. एसयूव्हीच्या मागील बाजूस कनेक्टेड एलईडी टेललाइट्स आहेत, जे समोरच्या डीआरएलसारखेच आहेत.
आता Fortuner खरेदी करण्याचे स्वप्न होईल पूर्ण! GST कपातीनंतर एसयूव्हीवर होईल भरभरून होईल बचत
VF7 ची केबिन खूपच आलिशान आहे. त्यात प्रीमियम व्हेगन लेदर अपहोल्स्ट्री आणि सॉफ्ट-टच मटेरियल वापरण्यात आले आहे. ही कार दोन इंटीरियर पर्यायांसह आणली गेली आहे. त्यामध्ये उपलब्ध असलेल्या फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, VF7 मध्ये 3-स्पोक स्टीअरिंग व्हील, बटण-ऑपरेटेड गियर सिलेक्टर आणि मोठा 12.9-इंच सेंट्रल टचस्क्रीन आहे. त्यात पारंपारिक इन्स्ट्रुमेंट क्लस्टर नाही. सर्व माहिती सेंट्रल स्क्रीन आणि हेड-अप डिस्प्लेवर दिसते. त्याच्या मागील सीटवर फ्लॅट फ्लोअर आणि रिक्लाइनिंग फंक्शनॅलिटी आहे. त्यात एक मोठे पॅनोरॅमिक ग्लास रूफ आहे.
इतर फीचर्समध्ये ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोल, चारही विंडोसाठी 1-टच अप/डाउन, ऑटो-डिमिंग IRVM, 8-वे पॉवर-अॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट आणि व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स यांचा समावेश आहे.
VF7 मध्ये 360-डिग्री कॅमेरा, रेन-सेंसिंग वायपर, इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक आणि 7 एअरबॅग्स देण्यात आले आहेत. यासोबतच यात Level-2 ADAS (Advanced Driver Assistance System) देखील उपलब्ध आहे, ज्यामध्ये लेन-कीप असिस्ट, अॅडॅप्टिव क्रूझ कंट्रोल, ऑटो इमर्जन्सी ब्रेकिंग आणि ADDW लेन-चेंज असिस्ट सारखे फीचर्स समाविष्ट आहेत.
VinFast VF7 च्या किमती जाहीर करण्यात आली आहे. या SUV चा Earth FWD व्हेरिएंट 20.89 लाख रुपये, तर Wind FWD 23.49 लाख रुपये इतक्या किमतीत उपलब्ध आहे. याशिवाय Wind Infinity FWD व्हेरिएंटची किंमत 23.99 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. टॉप मॉडेल्समध्ये Sky AWD 24.99 लाख रुपये, तर Sky Infinity AWD 25.49 लाख रुपये इतक्या किमतीत सादर करण्यात आले आहेत.