फोटो सौजन्य: iStock
पाहता पाहता 2024 चं वर्ष कसे संपायला आले आहे हे कळलंच नाही. या वर्षात अनेक उत्तम कार्स, बाईक्स आणि स्कूटर लाँच झाले. त्याचप्रमाणे कधी नव्हे तर काही नाही प्रयोग सुद्धा आपल्याला या वर्षात पाहायला मिळाले. याचे उत्तम उदाहरण म्हणजे बजाजची पहिली वाहिली सीएनजी बाईक. पण आता जसजसे हे वर्ष संपू लागले आहे, तसतसे अनेक ऑटो कंपनीज नववर्षात आपल्या कार्सच्या किंमती वाढवणार असल्याचे समजत आहे.
मर्सिडीज आणि बीएमडब्ल्यू सारख्या लक्झरी कार उत्पदक कंपनी येणाऱ्या नववर्षात कारच्या किंमतीत वाढ करणार आहे. जपानी वाहन निर्माता कंपनी निसान सुद्धा आपल्या कार्सच्या किंमती वाढवण्याच्या तयारीत आहे. परंतु आता Hyundai कंपनी सुद्धा आपल्या कार्सच्या किंमती वाढवणार आहे.
Tata Motors च्या ज्या कारसाठी ग्राहकांच्या रांगा लागतात, त्यावरच मिळतेय वर्षातील सर्वात मोठी ऑफर
दक्षिण कोरियाची ऑटोमोबाईल निर्माता कंपनी ह्युंदाई भारतातही अनेक उत्तम कार आणि एसयूव्ही ऑफर करते. कंपनीने आपल्या कारच्या किमती वाढवण्याची घोषणा केली आहे. Hyundai किमती कधी वाढवणार? कार किती महाग होतील ? या प्रश्नांची उत्तरे या बातमीत आपण जाणून घेऊयात.
Hyundai India ने दिलेल्या माहितीनुसार, नवीन वर्षात 1 जानेवारी 2025 पासून किंमती वाढवण्यात येणार आहेत. कंपनीकडून मिळालेल्या माहितीनुसार, Hyundai आपल्या कारच्या किंमती 25 हजार रुपयांनी वाढवणार आहे. पण सर्व कार्सच्या किंमती एक सारख्या वाढवल्या जाणार नाहीत.
ह्युंदाईकडून सांगण्यात आले आहे की इनपुट आणि ट्रान्सपोर्ट खर्च सातत्याने वाढत आहे. त्यामुळे भाव वाढले आहेत. याचा परिणाम आता कारच्या किंमतींवर होणार आहे.
इलेक्ट्रिक कारच्या सोबतीने लॉंग ड्राईव्हचा प्लॅन करताय? पहिल्या तपासून घ्या ‘या’ गोष्टी
Hyundai India चे संचालक आणि सीओओ तरुण गर्ग म्हणाले, “ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेडमध्ये, आमच्या ग्राहकांवर कमीत कमी प्रभाव टाकून, शक्य तितक्या वाढत्या किंमती आत्मसात करण्याचा आमचा प्रयत्न नेहमीच असतो. तथापि, इनपुट खर्च सतत वाढत असल्याने, आता या वाढीचा काही भाग किरकोळ किंमती समायोजनाद्वारे ग्राहकांना देणे अत्यावश्यक झाले आहे. ही वाढ सर्व मॉडेल्सवर केली जाईल आणि वाढीची मर्यादा 25000 रुपयांपर्यंत असेल. सर्व MY25 मॉडेल्सवर 1 जानेवारी 2025 पासून ही दरवाढ लागू होईल.
Hyundai India ने भारतीय बाजारपेठेत अनेक उत्तम कार आणि SUV ऑफर केल्या आहेत. Grand Nios i10, i20, Aura, Exter, Venue, Creta, Alcazar, Tucson, Ioniq5 कंपनीने ऑफर केली आहे.