फोटो सौजन्य: iStock
भारतात बाईक्सची विक्री मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. त्यात मार्केटमध्ये दमदार फीचर्स आणि लूक असणाऱ्या बाईक लाँच होत आहे. खरंतर देशातील ऑटोमोबाईल मार्केट हे खूप मोठे आहे, त्यामुळेच तर इथे विविध देशातील ऑटोमोबाईल कंपन्या आपली उत्तम वाहनं लाँच करत असतात. टू व्हीलर सेगमेंटमध्ये देखील अनेक कंपन्या कार्यरत आहेत. मात्र एका भारतीय टू व्हीलर उत्पादक कंपनीने पहिल्यांदाच इतिहास घडवला आहे. ही कंपनी म्हणजे Royal Enfield.
रॉयल एनफील्डने पुन्हा एकदा एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. FY25 मध्ये, कंपनीने पहिल्यांदाच वार्षिक विक्रीत 10 लाख युनिट्सचा टप्पा ओलांडला आहे. यासह, चौथ्या तिमाहीत (जानेवारी ते मार्च 2025) 2,80,801 युनिट्सची विक्री करून आतापर्यंतची सर्वात मोठी तिमाही विक्री नोंदवली गेली आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
‘हे’ 5 संकेत दिसताच समजून जावा की बाईकचा क्लच प्लेट झाला खराब
FY25 च्या चौथ्या तिमाहीतील विक्री: 2,80,801 युनिट्स (वाढ: 23.2%)
FY25 मधील एकूण विक्री: 10,02,893 युनिट्स (वाढ: 10%)
भारतातील विक्री: 9,02,757 युनिट्स (वाढ: 8.1%)
निर्यात: 1,00,136 युनिट्स (वाढ: 29.7%)
रॉयल एनफील्डचे एमडी बी. गोविंदराजन म्हणाले की, वर्षाची सुरुवात थोडी मंद होती, परंतु दुसऱ्या सहामाहीत कंपनीने 6 नवीन बाईक लाँच करून प्रचंड गती मिळवली. यामध्ये Guerrilla 450, Bear 650 आणि Classic 650 यांचा समावेश आहे. सर्वात मनोरंजक गोष्ट म्हणजे रॉयल एनफील्ड लवकरच त्यांची नवीन इलेक्ट्रिक बाईक Flying Flea लाँच करणार आहे.
कंपनीचे अध्यक्ष सिद्धार्थ लाल म्हणाले की, आम्ही हा टप्पा पूर्ण शांततेने, सातत्यपूर्णतेने आणि उद्देशाने गाठला आहे. मला वाटतं ही फक्त सुरुवात आहे.
प्रीमियम आणि अॅडव्हान्स फीचर्सने सुसज्ज असणाऱ्या ‘या’ कारवर मिळतंय 2.70 लाखांचे डिस्काउंट
रॉयल एनफिल्डची मूळ कंपनी Eicher Motors नेही आश्चर्यकारक आर्थिक निकाल दिले. चला यावर एक नजर टाकूया.
Q4FY25 नफा: रु. 1,362 कोटी (27% वाढ)
Q4FY25 महसूल: रु. 5,241 कोटी (आतापर्यंतचा सर्वाधिक)
वार्षिक नफा (आर्थिक वर्ष 25): 4,734 कोटी रुपये (18% वाढ)
वार्षिक महसूल (आर्थिक वर्ष 25): 18,870 कोटी रुपये (14% वाढ)
रॉयल एनफील्डची पकड आता फक्त भारतापुरती मर्यादित राहिलेली नाही. एका वर्तमानपत्राच्या अहवालानुसार, कंपनीच्या निर्यातीत 29.7 टक्क्याने वाढ झाली आहे. यावरून समजते की या भारतीय ब्रँडच्या बाईक्सची क्रेझ परदेशातही चांगली आहे.