फोटो सौजन्य: iStock
भारतीय ग्राहक हा नेहमीच मार्केटमध्ये उत्तम आणि बजेट फ्रेंडली कार्सच्या शोधात असतो. अशावेळी जर एखाद्या कारवर दमदार डिस्काउंट मिळत असेल तर मग ग्राहक त्या कारकडे आकर्षक होणारच. भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्र हे खूप मोठे आहे, ज्यामुळे विविध देशातील कंपन्या मार्केटमध्ये दमदार कार्स लाँच करत असतात. Volkswagen ही त्यातीलच एक कंपनी आहे.
फोक्सवॅगनने देशात अनेक उत्तम कार्स ऑफर केल्या आहेत. पण आता मे 2025 मध्ये, Volkswagen Virtus सेडान आणि Taigun SUV दोन्हीवर बंपर डिस्काउंट देत आहे. ही डिस्काउंट ऑफर त्याच्या ऑटोमॅटिक व्हेरियंटवर उपलब्ध आहे. त्याच वेळी, व्हेरियंटनुसार, लोगोला फ्लॅट कॅश डिस्काउंट, एक्सचेंज किंवा स्क्रॅपेज बोनस आणि लॉयल्टी बोनसचा लाभ घेऊ शकतात. मे 2025 मध्ये Volkswagen Virtus आणि Taigun वर किती सूट दिली जात आहे.
Bajaj Platina 110 चा नवीन व्हेरियंट मार्केटमध्ये लाँच, किंमत सर्वसामान्यांना परवडणारी
मे 2025 मध्ये, फोक्सवॅगन व्हर्टसवर 2.10 लाख रुपयांपर्यंत सूट उपलब्ध आहे. हायलाइन आणि टॉपलाइन ट्रिम्समधील 1.0-लिटर TSI AT व्हेरियंटवर 1.90 लाख रुपयांपर्यंतची सूट उपलब्ध आहे आणि GT लाईन ट्रिमवर 80,000 रुपयांपर्यंतची सूट उपलब्ध आहे. त्याच्या हाय-स्पेक 1.5-लिटर TSI DSG व्हेरियंटवर (GT प्लस स्पोर्ट आणि क्रोम) 1.35 लाख रुपयांपर्यंतची सूट दिली जात आहे. याशिवाय, इतर सर्व व्हेरियंटवर 20,000 रुपयांपर्यंतची स्क्रॅपेज ऑफर दिली जात आहे.
फोक्सवॅगन व्हर्टस दोन पेट्रोल इंजिन पर्यायांसह उपलब्ध आहे, जे 1.0-लिटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन आणि 1.5-लिटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन आहेत. त्याचे 1.0-लिटर इंजिन 115 पीएस पॉवर आणि 178 एनएम टॉर्क निर्माण करते आणि 1.5-लिटर इंजिन 150 पीएस पॉवर आणि 250 एनएम टॉर्क निर्माण करते. दोन्ही इंजिन मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह उपलब्ध आहेत. भारतात, व्हर्टसची एक्स-शोरूम किंमत 11.56 लाख ते 19.40 लाख रुपये आहे.
भारतीय मार्केटमध्ये लवकरच ‘या’ एकापेक्षा एक Compact SUVs घालणार धुमाकूळ
मे 2025 मध्ये, फोक्सवॅगन टायगुनवर 2.70 लाख रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. त्याच्या 1.0-लिटर TSI AT व्हेरिएंटवर 2.35 लाख रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. त्याच्या हायलाईनवर 1.40 लाख रुपयांपर्यंत आणि जीटी लाईन ट्रिमवर 1.45 लाख रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. त्याचा 1.5-लिटर TSI DSG व्हेरियंट मोठ्या सवलतीत उपलब्ध आहे. त्याच्या GT Plus Sport ट्रिमवर 2 लाख रुपयांपर्यंत आणि GT Plus Chrome वर 2.50 लाख रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. टायगुनच्या इतर सर्व व्हेरियंट्सना 20,000 रुपयांपर्यंत स्क्रॅपेजचा फायदा मिळत आहे. भारतीय मार्केटमध्ये, फोक्सवॅगन टायगुनची एक्स-शोरूम किंमत 11.80 लाख ते 19.83 लाख रुपये आहे.