फोटो सौजन्य: iStock
भारतीय बाजारात बाईक्सच्या विक्रीत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. पण बाईक खरेदी केल्यानंतर अनेकदा लोकांना ती मेंटेन ठेवता येत नाही. बाईकमध्ये अनेक महत्वाचे पार्ट्स असतात, ज्यांची वेळेवर देखभाल करणे खूप महत्वाचे आहे. क्लच प्लेट हा त्यातीलच एक महत्वाचा पार्ट.
क्लच प्लेट हा कोणत्याही बाईकचा एक महत्त्वाचा पार्ट असतो. जर बाईकचा क्लच प्लेट खराब झाला तर तो चालवताना तुम्हाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकतो. क्लच प्लेट इंजिनला ट्रान्समिशन म्हणजेच गिअरसोबत जोडते. जर ते खराब झाले तर तुम्हाला गिअर्स बदलण्यात अडचण येऊ शकते. म्हणून क्लच प्लेट्सची योग्य देखभाल करण्यासाठी योग्य काळजी घेणे महत्वाचे. चला जाणून घेऊयात की बाईकचे क्लच प्लेट खराब झाल्यावर कोणते ५ संकेत मिळतात.
Honda च्या ‘या’ बाईकमध्ये आता मिळणार पहिल्यापेक्षा जास्त मायलेज, नवीन फीचर्स देखील समाविष्ट
जर क्लच प्लेटमध्ये काही समस्या असेल तर सर्वप्रथम तुमची बाईक कमी मायलेज देईल. जर क्लच प्लेट खराब झाले तर सामान्यपेक्षा जास्त फ्युएल वापरते. कमी मायलेजमागे अनेक कारणे असू शकतात, त्यापैकी एक क्लच प्लेटमधील बिघाड असू शकते.
बाईकच्या क्लच प्लेटमध्ये काही समस्या असल्यास, पिकअप कमी होतो. जर तुम्हाला गिअर्स बदलताना RPM मध्ये थोडीशी वाढ जाणवली, तर याचा अर्थ इंजिन चालू असताना ट्रान्समिशन योग्यरित्या काम करत नाहीये. यामुळे ट्रान्समिशनचेही नुकसान होऊ शकते. यामुळे व्हील्सना पूर्ण पॉवर आणि टॉर्क मिळत नाही.
बाईक चालवताना जर तुम्हाला क्लच लीव्हरमध्ये व्हायब्रेशन जाणवत असेल तर ते क्लच प्लेटमध्ये बिघाड झाल्याचे लक्षण असू शकते. क्लच लीव्हरमधील व्हायब्रेशन हे केवळ क्लच प्लेटमधील बिघाडाचे लक्षण नाही तर संपूर्ण यंत्रणेतील इतर काही समस्येचे देखील लक्षण असू शकते. म्हणून जर तुम्हाला गिअर लीव्हरमध्ये व्हायब्रेशन जाणवत असेल तर ते गांभीर्याने घ्या.
प्रीमियम आणि अॅडव्हान्स फीचर्सने सुसज्ज असणाऱ्या ‘या’ कारवर मिळतंय 2.70 लाखांचे डिस्काउंट
जर तुमच्या बाईकच्या इंजिनमधून विचित्र आवाज येत असेल तर हे देखील खराब क्लच प्लेटचे लक्षण आहे. क्लच असेंब्लीच्या आवाजावरून तुम्ही ते ओळखू शकता. हे सहसा इंजिनच्या उजव्या किंवा डाव्या बाजूला लावले जाते. जर तुम्हाला इंजिनमधून काही विचित्र आवाज येत असतील तर तुम्हाला क्लच असेंब्ली तपासावी लागेल.
बाईकच्या खराब क्लचचे आणखी एक लक्षण म्हणजे गिअर स्लिपेज. जर बाईकचे गिअर्स बदलताना वाहनाच्या RPM मध्ये वाढ जाणवली, तर याचा अर्थ इंजिन चालू असताना ट्रान्समिशन योग्यरित्या काम करत नाही आहे.