फोटो सौजन्य: Pinterest
नुकतीच Skoda Kushaq Facelift भारतीय बाजारात लाँच करण्यात आली आहे. कंपनीने ही SUV मिड-साइज सेगमेंटमध्ये सादर केली असून तिची थेट स्पर्धा Hyundai Creta सोबत आहे. इंजिन आणि फीचर्सच्या दृष्टीने या दोन्ही SUV पैकी कोणती अधिक योग्य ठरेल, याची माहिती आज आपण जाणून घेऊयात.
देशात MG Windsor EV चा जलवा! ‘या’ शहरात भरपूर डिमांड; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
Skoda Kushaq मध्ये दोन पेट्रोल इंजिन पर्याय दिले आहेत. यामध्ये 1.0 लिटर टर्बो पेट्रोल इंजिन असून ते 85 kW पॉवर आणि 178 Nm टॉर्क देते. तसेच 1.5 लिटर पेट्रोल इंजिन 110 kW पॉवर आणि 250 Nm टॉर्क निर्माण करते. यामध्ये मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचे पर्याय उपलब्ध आहेत.
दुसरीकडे Hyundai Creta मध्ये 3 इंजिन पर्याय दिले आहेत. पहिला 1.5 लिटर नॅचरल एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन असून ते 115 PS पॉवर आणि 143.8 Nm टॉर्क देते. दुसरा 1.5 लिटर टर्बो पेट्रोल इंजिन 160 PS पॉवर आणि 253 Nm टॉर्क देते. तिसरा पर्याय 1.5 लिटर डिझेल इंजिन असून ते 116 PS पॉवर आणि 250 Nm टॉर्क देते. यामध्ये 6-स्पीड मॅन्युअल, IVT, ऑटोमॅटिक आणि 7-स्पीड DCT ट्रान्समिशन पर्याय उपलब्ध आहेत.
BMW आणि Audi ची धकधक वाढली! Lexus ची इलेक्ट्रिक लक्झरी सेडान कार लाँच, मिळणार 8 वर्षांची वॉरंटी
Skoda Kushaq मध्ये LED हेडलाइट्स, कनेक्टेड LED टेल लाइट्स, सिक्वेन्शियल इंडिकेटर्स, पॅनोरमिक सनरूफ, फ्रंट पार्किंग सेन्सर्स, ABS, EBD, TCS, चारही चाकांवर डिस्क ब्रेक, MSR यांसारखे फीचर्स दिले आहेत. तसेच सर्व व्हेरिएंट्समध्ये स्टँडर्ड अलॉय व्हील्स, सनरूफ आणि ऑटो डिमिंग IRVM यांसारखे फीचर्स मिळतात.
Hyundai Creta मध्ये 17 इंच अलॉय व्हील्स, LED हेडलाइट्स, LED DRLs, सिक्वेन्शियल टर्न इंडिकेटर्स, शार्क फिन अँटेना, ड्युअल टोन एक्सटीरियर व इंटीरियर, लेदर सीट्स, रियर विंडो सनशेड, पॅनोरमिक सनरूफ, ड्युअल झोन ऑटो AC, फ्रंट व्हेंटिलेटेड सीट्स, इलेक्ट्रिक पार्किंग ब्रेक, वायरलेस फोन चार्जर, विविध ड्राइव्ह मोड्स (Eco, Normal, Sport) आणि ट्रॅक्शन मोड्स (Snow, Mud, Sand), क्रूझ कंट्रोल, की-लेस एंट्री, रिमोट इंजिन स्टार्ट, इलेक्ट्रिक टेलगेट रिलीज, रियर AC व्हेंट्स, टिल्ट व टेलिस्कोपिक स्टीयरिंग, कूल्ड ग्लोव्ह बॉक्स, 10.25 इंच इन्फोटेनमेंट सिस्टम, Bose 8-स्पीकर ऑडिओ, Android Auto, Apple CarPlay, 10.25 इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, ब्लूलिंक, OTA अपडेट्स आणि Alexa सपोर्ट असे अनेक प्रगत फीचर्स दिले आहेत.
Skoda Kushaq ची एक्स-शोरूम किंमत 10.69 लाख रुपयांपासून सुरू होते आणि टॉप व्हेरिएंटसाठी 18.99 लाख रुपयेपर्यंत जाते. Hyundai Creta ची एक्स-शोरूम किंमत 10.73 लाख रुपयांपासून सुरू होते आणि टॉप व्हेरिएंटची किंमत 20.20 लाख रुपयेपर्यंत जाते.






