Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 28 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Skoda Slavia Facelift ची लाँच डेट ठरली! १८ ऑगस्टला होणार एंट्री, पाहा काय असतील महत्त्वाचे बदल

स्कोडा इंडिया १८ ऑगस्ट रोजी आपली लोकप्रिय सेडान कार 'स्लाव्हिया फेसलिफ्ट' लाँच करणार आहे. नव्या स्लाव्हियामध्ये स्लिम LED हेडलाइट्स, रि-डिझाइन बंपर, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि १.०-लीटर इंजिनसाठी नवीन ८-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन यांसारखे मोठे बदल पाहायला मिळतील.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Jul 28, 2026 | 02:20 PM
Skoda Slavia Facelift ची लाँच डेट ठरली! १८ ऑगस्टला होणार एंट्री, पाहा काय असतील महत्त्वाचे बदल
Follow Us
Follow Us:
  • स्कोडा स्लाव्हिया फेसलिफ्ट १८ ऑगस्ट रोजी भारतीय बाजारात अधिकृतपणे लाँच केली जाणार आहे.
  • १.०-लीटर टर्बो इंजिनमध्ये नवीन ८-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचा महत्त्वपूर्ण पर्याय मिळण्याची शक्यता आहे.
  • कारच्या एक्सटिरियर डिझाइनमध्ये स्लिम LED लाईट्स, नवीन ग्रिल आणि री-डिझाइन केलेले बंपर मिळतील.

स्कोडा स्लाव्हियाच्या पहिल्या मोठ्या अपडेटची प्रतीक्षा आता संपत आली आहे. १८ ऑगस्ट रोजी अधिकृतपणे लाँच होणाऱ्या या स्लाव्हिया फेसलिफ्टमध्ये केवळ दिसायलाच बदल नसून अनेक महत्त्वाचे मेकॅनिकल आणि फिचर्समधील अपडेट्स पाहायला मिळणार आहेत. २०२२ च्या सुरुवातीला भारतीय मार्केटमध्ये आल्यानंतर या सेडान कारमधील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा आणि महत्त्वपूर्ण बदल मानला जात आहे.

काय असतील मेकॅनिकल बदल?

या कारमधील सर्वात मोठा मेकॅनिकल बदल म्हणजे १.०-लीटर टर्बो पेट्रोल इंजिनसोबत मिळणारे नवीन ऑटोमॅटिक गिअरबॉक्स. सध्याच्या ६-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऐवजी या मॉडेलमध्ये नवीन ८-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन मिळण्याची शक्यता आहे, जे नुकत्याच आलेल्या कुशाक फेसलिफ्टमध्ये देण्यात आले आहे. यामुळे हायवेवर गाडी चालवताना स्मूथ अ‍ॅक्सिलेरेशन आणि उत्तम मायलेज मिळण्यास मदत होईल. दुसरीकडे, १.५-लीटर टर्बो पेट्रोल इंजिनमध्ये पूर्वीप्रमाणेच ७-स्पीड DSG गिअरबॉक्स कायम ठेवला जाईल. हे १.५-लीटर इंजिन १५० PS पॉवर आणि २५० Nm टॉर्क जनरेट करते, तर १.०-लीटर इंजिन ११५ PS पॉवर आणि १७८ Nm टॉर्क देते.

हॅचबॅक मार्केटमध्ये मारुती अल्टोचा डबल धमाका; ह्युंदाई i20 आणि टाटा अल्ट्रोझची मोठी घसरण!

इंटेरियर आणि फीचर्स

कारच्या इंटिरियरचा विचार केल्यास, डॅशबोर्डच्या मूळ डिझाइनमध्ये फारसा बदल केलेला नाही, परंतु केबिनमधील तंत्रज्ञान आणि कम्फर्ट वाढवण्यावर भर देण्यात आला आहे. यात नवीन आणि मोठा फुल्ली डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर दिला जाऊ शकतो. याशिवाय, प्रीमियम व्हेरियंट्समध्ये फ्रंट पार्किंग सेन्सर्स, नवीन अपहोल्स्ट्री आणि मागच्या सीटसाठी मसाज फंक्शन यांसारखे फीचर्स मिळण्याची शक्यता आहे. १०.२५-इंच इन्फोटेनमेंट टचस्क्रीन, वायरलेस चार्जिंग, सनरूफ, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, ८-स्पीकर साऊंड सिस्टम, ६ एअरबॅग्ज आणि टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम यांसारखे फीचर्स यात कायम असतील.

Hero: हिरोच्या ‘विडा’ ब्रँडचे नेपाळमध्ये पदार्पण; VX2 इलेक्ट्रिक स्कूटर आणि Dirt.E K3 ई-बाईक बाजारात

एक्सटिरियर डिझाइनची वैशिष्ट्ये

एक्सटिरियर डिझाइनमध्ये देखील अनेक नवीन बदल पाहायला मिळतील. कारच्या पुढील भागात अधिक स्लिम डिझाइनचे LED हेडलाइट्स आणि आधीपेक्षा अधिक रुंद व मोठी फ्रंट ग्रिल देण्यात आली आहे. या ग्रिलमध्ये इल्युमिनेटेड डिझाइन असू शकते. तसेच फ्रंट बंपर पूर्णपणे नव्याने रि-डिझाइन करण्यात आला आहे. कारच्या मागील भागात नवीन LED ग्राफिक्ससह टेललाइट्स आणि जास्त क्लीन दिसणारा रियर बंपर देण्यात आला आहे.

नव्या अपडेट्स आणि फीचर्समुळे स्कोडा स्लाव्हिया फेसलिफ्टची किंमत सध्याच्या मॉडेलपेक्षा काहीशी अजून जास्त असण्याची शक्यता आहे.

Web Title: Skoda slavia facelift launch date august 18 features auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 28, 2026 | 02:20 PM

Topics:  

  • automobile

संबंधित बातम्या

2027 Kawasaki Ninja 300 भारतामध्ये लाँच; किंमत ₹३.३४ लाखांपासून सुरु! जाणून घ्या फीचर्स आणि सर्वकाही
1

2027 Kawasaki Ninja 300 भारतामध्ये लाँच; किंमत ₹३.३४ लाखांपासून सुरु! जाणून घ्या फीचर्स आणि सर्वकाही

किया इंडियाची नवी ‘सिरॉस ईव्ही’ लाँच; १३.४९ लाख रुपयांपासून आकर्षक किमतीत उपलब्ध
2

किया इंडियाची नवी ‘सिरॉस ईव्ही’ लाँच; १३.४९ लाख रुपयांपासून आकर्षक किमतीत उपलब्ध

हॅचबॅक मार्केटमध्ये मारुती अल्टोचा डबल धमाका; ह्युंदाई i20 आणि टाटा अल्ट्रोझची मोठी घसरण!
3

हॅचबॅक मार्केटमध्ये मारुती अल्टोचा डबल धमाका; ह्युंदाई i20 आणि टाटा अल्ट्रोझची मोठी घसरण!

Hero: हिरोच्या ‘विडा’ ब्रँडचे नेपाळमध्ये पदार्पण; VX2 इलेक्ट्रिक स्कूटर आणि Dirt.E K3 ई-बाईक बाजारात
4

Hero: हिरोच्या ‘विडा’ ब्रँडचे नेपाळमध्ये पदार्पण; VX2 इलेक्ट्रिक स्कूटर आणि Dirt.E K3 ई-बाईक बाजारात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.