फोटो सौजन्य: iStock
सध्या देशात इलेक्ट्रिक कार्स मोठ्या प्रमाणत लाँच होताना दिसत आहे. एकीकडे या कार्सला मोठ्या प्रमाणात मागणी मिळत आहे तर दुसरीकडे आजही कित्येक ग्राहक डिझेल कार विकत घेण्यास जास्त प्राधान्य देत आहे. यामागे एक महत्वाचे कारण म्हणजे इलेक्ट्रिक कारच्या महाग किंमती.
तसेच काही जणांकडून असेही मानले जाते की डिझेल कार्स लाँग ट्रीपसाठी सुद्धा उपयुक्त ठरतात. यामुळेच जर तुम्ही सुद्धा डिझेल कार विकत घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला त्याचे फायदे आणि नुकसान ठाऊक असणे गरजेचे आहे. विशेषतः जर तुम्ही ही कार लाँग ट्रीप वर घेऊन जाणार असाल तर.
खाली काही महत्वाचे मुद्दे नमूद केले आहेत जे तुम्हाला डिझेल कार घ्यावी की पेट्रोल कार? याबद्दल निर्णय घेण्यास मदत करेल.
इंधन कार्यक्षमता: डिझेल इंजिन पेट्रोलपेक्षा जास्त मायलेज देते, जे लाँग ड्राइव्हवर तुमचे पैसे वाचवण्यास मदत करते.
टॉर्क आणि पॉवर: डिझेल कार सामान्यत: जास्त टॉर्क देतात, जे डोंगराळ प्रदेशात किंवा हायवेवर ड्रायव्हिंगसाठी एक उत्तम गोष्ट मानली जाते.
दीर्घकालीन बचत: जर तुम्ही कारचा वापर जास्त प्रमाणत करत असाल, तर डिझेलच्या कार्स दीर्घकाळासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतात.
हे देखील वाचा: करोडोंची कार नाही तर फक्त 1 लाखाची इलेक्ट्रिक स्कूटर अर्जुन कपूरने केली खरेदी
मेंटेनन्स खर्च: डिझेल कारची सर्व्हिसिंग आणि मेंटेनन्स खर्च पेट्रोल कारपेक्षा जास्त असू शकतो.
हाय इनिशियल कॉस्ट: डिझेल कार पेट्रोल कारपेक्षा महाग आहेत, म्हणून त्यांची हाय इनिशियल कॉस्ट जास्त असते.
प्रदूषण आणि ध्वनी: डिझेल इंजिन अधिक धूर आणि आवाज निर्माण करू शकतात, ज्यामुळे डिझेल कार्स पर्यावरणास पूरक नसतात.
होय, जर तुमचे वार्षिक ड्रायव्हिंग मायलेज जास्त असेल, तर डिझेल कार लाँग ट्रीपवर पैसे वाचवू शकते. तथापि, तुम्हाला वाहनाचा मेंटेनन्स खर्च आणि रजिस्ट्रेशन चार्जेस देखील लक्षात ठेवावे लागेल. त्यामुळे, जर तुम्ही कार लांब पल्ल्यासाठी वापरत असाल आणि भरपूर ड्रायव्हिंग करत असाल, तर डिझेल कार तुमचा खर्च कमी करू शकते. पण कमी ड्रायव्हिंगसाठी किंवा फक्त शहराच्या आतच गाडी चालवण्यासाठी पेट्रोल कार अधिक फायदेशीर ठरू शकते.