फोटो सौजन्य: Social Media
सध्या भारतात इलेक्ट्रिक कार्स खूप मोठ्या प्रमाणात लाँच होताना दिसत आहे. येणार काळ हा इलेक्ट्रिक वाहनांचा असल्यामुळे अनेक ऑटो कंपनीज आपल्या आगामी इलेक्ट्रिक वाहनांवर काम करत आहे. तसेच आता वाढत्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीला कंटाळून किती तरी जण इलेक्ट्रिक वाहनं विकत घेत आहे. आता काही कंपनीकडून कमर्शियल कार सेगमेंट सुद्धा इलेक्ट्रिक कार्स लाँच केल्या जात आहे. यातीलच एक कंपनी म्हणजे Euler.
हे देखील वाचा: करोडोंची कार नाही तर फक्त 1 लाखाची इलेक्ट्रिक स्कूटर अर्जुन कपूरने केली खरेदी
इलेक्ट्रिक वाहन उत्पादक कंपनी Euler ने भारतीय बाजारपेठेत नवीन कार लाँच केली आहे. Euler Storm EV, असे या नवीन कारचे नाव आहे, चला नवीन कारबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया.
यूलरने Storm EV चारचाकी लाइट कमर्शियल कार सेगमेंटमध्ये लॉन्च केली आहे. कंपनीने यात अनेक उत्तमोत्तम फिचर्स आणले आहेत. एकूण दोन व्हेरियंटमध्ये ही कार लाँच केली आहे ज्यात असे 11 फीचर्स देण्यात आले आहेत जे या सेगमेंटमध्ये प्रथमच ऑफर केले जाणार आहेत.
Storm EV मध्ये, कंपनीकडे ADAS, नाईट व्हिजन असिस्ट, फ्रंट कॅमेरा कोलिजन सेन्सर, डिजिटल लॉक, 24X7 सह CCTV मॉनिटरिंग, 7-10 इंच इन्फोटेनमेंट सिस्टम, सक्रिय लिक्विड कूल्ड बॅटरी, चार मिमी ट्यूबलर बॉक्स आर्मर्ड चेसिस, 200 किमी रिअल रेंज आहे. रेंज, ऑल टेरेन ड्रायव्हर कंट्रोल असे अनेक फिचर्स यामध्ये देण्यात आले आहेत. कंपनीकडून दररोज 1 GB मोफत डेटा देखील दिला जात आहे.
हे देखील वाचा: महिलांसाठी कुठली कार आहे एकदम बेस्ट, Automatic की Manual?
कंपनीने या इलेक्ट्रिक सेगमेंटच्या हलक्या कमर्शियल वाहनांमध्ये 30 kWh क्षमतेची बॅटरी दिली आहे. ज्यात AIS 38 प्रमाणित बॅटरी पॅक आणि IP67 रेटिंग आहे. याशिवाय यात ARC Reactor 200 टेक्नॉलॉजी देण्यात आले आहे जे बॅटरीला प्रत्येक हवामानात चालवण्याची क्षमता देते. ड्रायव्हिंगसाठी यामध्ये रेंज, थंडर आणि राइनो असे मोड देण्यात आले आहेत. या कारची लाँग रेंज व्हेरियंट एका चार्जवर 200 किलोमीटरपर्यंत चालवता येते. तर इतर व्हेरियंटला पूर्ण चार्ज केल्यानंतर 140 किलोमीटरची रेंज मिळते. 15 मिनिटांच्या चार्जिंगमध्ये या कारला 100 किलोमीटरची रेंज मिळते.
कंपनीने या कारला दोन व्हेरियंटमध्ये आणले आहे. त्याच्या बेस व्हेरियंटची (T1250) एक्स-शोरूम किंमत 8.99 लाख रुपये ठेवण्यात आली आहे तर त्याच्या टॉप व्हेरियंटची (LR 200) एक्स-शोरूम किंमत 12.99 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. याशिवाय कंपनी सात वर्षे किंवा दोन लाख किलोमीटरची एक्सटेंडेड वॉरंटीही देत आहे.