फोटो सौजन्य: Social Media
जेव्हा जेव्हा भारतीय क्रिकेट संघाच्या कामगिरीबद्दल बोलले जाईल तेव्हा नक्कीच अनेक क्रिकेटपटूंचे नाव आपल्या ओठांवर येईल. त्यातीलच एक नाव म्हणजे सुरेश रैना. सुरेश रैनाने अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहे. आजही त्याचे सामने क्रिकेटप्रेमी पुन्हा पुन्हा पाहताना दिसतात. नुकतेच सुरेश रैनाने एक लक्झरी कार विकत घेतली आहे.
भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू सुरेश रैनाने आपल्या घरी किया कार्निव्हल लिमोझिन आणली आहे. कारची चावी घेतल्यानंतर सुरेश रैनाने केक कापून आनंद साजरा केला आहे. Kia ची ही नवीन कार या महिन्याच्या सुरुवातीला म्हणजेच 3 ऑक्टोबर रोजी भारतात लाँच करण्यात आली होती. ही नवीन किया कार्निवल पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही पॉवरट्रेनसह बाजारात उपलब्ध करण्यात आली आहे. या लक्झरी कारची एक्स-शोरूम किंमत तब्बल 63.90 लाख रुपयांपासून सुरू होते.
हे देखील वाचा: किती किलोमीटर धावल्यानंतर बदलावे लागते कारचे इंजिन ऑइल? टायमिंग चुकलं तर पडेल महागात
नवीन किया कार्निव्हल भारतीय बाजारपेठेत दोन कलर व्हेरियंटसह लाँच करण्यात आली आहे. ही 7 सीटर कार आहे. या कारला फ्युजन ब्लॅक आणि ग्लेशियर व्हाइट पर्ल कलर देण्यात आला आहे. या कारच्या आतील भागात Tuscan आणि Umber 2 टोन रंग आहे. या लक्झरी कारमध्ये वाइड इलेक्ट्रिक ड्युअल सनरूफ देखील उपलब्ध आहे. लोकांच्या मनोरंजनासाठी हे वाहन 12-स्पीकर बोस सिस्टीम सुद्धा लागले आहे.
या Kia कारमध्ये वायरलेस चार्जिंगचा पर्यायही उपलब्ध आहे. या कारमध्ये 18-इंच डायमंड कट अलॉय व्हील आहेत. ड्रायव्हिंगचा अनुभव सुधारण्यासाठी या कारमध्ये पॅडल शिफ्टर्स देखील देण्यात आले आहेत. या Kia कारमध्ये ADAS आणि 360-डिग्री कॅमेराची सुविधा देखील आहे.सुरक्षेसाठी या कारमध्ये 8 एअरबॅगही देण्यात आल्या आहेत. किआ कार्निव्हलमध्ये ऑटोमॅटिक कालयमेट कंट्रोल आणि मल्टी-फंक्शन स्टीयरिंग व्हीलचे फीचर्स देखील आहे.
Kia Carnival Limousine च्या डिझेल व्हेरियंटमध्ये 2151 cc 4-सिलेंडर इंजिन आहे. हे इंजिन 190 bhp ची शक्ती प्रदान करते आणि 441 Nm टॉर्क जनरेट करते. या इंजिनसोबत ऑटोमॅटिक ट्रान्समिशनची सुविधा देण्यात आली आहे. या लक्झरी कारची इंधन टाकीची क्षमता 32 लीटर आहे. ही Kia कार 14.85 kmpl चा मायलेज देते.