Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Petrol – CNG नाही तर आता ‘या’वर चालणार Swift कार, Suzuki चा नवीन आविष्कार, वाचा सविस्तर

मारुती सुझुकी स्विफ्ट ही भारतीय बाजारपेठेतील सर्वात लोकप्रिय गाड्यांपैकी एक आहे. स्विफ्टची केवळ भारतातच नव्हे, तर जगभरातील इतर अनेक देशांमध्येही खूप प्रशंसा केली जाते.

  • By Ankita Karangutkar
Updated On: May 08, 2026 | 07:34 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Close
Follow Us:
  • Petrol – CNG नाही तर आता ‘या’वर चालणार Swift कार
  • नवीन प्रकारच्या इंधन पर्यायासह उपलब्ध
  • हायड्रोजन कार कशा प्रकारे कार्य करते?
Swift Hydrogen: मारुती सुझुकी स्विफ्ट ही भारतीय बाजारपेठेतील सर्वात लोकप्रिय गाड्यांपैकी एक आहे. स्विफ्टची केवळ भारतातच नव्हे, तर जगभरातील इतर अनेक देशांमध्येही खूप प्रशंसा केली जाते. जागतिक बाजारपेठेत, ही गाडी विविध पॉवरट्रेन पर्यायांसह उपलब्ध आहे. विविध बाजारपेठांमध्ये, ही गाडी पेट्रोल, टर्बो-पेट्रोल, डिझेल, माईल्ड-हायब्रिड आणि CNG या व्हेरिएंट्समध्ये सादर केली जाते. पण आता ती नव्या अंदाजात समोर येणार आहे. नेमकी कसा असेल हा अंदाज ? जाणून घेऊयात.

CA ते 11 हजार कोटींच्या संपत्तीचे मालक! पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक रवि पंडित यांचं निधन

नवीन प्रकारच्या इंधन पर्यायासह उपलब्ध

कार आता एका नवीन प्रकारच्या इंधन पर्यायासह उपलब्ध होण्याची शक्यता आहे. कंपनीने या कारची अशी एक व्हेरिएंट सादर केली आहे, जी हायड्रोजन इंजिनने सुसज्ज आहे. हे वाहन ‘२०२६ व्हिएन्ना मोटर सिम्पोजियम’मध्ये प्रदर्शित करण्यात आले होते.

हायड्रोजन कार कशा प्रकारे कार्य करते?

ही वाहने हायड्रोजनपासून वीज निर्माण करण्यासाठी ‘हायड्रोजन फ्युएल सेल्स’चा वापर करतात. हा हायड्रोजन कारमधील टाकीमध्ये साठवून ठेवलेला असतो. निर्माण झालेली वीज बॅटरी चार्ज करण्यासाठी वापरली जाते आणि ही बॅटरीच पुढे कारमध्ये बसवलेल्या इलेक्ट्रिक मोटर्सना ऊर्जा पुरवते. अशा प्रकारे, रस्त्यावर हायड्रोजन कारचे कार्य चालते. या संपूर्ण प्रक्रियेतून पाण्याव्यतिरिक्त इतर कशाचेही उत्सर्जन होत नाही याचाच अर्थ असा की, प्रदूषणाबाबत यात कोणतीही चिंता बाळगण्याचे कारण उरत नाही.
पण तंत्रज्ञान आता प्रगत होत असून, त्यामुळे हायड्रोजनचा इंधन म्हणून थेट वापर करणे शक्य झाले आहे याचा अर्थ असा की, आता त्याचे विजेमध्ये रूपांतर करण्याची आवश्यकता उरलेली नाही. ‘AVL’ या मोबिलिटी तंत्रज्ञान कंपनीने आणि ‘सुझुकी मोटर कॉर्पोरेशन’ने हायड्रोजन इंजिन्सच्या क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण यश संपादन केले आहे.

ही कंपनी २०२६ च्या ‘व्हिएन्ना मोटर सिम्पोजियम’मध्ये या तंत्रज्ञानाचे प्रदर्शन करत आहे. हे तंत्रज्ञान एका ‘Suzuki Swift गाडीमध्ये प्रात्यक्षिकाद्वारे सादर केले जाईल. ही prototype हायड्रोजन इंजिनवर धावेल. ज्या प्रणालीला कंपनी “हायड्रोजन DI तंत्रज्ञान” असे संबोधते. AVL ची ही प्रणाली सुझुकीच्या १.४-लिटर, चार-सिलिंडर हायड्रोजन इंजिनमध्ये integrate करण्यात आली आहे.

भारतातील सध्याची परिस्थिती काय?

सध्या, भारतामध्ये हायड्रोजनवर चालणाऱ्या गाड्यांची विक्री केली जात नाही. पण भविष्यात वाहन उद्योग नेमकी कोणती दिशा घेईल, याचे अचूक भाकीत करणे अशक्य आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे भारतामध्ये हरित इंधनाला चालना देण्यावर आणि ‘कार्बन फूटप्रिंट’ कमी करण्यावर सातत्याने भर देत असतात. सध्या, देशभरात इलेक्ट्रिक आणि हायब्रिड वाहनांना मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन दिले जात आहे. याव्यतिरिक्त, इथेनॉल blending प्रमाण वाढवण्याच्या योजनांवरही विचार सुरू आहे. या संदर्भात, हायड्रोजन हा एक उत्कृष्ट आणि व्यवहार्य पर्याय म्हणून समोर येऊ शकतो. विशेष म्हणजे, कोचीन विमानतळावर नुकतेच एक हायड्रोजन fueling station उभारण्यात आले आहे. विमानतळाच्या आवारात धावणाऱ्या हायड्रोजनवर चालणाऱ्या बसेस आणि इतर वाहनांच्या इंधनाची गरज पूर्ण करण्यासाठी ही सुविधा निर्माण करण्यात आली आहे.

LPG Reforms: घरगुती एलपीजी सिलिंडरच्या डिलीवरीसाठी OTP सिस्टीम रद्द करणार? Mumbai High Court ने दिला ‘हा’ निकाल

Web Title: Suzuki swift new fuel option petrol cng alternative innovation marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 08, 2026 | 07:34 PM

Topics:  

  • Business News
  • Charging Station
  • CNG
  • CNG Price
  • Marathi News
  • Maruti Suzuki
  • Suzuki

संबंधित बातम्या

Kolhapur News : वादळी वाऱ्यामुळे लग्न मंडप तुटला; अवकाळी पावसाने कोल्हापुरकरांची तारांबळ
1

Kolhapur News : वादळी वाऱ्यामुळे लग्न मंडप तुटला; अवकाळी पावसाने कोल्हापुरकरांची तारांबळ

Matheran News : रस्त्यांसाठी वन जमीन देण्याचा निर्णय; डोंगरातील आदिवासी वाड्यांची विकासाकडे वाटचाल
2

Matheran News : रस्त्यांसाठी वन जमीन देण्याचा निर्णय; डोंगरातील आदिवासी वाड्यांची विकासाकडे वाटचाल

LPG Reforms: घरगुती एलपीजी सिलिंडरच्या डिलीवरीसाठी OTP सिस्टीम रद्द करणार? Mumbai High Court ने दिला ‘हा’ निकाल
3

LPG Reforms: घरगुती एलपीजी सिलिंडरच्या डिलीवरीसाठी OTP सिस्टीम रद्द करणार? Mumbai High Court ने दिला ‘हा’ निकाल

IPL Tax Rules: परदेशी खेळाडूंनाही लागू होतो Income Taxचा नियम; कोट्यवधींच्या लिलावानंतर खिशात किती उरतात पैसे?
4

IPL Tax Rules: परदेशी खेळाडूंनाही लागू होतो Income Taxचा नियम; कोट्यवधींच्या लिलावानंतर खिशात किती उरतात पैसे?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.