फोटो सौजन्य: iStock
भारतात अशा अनेक ऑटो कंपनीज आहे, ज्या भारतीय ऑटोमोबाइल क्षेत्रावर अधिराज्य गाजवत आहे. यातील एक कंपनी म्हणजे होंडा. होंडाच्या कार्सवर आजही ग्राहक डोळे झाकून विश्वास करीत असतात. कंपनी सुद्धा ग्राहकांच्या अपेक्षेनुसार उत्तोमोत्तम कार्स मार्केटमध्ये आणत असते. त्यामुळेच कंपनीच्या कार्सना फक्त देशातच नव्हे तर विदेशात सुद्धा चांगली मागणी मिळते. नुकताच कंपनीचा सेल्स आणि एक्स्पोर्ट रिपोर्ट जारी झाला आहे.
ऑक्टोबर 2024 मध्ये वार्षिक आणि मासिक अशा दोन्ही प्रकारे होंडा कारच्या विक्रीत घट झाली आहे. सणासुदीच्या हंगामामुळे ऑक्टोबर 2024 मध्ये Honda Cars India Limited ची चांगली विक्री होण्याची शक्यता होती. असे असतानाही वाहनांच्या विक्रीत फारशी वाढ झाली नाही, उलट विक्रीत घट झाली. त्याच वेळी मात्र कार निर्यातीत वाढ झाली आहे. ऑक्टोबर 2024 मध्ये विक्रीच्या बाबतीत होंडा कंपनीची कामगिरी कशी होती त्याबद्दल जाणून घेऊया.
हे देखील वाचा: ‘ही’ आहे भारतात विकली जाणारी सर्वात महागडी बाईक, किंमत Fortuner Innova पेक्षा जास्त
हे देखील वाचा: जर कारच्या टाकीत जेट विमानाचे इंधन टाकले तर काय होईल? जाणून घेतल्यानंतर बसेल धक्का