फोटो सौजन्य: Freepik
भारतीय कारमार्केटमध्ये नेहमीच नवनवीन कार्स लाँच होत असतात. आता लवकरच सणासुदीत काळ चालू होणार आहे. या काळात अनेक जण नवीन कार किंवा बाईक विकत घेत असतात. जर तुम्ही सुद्धा यंदाच्या सणासुदीच्या काळात नवीन कार घ्यायचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. आज आपण सप्टेंबर 2024 मध्ये लाँच झालेल्या कार्सबद्दल जाणून घेणार आहोत.
Tata CURVV EV ही नवीन इलेक्ट्रिक कार टाटा मोटर्सने ऑगस्टमध्ये लाँच केली होते. त्यानंतर कूप एसयूव्हीची ICE व्हर्जन अधिकृतपणे 2 सप्टेंबर रोजी लाँच करण्यात आली. ही कार पेट्रोल आणि डिझेल इंजिनसह लाँच करण्यात आली आहे. Tata Curvv ICE व्हर्जनची एक्स-शोरूम किंमत 9.99 लाख रुपयांपासून सुरू झाली आहे.
हे देखील वाचा: ओबेन इलेक्ट्रिकची दसऱ्यानिमित्त धमाका ऑफर; रोरच्या खरेदीवर करा ६०,००० रुपयांची बचत
युरोपियन ऑटोमेकर Skoda ने सप्टेंबर 2024 मध्ये Skoda Slavia चे Monte Carlo Edition लाँच केले आहे. याशिवाय स्लाव्हिया आणि कुशाकची स्पोर्ट्सलाइन व्हर्जनही सप्टेंबर महिन्यातच लाँच करण्यात आली आहे. स्लाव्हियाच्या नवीन मॉन्टे कार्लो एडिशनची एक्स-शोरूम किंमत 15.79 लाख रुपये आहे. तर स्पोर्ट्स लाइन एडिशन 14.05 लाख ते 16.75 लाख रुपयांमध्ये खरेदी करता येईल. तर Kushaq च्या स्पोर्टलाइन एडिशनची एक्स-शोरूम किंमत 14.70 लाख ते 17.40 लाख रुपये आहे.
दक्षिण कोरियाची ऑटोमेकर Hyundai ने देखील सप्टेंबर 2024 मध्ये Creta SUV चे नाईट एडिशन लाँच केले आहे. या एसयूव्हीच्या स्पेशल एडिशनमध्ये काळ्या आणि लाल रंगाची थीम ठेवण्यात आली आहे. Creta 2024 Night Edition ची एक्स-शोरूम किंमत 14.50 लाख रुपयांपासून सुरू होते.
Kia ने सप्टेंबर महिन्यात आपल्या SUV आणि MPV या दोन्हींचे Gravity Edition लाँच केले आहे. Sonet, Seltos आणि Carens मध्ये या एडिशनचे अनेक उत्तम फीचर्स देण्यात आली आहेत. Sonet विथ ग्रॅव्हिटी ट्रिमची एक्स-शोरूम किंमत 10.50 लाख रुपयांपासून सुरू होते. त्याचा टॉप व्हेरिएंट 12 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किंमतीत खरेदी केले जाऊ शकते. Carens’ Gravity Trim ची एक्स-शोरूम किंमत Rs 12.10 लाख ते Rs 14 लाख दरम्यान आहे. तर Seltos’ Gravity Trim ची एक्स-शोरूम किंमत Rs 16.63 लाख ते Rs 18.21 लाख दरम्यान आहे.