चीन हा देश तंत्रज्ञानामध्ये आणि ऑटोमोबाईल मध्येही नेहमी वेगवेगळी संशोधन आणि अविष्कार करत असतो. आता चीनची प्रसिद्ध ऑटोमोबाईल कंपनी ‘सेरेस ग्रुप’ आणि टिकटॉकची मूळ कंपनी ‘बाईटडान्स’ यांनी एकत्र येऊन पहिली ‘टिकटॉक कार’ बनवली आहे.
हा ब्रँड सैडो टेक्नॉलॉजी (Saidou Technology) या नावाने सादर केला जाईल. विशेष म्हणजे, हा ब्रँड विकसित करण्यासाठी सेरेसने टिकटॉक (TikTok) ची मूळ कंपनी बाइटडान्स (ByteDance) आणि तिच्या क्लाउड व एआय (AI) प्लॅटफॉर्म व्होल्कॅनो इंजिन (Volcano Engine) यांच्याशी भागीदारी केली आहे. या सहकार्यांतर्गत चीनमध्ये पहिली ‘टिकटॉक कार’ लॉन्च केली जाणार असून तिची निर्मिती सेरेसकडून केली जाईल. या कारच्या टिकटॉक या नावानेही ही कार चर्चेचा विषय बनत आहे. याच वर्षी ही कार लाँच केली जाईल असंही सांगण्यात येतंय.
डिझाइन
कंपनी 2026 मध्ये आपली पहिली कार बाजारात आणणार आहे. ही एक क्रॉसओव्हर कार असेल, ज्यामध्ये एसयूव्ही (SUV) आणि सेडान या दोन्ही प्रकारांच्या डिझाइनची वैशिष्ट्ये पाहायला मिळतील.
पॉवरट्रेन
ही कार पूर्णपणे इलेक्ट्रिक (EV) तसेच रेंज-एक्स्टेंडर इलेक्ट्रिक वाहन (EREV) अशा दोन पर्यायांमध्ये उपलब्ध होणार आहे.
या Chinese Electric Car चा अमेरिकेत बोलबाला ! लाँच होताच लोकांची …
उत्पादन
‘टिकटॉक कार’चे उत्पादन सेरेसच्या फिनिक्स फॅक्टरीमध्ये केले जाणार आहे.
फीचर्स
ही कार अत्याधुनिक कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानावर आधारित असेल आणि अनेक स्मार्ट सुविधा देईल.
स्मार्ट केबिन
बाइटडान्सचे व्होल्कॅनो इंजिन या कारला संवाद साधणारे आणि वापरकर्त्याच्या गरजा समजून घेणारे प्रगत AI कॉकपिट प्रदान करेल. हे एका शक्तिशाली संगणकाप्रमाणे कार्य करेल आणि विशेषतः तरुण ग्राहकांना लक्षात घेऊन विकसित करण्यात आले आहे.
हायफाय टेक्नॉलॉजी आली अंगाशी! चीनमध्ये ड्रायव्हरलेस कारमुळे जोरदार राडा
नव्या ब्रँडची रणनीती
यापूर्वीचा लँडियन ब्रँड, किफायतशीर कार बाजारात अपेक्षित यश मिळवू शकला नव्हता. त्यामुळे आता ‘सैडो’ या नव्या नावाने कंपनी तरुण, तंत्रज्ञानप्रेमी आणि सक्रिय जीवनशैली पसंत करणाऱ्या ग्राहकांना टार्गेट करणार आहे. यासाठी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये स्वतंत्र शोरूम उभारण्याचीही योजना आहे.






