सारा तेंडुलकरचा वाढदिवसाचा व्हिडिओ व्हायरल (फोटो सौजन्य - Instagram)
याला कारणीभूत ठरली आहे ती म्हणजे सारासाठी सर्वांनी वेगवेगळ्या इच्छा सांगितल्या आणि त्यातूनच आता सचिन तेंडुलकर जुळ्या मुलांचा आजोबा होणार अशी अटकळ बांधली जात आहे. इतकंच नाही तर साराची वहिनी सानिया ही तिची बेस्ट फ्रेंडही आहे आणि तिने साराने लवकरच लग्न करावं आणि तिच्या घराजवळच रहावं अशीही इच्छा व्यक्त केली आहे.
साराने आपला २९ वा वाढदिवस नुकताच साजरा केला. या वाढदिवसाचा व्हिडिओ तिने तिच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला. तिचा वाढदिवस होऊन बरेच दिवस लोटले आहेत. मात्र या व्हिडिओने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. साराचे आतापर्यंत शुभमन गिलसह नाव जोडले जात आहे. मात्र कधीही दोघांनाही याबाबत मौन सोडले नाही. मात्र आता या व्हिडिओत साराला अनेक जण तिच्या लग्नाची इच्छा बोलून दाखवत आहेत.
सर्वात मोठी इच्छा म्हणजे ‘लवकरच तू अर्जुन – सानियाच्या जुळ्या मुलांची आत्या व्हावंस’, हे ऐकून आता सर्वच नेटकऱ्यांचे कान टवकारले आहेत आणि आता सर्वानी अर्जुन – सानियाच्या घरी जुळ्या मुलांचा जन्म होणार आणि सचिन तेंडुलकर जुळ्या मुलांचा आजोबा होणार अशीच अटकळ बांधायला सुरूवात केली आहे. साराचा हा व्हिडिओ या इच्छेमुळे तुफान व्हायरल होताना दिसून येत आहे.
Sara Tendulkar : सारा तेंडुलकरच्या मनात नेमकं कोण? भावी पतीबद्दल पहिल्यांदाच मोठा खुलासा ?
सारा तेंडुलकर आता २९ वर्षांची झाली आहे आणि ती लवकरच लग्न करून जाईल या भावनेने सचिनही या व्हिडिओत भावूक झालेला दिसून येत आहे. महत्त्वाचं म्हणजे या व्हिडिओतून सारा लवकरच लग्न करणार की काय? असाही प्रश्न सर्वांना पडलेला दिसून येत आहे. साराला या व्हिडिओखाली अनेक कमेंट्स मिळाल्या असून भरभरून लाईक्सचा वर्षावही होतोय.
महत्त्वाचं म्हणजे, एक महिना होत आल्यानंतर साराने हा व्हिडिओ शेअर का केलाय असाही प्रश्न येत आहे. अर्जुन – सानियाच्या आई-बाबा होण्याचं हे Soft Launching तर नाही ना? असंही सर्वांना वाटतंय. पण जोपर्यंत आता तेंडुलकर कुटुंबीयांकडून अधिकृत प्रतिक्रिया येत नाही तोपर्यंत मात्र काहीच कळणार नाही.
सारा तेंडुलकर ही एक मॉडेल म्हणून तर काम करत आहेच, त्याशिवाय ती अनेक पातळीवर समाजसेवाही करते. ती पाळीव प्राणी आणि कुत्र्यांसाठीही काम करताना दिसून येते. गेल्या कित्येक वर्षापासून साराचे नाव भारतीय क्रिकेट स्टार शुभमन गिल याच्याबरोबर जोडलं जात असल्याचं समोर येत आहे. मात्र साराने वा शुभमनने कधीही याबाबत प्रतिक्रिया दिलेली नाही वा मीडियासमोर कधीही आपलं मन मोकळं केलेलं नाही. शुभमनने सारा आपली बेस्ट फ्रेंड असल्याचं मात्र एका कार्यक्रमात म्हटलं होतं.
आता तेंडुलकर कुटुंबीय नक्की कधी गुड न्यूज देत आहेत याचीच सर्व चाहते मनापासून वाट पाहत आहेत हे नक्की. अगदी दोन्ही बाजूने, एक म्हणजे साराचं लग्न आणि दुसरं म्हणजे अर्जुन – सानिया खरंच आई-बाबा होणार आहेत की नाही? साराचा व्हिडिओ नक्की पहा.
Ans: सारा तेंडुलकर ही सचिन तेंडुलकरची मुलगी आहे
Ans: साराने १२ ऑक्टोबर रोजी २९ वा वाढदिवस साजरा केला
Ans: सारा तेंडुलकर एक मॉडेल, सोशल वर्कर आहे आणि याशिवाय ती पिलेट्स स्टुडिओही चालवते






