(फोटो सौजन्य-AI एआय)
स्वीडिश कार उत्पादक कंपनी व्होल्वो इंडिया १२ ऑक्टोबर २०२६ रोजी आपल्या flagship इलेक्ट्रिक पोर्टफोलिओचा विस्तार करत EX90 आणि ES90 या दोन नव्या अलिशान इलेक्ट्रिक गाड्या भारतात लाँच करणार आहे. SPA2 आर्किटेक्चर आणि 800V इलेक्ट्रिकल तंत्रज्ञानावर आधारित या गाड्या व्होल्वोच्या भारतातील सर्वात मोठ्या इलेक्ट्रिक कार्स असतील.
Volvo EX90: फ्लॅगशिप इलेक्ट्रिक SUV व्होल्वो EX90 ही प्रसिद्ध XC90 ची फुल्ली-इलेक्ट्रिक व्हर्जन असून ती ब्रँडची फ्लॅगशिप SUV असेल.
परफॉर्मन्स आणि बॅटरी
आंतरराष्ट्रीय बाजारात यात Single Motor RWD आणि Dual Motor AWD पर्यायांसह 92 kWh आणि 111 kWh चे बॅटरी पर्याय मिळतात. यातील ट्विन-मोटर व्हर्जन 517 hp पॉवर आणि 910 Nm टॉर्क जनरेट करते, ज्यामुळे ही SUV अवघ्या ४.९ सेकंदात ० ते १०० किमी/तास वेग पकडते.
रेंज आणि चार्जिंग
ही SUV एका चार्जमध्ये ७४५ किमीची दावा केलेली रेंज देते. यामध्ये 800V इलेक्ट्रिकल सिस्टीम आणि 250 kW DC फास्ट चार्जिंगचा सपोर्ट दिला आहे.
डिझाइन आणि केबिन
५ मीटर लांब असलेल्या या SUV मध्ये २,९८५ मिमीचा व्हीलबेस मिळतो. ६ आणि ७-सीटर पर्यायांमध्ये उपलब्ध असलेल्या या कारच्या केबिनमध्ये पोर्ट्रेट-ओरिएंटेड टचस्क्रीन, डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, हेड-अप डिस्प्ले, पॅनोरॅमिक रूफ आणि गुगल-आधारित इन्फोटेनमेंट सिस्टीम समाविष्ट आहे.
Volvo ES90: प्रीमियम इलेक्ट्रिक सेडान ES90 च्या माध्यमातून व्होल्वो लक्झरी इलेक्ट्रिक सेडान सेगमेंटमध्ये पाऊल ठेवत आहे. ३,१०२ मिमी व्हीलबेस असलेली ही ५-सीटर कार आकर्षक फास्टबॅक डिझाइनसह येते.
परफॉर्मन्स
याच्या ‘ट्विन मोटर परफॉर्मन्स’ व्हेरियंटमध्ये ६८० hp पॉवर आणि ८७० Nm टॉर्क मिळतो, ज्यामुळे कार अवघ्या ४.० सेकंदात ० ते १०० किमी/तास स्पीड गाठते.
बॅटरी आणि चार्जिंग
१०६ kWh बॅटरी पॅकसह ही सेडान सुमारे ७०० किमीची रेंज देते. ३५० kW DC फास्ट चार्जिंगद्वारे ही कार अवघ्या २२ मिनिटांत १० ते ८० टक्के चार्ज होते.
प्रीमियम फीचर्स
केबिनमध्ये १४.५-इंच टचस्क्रीन, ५G कनेक्टिव्हिटी, २५-स्पीकर असलेला Bowers & Wilkins साउंड सिस्टीम, डॉल्बी ॲटमॉस, इलेक्ट्रोक्रोमिक पॅनोरॅमिक रूफ आणि ॲडव्हान्स्ड एअर प्युरिफायर मिळतो.
सुरक्षा आणि अपेक्षित किंमत
सुरक्षेच्या बाबतीत दोन्ही गाड्यांमध्ये रूफ-माउंटेड LiDAR सेन्सर, कॅमेरे, राडार आणि अल्ट्रासॉनिक सेन्सर्ससह Pilot Assist आणि ॲडव्हान्स्ड ड्रायव्हर-असिस्टन्स सिस्टीम (ADAS) देण्यात आली आहे.
भारतातील वैशिष्ट्ये लाँचवेळी स्पष्ट होतील, परंतु आंतरराष्ट्रीय व्हेरियंटनुसार यांच्या एक्स शोरूम किंमती, Volvo EX90: सुमारे ₹ १.५५ कोटी, Volvo ES90: सुमारे ₹ १.२५ कोटी






