श्रावणापासून दिवाळीपर्यंत सणसमारंभाचा उत्सव सुरू असतो. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात विविध धार्मिक कार्यक्रमांमध्ये होणाऱ्या महाप्रसाद व जेवणावळीसाठी अन्न व औषध प्रशासनाची परवानगी घेणं बंधनकारक आहे. अन्नपदार्थ तयार करणाऱ्या आयोजकांनी स्वच्छ व निर्जंतुक पाणी, स्वच्छ भांडी आणि स्वच्छता नियमांचे पालन करावं आणि मुदतबाह्य व नाशवंत पदार्थांचा वापर टाळावा, असं आवाहन अन्न व औषध प्रशासनाने केलं आहे. शिवाय कोल्हापूर जिल्ह्यात नऊ अन्नसुरक्षा अधिकाऱ्यांच्या माध्यमातून तपासणी करण्यात येणार असून, अस्वच्छता किंवा नियमभंग आढळल्यास कारवाई केली जाणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त उदय लोहकरे यांनी दिली आहे.