Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Sankashti Chaturthi |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ADAS सिस्टीम म्हणजे काय? ही अत्याधुनिक तंत्रज्ञान प्रणाली कशी काम करते आणि त्याचे फायदे काय?

प्रवाशांच्या सुरक्षेसाठी डिझाइन केलेल्या या फीचरचा अनेकदा गैरवापर होताना दिसतो. गाडीचे स्टीअरिंग सोडून व्हिडीओ बनवणाऱ्या चालकांचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. ज्यात चालक स्टीअरिंग व्हील सोडून गाडी चालवताना दिसतात.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Sep 16, 2025 | 04:01 PM
ADAS सिस्टीम म्हणजे काय? फोटो सौजन्य: iStock

ADAS सिस्टीम म्हणजे काय? फोटो सौजन्य: iStock

Follow Us
Close
Follow Us:
  • ADAS सिस्टीम म्हणजे काय?
  • ही अत्याधुनिक तंत्रज्ञान प्रणाली कशी काम करते?
  • त्याचे फायदे काय?

तुम्ही कधी ‘ADAS’ या शब्दाबद्दल ऐकले आहे का? किंवा ‘ADAS’ म्हणजे काय, असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. तुमच्या माहितीसाठी सांगतो, ADAS चा अर्थ आहे – Advanced Driving Assistance System. हे एक अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे जे अलीकडे भारतीय बाजारपेठेतील अनेक नवीन गाड्यांमध्ये उपलब्ध आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी डिझाइन केलेल्या या फीचरचा अनेकदा गैरवापर होताना दिसतो. गाडीचे स्टीअरिंग सोडून व्हिडीओ बनवणाऱ्या चालकांचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. ज्यात चालक स्टीअरिंग व्हील सोडून गाडी चालवताना दिसतात.

मात्र, ADAS चा खरा उद्देश आणि त्याची कार्यपद्धती या गैरवापरापेक्षा खूप वेगळी आहे. ही सिस्टीम सेन्सर, कॅमेरे आणि रडारच्या मदतीने काम करते. ही सर्व उपकरणे गाडीच्या आजूबाजूच्या परिस्थितीवर लक्ष ठेवतात आणि ड्रायव्हरला अपघात टाळण्यासाठी मदत करतात. चला, या तंत्रज्ञानाचे प्रमुख फायदे आणि ते कसे काम करते, ते जाणून घेऊया.

ADAS तंत्रज्ञान कसे काम करते?

ADAS तंत्रज्ञान गाडीच्या डोळ्यांसारखे काम करते. ते रस्ते, इतर वाहने आणि अडथळ्यांची माहिती गोळा करते. या माहितीच्या आधारावर, ते ड्रायव्हरला योग्य वेळी सूचना देते किंवा गरज पडल्यास स्वयंचलितपणे कारवाई करते. यामुळे ड्रायव्हरचा ताण कमी होतो आणि ड्रायव्हिंग सुरक्षित होते.

हे देखील वाचा: 461 किमी रेंज, ADAS आणि त्यात सनरूफची मज्जा! भारतात ‘ही’ इलेक्ट्रिक कार धडाधड विकली जातेय

ADAS चे प्रमुख फायदे

  • अपघात टाळण्यास मदत: ADAS सिस्टीम गाडीची संभाव्य टक्कर ओळखते. यामुळे, ती ड्रायव्हरला वेळेवर सतर्क करते आणि काही परिस्थितींमध्ये आपोआप ब्रेक लावते, ज्यामुळे अपघात टळू शकतो किंवा त्याची तीव्रता कमी होते.
  • लेनमध्ये राहण्यास मदत: जर तुम्ही तुमच्या लेनमधून बाहेर जात असाल तर हे फीचर तुम्हाला ऑडिओ किंवा व्हिज्युअल अलर्ट देते. यामुळे विशेषतः एक्सप्रेसवेवर गाडी सुरक्षित चालवणे सोपे होते.
  • अ‍ॅडॉप्टिव्ह क्रूझ कंट्रोल (Adaptive Cruise Control): हे फीचर समोरच्या गाडीपासून सुरक्षित अंतर ठेवून गाडीचा वेग आपोआप नियंत्रित करते. यामुळे लांबच्या प्रवासात तुमचा थकवा कमी होतो.
  • ब्लाइंड स्पॉट ओळखणे: ADAS फीचर्समुळे ड्रायव्हरला गाडीच्या अशा भागांबद्दल माहिती मिळते जे त्याला थेट दिसत नाहीत. यामुळे लेन बदलताना किंवा ओव्हरटेक करताना मदत होते.
  • पार्किंगमध्ये मदत: काही अत्याधुनिक ADAS सिस्टीम पार्किंमधील जागा ओळखून सुरक्षितपणे आणि अचूकपणे गाडी पार्क करण्यास ड्रायव्हरला मदत करतात.
  • ट्रॅफिक सिग्नल ओळखणे: ही प्रणाली रस्त्यांवरील ट्रॅफिक सिग्नल आणि चिन्हे (उदा. वेग मर्यादा) आपोआप ओळखते आणि ड्रायव्हरला त्याबद्दल माहिती देते. यामुळे तुम्ही वाहतूक नियमांचे पालन करता आणि ड्रायव्हिंग अधिक सुरक्षित होते.

Web Title: What is an adas system how does this technology system work and what are its benefits

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 16, 2025 | 04:01 PM

Topics:  

  • ADAS
  • automobile
  • automobile news
  • Car

संबंधित बातम्या

मार्केटमध्ये येणार ‘धमाका’! दमदार फिचर्ससह Tata, Mahindra आणि Renault लवकरच लाँच करणार नवीन गाड्या
1

मार्केटमध्ये येणार ‘धमाका’! दमदार फिचर्ससह Tata, Mahindra आणि Renault लवकरच लाँच करणार नवीन गाड्या

Electric Car ची रेंज कशी वाढवता येणार? ‘ही’ एक चूक ठरेल तुमच्यासाठी डोकेदुखी
2

Electric Car ची रेंज कशी वाढवता येणार? ‘ही’ एक चूक ठरेल तुमच्यासाठी डोकेदुखी

खतरनाक बाईक! फक्त 3.2 सेकंदात पकडते 100 kmph ची पॉवर, किंमत नव्याकोऱ्या कारलाही लाजवेल
3

खतरनाक बाईक! फक्त 3.2 सेकंदात पकडते 100 kmph ची पॉवर, किंमत नव्याकोऱ्या कारलाही लाजवेल

अतिरिक्त पैसे मोजायची तयारी ठेवा! महाराष्ट्रात ‘ही’ टॅक्सी सेवा महागणार ? प्रताप सरनाईकांनी दिली माहिती
4

अतिरिक्त पैसे मोजायची तयारी ठेवा! महाराष्ट्रात ‘ही’ टॅक्सी सेवा महागणार ? प्रताप सरनाईकांनी दिली माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.