फोटो सौजन्य - Social Media
इंडिया यामाहा मोटर (IYM) ने त्यांच्या पहिल्या हायब्रिड मोटरसायकल २०२५ ‘FZ-S Fi Hybrid’ च्या लाँचची घोषणा केली आहे. या मोटरसायकलची किंमत ₹१,४४,८०० (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे. ही मोटरसायकल प्रगत तंत्रज्ञान, उत्तम परफॉर्मन्स आणि स्टायलिश डिझाइनसह बाजारात दाखल झाली आहे. नवीन ‘FZ-S Fi Hybrid’ मध्ये संतुलित आणि आकर्षक डिझाइन देण्यात आले आहे. टँक कव्हरवर अधिक स्लीक आणि सुधारित कडा देण्यात आल्या आहेत, ज्यामुळे मोटरसायकलला आक्रमक आणि एअरोडायनॅमिक लुक मिळतो. यामध्ये एकीकृत फ्रंट टर्न सिग्नल्स आहेत, जे आता एअर इनटेक भागात बसवण्यात आले आहेत, यामुळे मोटरसायकलची उपस्थिती अधिक ठळक होते.
ही मोटरसायकल १४९ सीसी ब्लू कोअर इंजिन सह सुसज्ज असून ते OBD-2B प्रमाणित आहे. तसेच यात यामाहाचे स्मार्ट मोटर जनरेटर (SMG) आणि स्टॉप अँड स्टार्ट सिस्टम (SSS) आहे. हे तंत्रज्ञान शांत स्टार्ट, बॅटरी-असिस्टेड Acceleration आणि इंधन कार्यक्षमता सुधारण्यास मदत करते. इंजिन आयडलींग दरम्यान आपोआप बंद होते आणि फक्त क्लच अॅक्शनने पुन्हा सुरू होते. राइडरच्या सोयीसाठी, 4.2-इंच फुल-कलर TFT इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देण्यात आले आहे, जे Y-Connect अॅपच्या माध्यमातून स्मार्टफोनशी सहज जोडले जाऊ शकते. यात Google Maps लिंकसह टर्न-बाय-टर्न (TBT) नेव्हिगेशन आहे, जे रिअल-टाइम दिशादर्शन, इंटरसेक्शन तपशील आणि रस्त्यांची नावे दाखवते.
लांब प्रवास अधिक आरामदायी करण्यासाठी हँडलबार पोझिशन ऑप्टिमाइझ करण्यात आले आहे. तसेच स्विचेस ग्लोव्ह्ज घातल्यानंतरही सहज वापरता येतील अशा पद्धतीने डिझाइन करण्यात आले आहेत. फ्युएल टँक आता एअरप्लेन-स्टाइल फ्युएल कॅप सह सुसज्ज आहे, जी इंधन भरताना देखील जोडलेली राहते. ही मोटरसायकल रेसिंग ब्लू आणि सायन मेटॅलिक ग्रे या दोन आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहे.
लाँचप्रसंगी यामाहा मोटर इंडिया चे अध्यक्ष श्री. इतारू ओतानी म्हणाले, “FZ ब्रँडने भारतीय बाजारात मजबूत पकड मिळवली आहे. ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही सातत्याने नाविन्य आणत आहोत. हायब्रिड तंत्रज्ञानासह ही मोटरसायकल गतीशीलता आणि इंधन कार्यक्षमतेसाठी नवीन मापदंड निश्चित करेल.” २०२५ ‘FZ-S Fi Hybrid’ च्या लाँचसह, यामाहाने भारतीय बाजारात हायब्रिड तंत्रज्ञानाचे नवे पर्व सुरू केले आहे.