फोटो सौजन्य: iStock
भारतात एसयूव्ही कार्सची क्रेझ ही मोठ्या प्रमाणात आहे. अनेक सेलिब्रेटीज आणि नेतेमंडळी सुद्धा आपल्या कार कलेक्शनमध्ये एसयूव्ही कार्स समाविष्ट करताना दिसतात. या वर्षी अनेक उत्तम एसयूव्ही मार्केटमध्ये लाँच झाल्या. यात काही इलेक्ट्रिक एसयूव्ही देखील होत्या.
2024 चं वर्ष एसयूव्हीसाठी आहसदायक ठरले आहे. या वर्षी अनेक भारतीय आणि परदेशी वाहन उत्पादकांनीही लोकप्रिय एसयूव्हीचे अपडेट आणले आहेत. 2024 मध्ये लाँच झालेल्या काही बेस्ट SUV बद्दल जाणून घेऊया, ज्या भारतीय बाजारपेठेत आपली हवा करत आहे.
वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजेच 16 जानेवारीला ह्युंदाई क्रेटा लाँच झाली होती. यात नवीन डिझाइनसह 1.5-लीटर टर्बो-पेट्रोल इंजिन लाँच केले होते, जे 160 PS ची पॉवर जनरेट करते. यात ड्युअल 10.25 इंच डिस्प्लेबरोबर इंफोटेन्टमेंट आणि डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, ड्युअल झोन AC, 360 डिग्री कॅमेरा आणि ADAS सारखे अत्याधुनिक सेफ्टी फीचर्स दिले गेले आहे.
भारतातील EV मार्केट 2030 पर्यंत 20 लाख कोटींचे होणार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा विश्वास
15 ऑगस्ट 2024 ला महिंद्राने 5 डोअर असणारी Thar Roxx लाँच केली होती. यात उत्तम डिझाइन देण्यासोबतच मॉडर्न इंटिरिअर सुद्धा देण्यात आले आहे. त्यात हवेशीर फ्रंट सीट्स, पॅनोरामिक सनरूफ आणि वायरलेस फोन चार्जिंग यांसारख्या फीचर्स आहे. हे 2-लीटर टर्बो-पेट्रोल आणि 2-लीटर डिझेल इंजिन पर्यायांमध्ये लाँच केले गेले आहे. या कारची किंमत 13 लाख ते 22.49 लाख रुपये आहे.
नवीन Skoda Kylaq भारतात 6 नोव्हेंबर रोजी लॉन्च करण्यात आली आहे. हे फक्त 1-लिटर टर्बो-पेट्रोल इंजिनसह उपलब्ध आहे. यात इन्फोटेनमेंट सिस्टम, पॉवर आणि व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स, सिंगल-पेन सनरूफ आणि वायरलेस फोन चार्जिंग यांसारखी फीचर्स आहेत. या कारची किंमत 7.89 लाख ते 14.40 लाख रुपये दरम्यान आहे.
Year Ender 2024: ‘या’ कंपन्यांनी Best Electric Cars बाजारात आणून 2024 केले आपल्या नावावर
महिंद्राने 29 एप्रिल रोजी भारतात XUV 3XO या नवीन नावाने XUV300 लाँच केले आहे. यात नवीन डिझाइन आणि इंटीरियरसह अनेक अपडेट्स देण्यात आले आहेत. हे टर्बो-पेट्रोल आणि डिझेल इंजिन ऑप्शन्ससह आणले गेले आहे. हे 10.25 इंच इंफोटेनमेंट युनिट, 10.25 इंच डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, पॅनोरामिक सनरूफ आणि ADAS सारख्या फिचजर्सने सुसज्ज आहे.
Tata Curvv 7 ऑगस्ट रोजी भारतात लाँच करण्यात आली होती. 1.2-लीटर टर्बो-पेट्रोल, 1.2-लीटर टर्बो-पेट्रोल आणि 1.5-लीटर डिझेल इंजिन या तीन इंजिन पर्यायांसह हे लाँच करण्यात आले आहे. फीचर्सच्या बाबतीत, यात जेश्चर कंट्रोलसह पॉवर टेलगेट, पॅनोरॅमिक सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा आणि ADAS सारख्या प्रगत फीचर्स देण्यात आले आहे.